Thursday 2 June 2022

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरणविषयक जाहीर सुनावणी

 


 

        जालना दि. 2 (जिमाका) :-  वने व पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार यांची अधिसूचना दि. 14 जुन 2006 अन्वये मे. कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना लि. युनिट नं. 2, सागर,गाव तिर्थपूरी, ता. घनसावंगी जि. जालना या प्रस्तावित विस्तार प्रकल्पामध्ये साखर कारखाना विस्तारीकरण 5 हजार  टन प्रतिदिन ते 10 हजार टन प्रतिदिन, 15 मेगावॅट ते 32 मेगावॅट वीज सहनिर्मितीपर्यंत उत्पादन करणेबाबत पर्यावरविषयक जाहीर लोकसुनावणीकरीता अर्ज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झालेला आहे. सदर प्रस्तावित नवीन प्रकल्पाकरिता पर्यावणरविषयक जाहीर लोकसुनावणी  दि. 21 जून  2022 रोजी  सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. सुनावणीचे ठिकाण – मे. कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना लि., युनिट नं., 2 (सागर), गाव तिर्थपूरी ता. घनसावंगी जि. जालना.

       सदर प्रकल्पाबाबत लेखी स्वरुपात विचार, टिका, टिप्पणी सादर करणे असल्यास बातमी प्रसिध्द झाल्यापासून जाहीर सुनावणीच्या तारखेपूर्वी  उपप्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्लॉट नं. पी-3/1 व पी -3/2, अतिरिक्त एमआयडीसी फेज-2, जालना  ई मेल  srojalna@mpcb.gov.in, वेब – www.mpcb.gov.in खालील पत्त्यावर पाठविण्यात याव्यात.

     तसेच सदर प्रकल्पाच्या परिसरातील रहिवासी, पर्यावरणविषयी काम करणा-या संस्था, सदर प्रकल्पामुळे अन्य प्रकारे प्रभावित होणारे रहिवासी यांना सदर प्रकल्पासंबंधी विचार, टिका, टिप्पणी तोंडी किंवा लेखी स्वरुपात जाहीर सुनावणीदरम्यानसुध्दा नोंदविता येतील.

  सदर प्रकल्पाविषयी व पर्यावरण मुल्यांकन अहवालाच्या सारांशाची माहिती असलेले दस्तावेज (इंग्रजी व मराठी) मध्ये खालील कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. संबंधित व्यक्ती खालील कार्यालयामध्ये सदर कागदपत्रे कार्यालयीन वेळेत अभ्यासू शकतील.

  जिल्हाधिकारी कार्यालय, जालना. जिल्हा परिषद जालना. जिल्हा उद्योग केंद्र, जालना, तहसिलदार, तहसिल कार्यालय, घनसावंगी. ग्रामपंचायत कार्यालय, तिर्थपुरी, रामगव्हाण खुर्द, बोडखा बु., रुई, मंडाळा, वडीरामसगाव, मुरमा, ता. घनसावंग, जि. जालना. प्रादेशिक कार्यालय, म.प्र.नि.मंडळ, भुखंड क्र. ए-4/1, एमआयडीसी चिकलठाणा औरंगाबाद. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुख्यालय, कल्पतरु पॉईंट, 3 रा माळा, सायन, माटुंगा स्कीम रोड नं. 8 सायन सर्कलसमोर, सायन (पुर्व), मुंबई -22. पर्यावरण विभाग, नवीन प्रशासन भवन, 15 वा मजला, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई -32. प्रादेशिक कार्यालय, पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, पश्चिम मध्ये विभाग, तळमजला, पूर्व विंग, नवीन सचिवालय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर. येथे उपलब्ध असल्याचे ही पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment