Thursday 9 June 2022

व्यायाम शाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


   जालना दि. 8 (जिमाका) :- अल्पसंख्याकांच्या कल्याणाकरीता पंतप्रधान यांच्या 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले असून शासन निर्णयान्वये अल्पसंख्याक बहुल क्षेत्रामध्ये व्यायाम शाळा सुरु करण्यात याव्यात अल्पसंख्याक वस्ती, गल्ली यांच्या मधील खेळांबाबतच्या सुविधा वाढविण्याच्या हेतूने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांचे मार्फत व्यायाम शाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी जिल्हयातीत पात्र असणाऱ्या अल्पसंख्याक शाळा, महाविद्यालय, शासकीय वस्तीगृह यांनी जिल्हा क्रीडा कार्यालय, जालना येथे दि. 8 जुन 2022  पासून ते दि. 15 जून 2022 या कालावधीत नमुना अर्ज कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहतील.

    या अर्जासाठी शासन निर्णयांचे अवलोकन करून पात्र असणाऱ्या अल्पसंख्याक संस्थांनीच कार्यालयीन विहित वेळेत अर्ज घेऊन परिपुर्ण प्रस्ताव कार्यालयात 2 प्रतीत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment