Wednesday 15 June 2022

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या योजना

 



 

       अल्पसंख्याक समाजामधील आर्थिकदृष्टया मागासलेल्या अल्पसंख्याकाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.  या महामंडळांतर्गत विविध कर्ज योजना, प्रशिक्षण योजना, सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज स्वरुपात सहाय्य देणे, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी - विद्यार्थीनींना शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करुन देणे, व्यवसाय,  व्होकेशनल प्रशिक्षण देणे. तसेच अल्पसंख्याक समुहातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुक्ष्म पतपुरवठा यासह इतर योजना राबविण्यात येतात. अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांनी याचा लाभ घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत व्हावी, या उद्देशाने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळाच्या योजनांची माहिती प्रस्तुत लेखात देण्यात येत आहे.

 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना

        कर्ज मर्यादा रु. ५.०० लाखापर्यंत, व्याजदर फक्त ३ टक्के,  परतफेड शिक्षणपूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील ५ वर्षे,  कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा-शहरी भागासाठी  १ लक्ष २० हजार रुपयांपेक्षा कमी, ग्रामीण भागासाठी रु.९८ हजार रुपयांपेक्षा कमी, विद्यार्थ्याचे वय १६ ते ३२ वर्षे असावे.  योजनेच्या लाभासाठी   विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक साक्षांकित कागदपत्रांच्या दोन प्रती, अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र),  महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा (आधार कार्ड / इलेक्शन कार्ड / पारपत्रक (Passport) / बँकेचे पासबुक / वाहन चालक परवाना / दूरध्वनी देयक / विद्युत देयक किंवा तलाठी / तहसिलदार यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक) ४. ओळखपत्र अर्जदार जामिनदार दोन्हीचे (आधार कार्ड / इलेक्शन कार्ड / पारपत्रक (Passport) / बँकेचे पासबुक वाहन चालक परवाना / पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक), उत्पन्न प्रमाणपत्र कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला / शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं. १६. ६. विहित नमुन्यातील अर्जदार व जामिनदाराचे हमीपत्र, बेबाकी प्रमाणपत्र महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे / वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज / थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे / वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मुळ प्रतीतील शपथपत्र, ८. जामिनदार : सक्षम जामिनदार (सार्वजनिक उपक्रम / शासकीय / बँक किंवा खाजगी क्षेत्रातील आयकर भरणार व्यक्ती) किंवा स्थावर (Immovable) मालमत्ता असल्यास गहाण  अथवा जंगम  मालमत्ता असल्यास तारणगहाण करून घेणे. (मालमत्ता मुल्यांकन पत्र, मालमत्तेची मावहती ७/१२ चा व ८ अ चा उतारा), शैक्षणिक संस्थेचे शुल्कपत्रक (फी स्ट्रक्चर), वसतिगृह / घरमालकाचे भाडेपत्रक व खानावळ (मेस) चे दरपत्रक.  दारिद्र रेषेखालील उमेदवारांनी दारिद्रयरेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.  या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक असून यासाठी महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in व https://malms.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरुन अर्ज भरता येईल.

मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना

            या योजनेची कर्ज मर्यादा  २ लक्ष ५० हजार रुपयांपर्यंत असुन कर्जाची परतफेड शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील ५ वर्षे करता येऊ शकते.  यासाठी व्याजदर ३ टक्के एवढा आहे.  कौटुंबिक वार्षिक उत्पन्न   ८ लक्ष रुपयापर्यंत असुन विद्यार्थ्याचे वय १८ ते ३२ वर्षे असणे आवश्यक आहे.

..2..

कर्ज योजनेसाठी आवश्यक ती कागदपत्रे

            विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक साक्षांकित कागदपत्रांच्या दोन प्रती,  अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र),   महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा (आधार कार्ड / मतदान कार्ड / पारपत्रक (Passport) / बँकेचे पासबुक / वाहन चालक परवाना / दूरध्वनी, विद्युत देयक किंवा तलाठी / तहसिलदार यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक), ओळखपत्र: अर्जदार व जामिनदार दोन्हीचे (आधार कार्ड / इलेक्शन कार्ड / पारपत्रक (Passport) / बँकेचे पासबुक / वाहन चालक परवाना / पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक),  उत्पन्न प्रमाणपत्रः कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला / शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं. १६,  विहित नमुन्यातील अर्जदार व जामिनदाराचे हमीपत्र, बेबाकी प्रमाणपत्र महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे / वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज / थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे / वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मुळ प्रतीतील शपथपत्र, जामिनदार सक्षम जामिनदार (सार्वजनिक उपक्रम / शासकीय / बँक किंवा खाजगी क्षेत्रातील आयकर भरणार व्यक्ती) किंवा स्थावर (Immovable) मालमत्ता असल्यास गहाण (Mortgage) अथवा जंगम (Movable) मालमत्ता असल्यास तारणगहाण (Hypothecate) करून घेणे. (मालमत्ता मुल्यांकन पत्र, मालमत्तेची माहिती ७/१२ चा उतारा, ८-अ चा उतारा), शैक्षणिक संस्थेचे शुल्कपत्रक (फी स्ट्रक्चर), वसतिगृह / घरमालकाचे भाडेपत्रक व खानावळ (मेस) चे दरपत्रक. दारिद्र रेषेखालील उमेदवारांनी अर्जासोबत दारिद् रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे. तसेच   योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक असून यासाठी महामंडळाचे संकेतस्थळ www.mamfdc.maharashtra.gov.in अथवा  https://malma.maharashtra.gov.in या संकेतस्थळांचा वापर करावा.

सुक्ष्म पतपुरवठा योजना

            राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास एवं वित्त निगम, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत सुक्ष्म पतपुरवठा योजना राबविण्यात येते. महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान  या नामांकित संस्थामार्फत अल्पसंख्याक महिला बचत गटांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करुन देणे  हा या योजनेचा उद्देश आहे.

            कर्ज योजनेचे स्वरुप : महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान  तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या नामांकित संस्थांमार्फत अल्पसंख्याक महिलांसाठी स्वयं सहाय्यता बचतगटांची यापूर्वी स्थापना झालेली असेल किंवा पुढे होईल, त्याप्रमाणे महिला आर्थिक विकास महामंडळाने / इतर नामांकित संस्थांनी त्या बचत गटांना पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी कर्जाकरिता बँकांशी जोडणी करून दिलेली असेल पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या कर्जाची परतफेड ज्या बचत गटांनी यापूर्वी केलेली असेल तो बचत गट मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत तिसऱ्या टप्प्याच्या 2 लक्ष रुपये (महामंडळाचा हिस्सा

 १ लक्ष ९० हजार  व कर्जदार महिला बचतगटाचा हिस्सा १० हजार रुपये) कर्ज देण्यासाठी पात्र राहील. यासाठी  व्याजदर द. सा. द. शे. ७ टक्के एवढा राहील. 

            कर्ज मिळण्यास पात्रता : महिला आर्थिक विकास महामंडळासह इतर नामांकित संस्थांमार्फत स्थापन महिला बचत गट महिला बचत गट केवळ कर्ज मिळण्यास पात्र राहतील.

            कर्ज परतफेड कालावधी कर्ज वितरणानंतर पुढील ३ महिन्यापासून पुढील ३ वर्षे.  महिला बचत गटांचा सहभाग: ९५ टक्के कजा, ५ टक्के महिला बचत गटाचा हिस्सा. महिला बचत गटातील सभासद संख्या कमीत कमी १० व जास्तीत जास्त २० सभासद एवढी आवश्यक आहे.  कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी  १ लक्ष २० हजार रुपयांपेक्षा कमी व  ग्रामीण भागासाठी   ९८ हजार रुपयांपेक्षा पेक्षा कमी असणे आवश्यक राहील. तसेच महिला बचतगटातील ७० टक्क्यापेक्षा अधिक सभासद अल्पसंख्याक समाजातील असणे आवश्यक.

योजनेसाठी आवश्यक ती कागदपत्रे

अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक साक्षांकित कागदपत्रांच्या दोन प्रती, बचत गटातील ७० टक्क्यापेक्षा अधिक सभासद अल्पसंख्याक समाजातील असणे आवश्यक राहील. अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायतीचा दाखला किंवा तलाठी दाखला किंवा स्वयंघोषित प्रमाणपत्र (साध्या पेपरवर) (यापैकी कोणतेही एक),  प्रत्येक सभासदाचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा (आधार कार्ड / इलेक्शन कार्ड / पारपत्रक (Passport) / बँकेचे पासबुक / वाहनचालक/परवाना / दूरध्वनी देयक / विद्युत देयक / रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक), सर्व सभासदांचे ओळखपत्र (आधार कार्ड / इलेक्शन कार्ड / पारपत्रक (Passport) / बँकेचे पासबुक / वाहनचालक परवाना / पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक),

..3..

            सर्व सभासदांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला किंवा बीपीएल/एसईसीसी यादीमध्ये नाव समाविष्ट असणे किंवा माविम/एनयुएलएम/एमएसआरएलएम यांच्या समन्वय अधिकाऱ्यांमार्फत सदर सदस्य दारिद्ररेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र, अध्यक्ष यांचे सविस्तर परिचयपत्र व बचत गटाच्या सामाजिक कार्याचा उल्लेख, बचत गटातील सदस्यांच्या नावाची यादी (नाव, पत्ता, वय, जात व करावयाचा व्यवसाय, भ्रमणध्वनी क्रमांक),  बचत गट प्रमुखाचा थोडक्यात परिचय देणे आवश्यक आहे.

कर्ज मंजुरीनंतर सादर करावयाची कागदपत्रे (वैधानिक दस्तऐवजासोबत)

            बचत गटाच्या बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स, मागील ६ महिन्याच्या बचत गटाच्या इतिवृत्ताची छायांकित प्रत,  बचत गटातील सभासदांचे रंगीत फोटो, बचत गटाच्या मागील दोन / तीन वर्षाच्या आर्थिक व्यवहाराचा जमाखर्चाचा तपशील, विविध शासकीय विभागाकडून बचत गटास मिळणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती,   बँक / वित्तीय संस्था यांच्याकडे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यावरील कर्जाची परतफेड केल्याबाबतचे ना देय प्रमाणपत्र, सर्व सभासदांचे बेबाकी प्रमाणपत्र : महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे / वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज / थकबाकी नसल्याचे देबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे / वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मुळ प्रतीतील शपथपत्र, विहित नमुन्यातील वैधानिक दस्तऐवज  व कर्ज वसुलीचे आगावू दिनांकित धनादेश सोबत जोडणे आवश्यक राहील.

            या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपण मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, डी.डी.बिल्डिंग, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई दूरध्वनी क्र. 022-22672293, 22653080 अथवा मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, कचेरीरोड, पाठक मंगल कार्यालयाच्या बाजुला, मुक्तेश्वरद्वार, जालना संपर्क क्र. 7020414039 येथे संपर्क साधावा.

 

                                                                                                         -- जिल्हा माहिती कार्यालय,

                                                                                   जालना

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment