Wednesday 24 June 2020

एपीएल शिधापत्रिधारक तांदळाचा पुरवठा


जालना, दि. 24 -  शासनाकडून माहे जुलै 2020 करिता प्रधान्य कुटुंब योजनेनुसार प्रतिलाभार्थी  2 किलो तांदूळ याप्रमाणे नियतन प्राप्त झाले असून शासनाकडून प्राप्त नियतनानुसार तालुकानिहाय लाभार्थी प्रमाणानुसार नियतन देण्यात आले आहे.
जालना (ग्रामीण) साठी 609 क्विंटल,  जालना टी एफ (बदनापूरसाठी) 150 क्विंटल, भोकरदन 585 क्विंटल, जाफ्राबाद-290 क्विंटल, परतुर-400 क्विंटल, मंठा- 300 क्विंटल, अंबड -519 क्विंटल, नसांवगी/अंबड टीएफ,              (नसांवगीसाठी ) 162 क्किंटल  या प्रमाणे वाटप करण्यात आले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या देय नियतनाप्रमाणे उपलब्धतेनुसार अन्नधान्य वितरित करावे. सदर धान्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कार्यपध्दतीप्रमाणे वितरित करण्याची दक्षता घेण्यात यावी. कार्डधारकांना स्वस्त दुकानाच्या माध्यमातून या धान्याचे वाटप होत असल्याची खात्री करण्यात यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दी पत्राकाव्दारे कळविले आहे.
                                                 *********


कल्याणकारी योजनेचा अन्नधान्याचा पुरवठा


जालना, दि. 24 -   माहे एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी कल्याणकारी योजनेच  तालुकानिहाय गहू प्रत्येक तालुक्यातील शासकीय व शासन अनुदानित संस्थासाठी गहू क्वांटम 8 किलो तर तांदूळ क्वांटम 7 किलो प्रतिलाभार्थी वितरणासाठी नियतन प्राप्त झाले असुन त्याचा तपशिल पुढील प्रमाणे.
 जालना तालुक्यासाठी   गहू  00 किलो तर तांदूळ 173.5 क्विंटल,  बदनापूरसाठी  गहू 584.09 क्विंटल, तांदूळ 912 क्विंटल, भोकरदन गहू 233 क्विंटल, तांदूळ 485 क्विंटल,  जाफ्राबाद गहू 11 क्विंटल,  तांदूळ 00 क्विंटल,  परतुर  गहू  123 क्विंटल, तांदूळ 00 क्विंटल,  मंठा  गहू 184 क्विंटल,  तांदूळ 200 क्विंटल, अंबड  गहू व तांदुळ 00 क्विंटल तर   नसांवगी तालुक्यासाठी  गहू व तांदूळ 00 क्विंटल.
कल्याणकारी सदस्य व वसतीगृह योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी कल्याणकारी संस्था व वसस्तीगृह यांना संबधित विभागाची मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे. कल्याणकारी संस्था व वस्तीगृहे यांनी अन्नधान्यासाठी कोणतिही फी आकारु नये. वस्तीगृहाच्या बाबतीत वस्तीगृहामध्ये एकूण लाभार्थ्याना 2/3 लाभार्थी हे एस.सी.एस.टी.ओबीसी प्रवर्गातील असावेत. कल्याणकारी संस्था व वस्तीगृहाचे लेखे लेखापरिक्षणासाठी लेखा व कोषागार विभागाच्या जीएफआर नुसार उपलब्ध असणे आवश्यक आहे.
या योजनेतंर्गत केवळ राज्य शासनाच्या शासनाकडून अनुदान प्राप्त होणा-या कल्याणकारी संस्था/ वस्तीगृहे अन्नधान्याच्या मालकीच्या व राज्य शासनामार्फत चालविण्यात येणा-या व राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त होणा-या कल्याणकारी संस्था, वस्तीगृहे,अन्नधान्याचा लाभ मिळविण्यास पात्र आहे.त्यामुळे संस्थांची पात्रता तपासूनच पात्र संस्थानाच अन्नधान्य वाटप करण्यात यावे. केंद्र शासनाच्या व केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होणा-या तसेच राज्यातील खाजगी संस्था, वस्तीगृहे व अन्न तत्सम स्वरुपांच्या संस्था, वस्तीगृहे या योजनेतंर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्यास पात्र राहणार नाहीत. सदर संस्था/ वस्तीगृहांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येऊ नये.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कारागृहे/ हॉस्पीटल्स कल्याणकारी योजनेच्या लाभास पात्र राहणार नाहीत. त्यामुळे क्षेत्रिय कार्यालयाकडून प्राप्त कल्याणकारी संस्था/ वस्तीगृहाच्या तपशीलापैकी कारगृहे/हॉस्पीटल्स यांना वगळून उर्वरित कल्याणकारी संस्था/वस्तीगृहासाठी अन्नधान्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. क्षेत्रीय कार्यालयांनी या योजनेतंर्गत  कारगृहे/ हॉस्पीटल यांना अन्नधान्याचे वाटप करु नये. कल्याणकारी संस्था व वस्तीगृहे योजनेतंर्गत राज्य शासनाच्या मालकीच्या व राज्य शासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या कल्याणकारी संस्थासह राज्य शासन अनुदानित कल्याणकारी संस्था व वस्तीगृहानांच नियतन वितरित करण्यात यावे. अपात्र संस्थाना नियतन वितरित करण्यात येऊ नये अन्नधान्याच्या वितरण संदर्भात अनियमितता झाल्यास संबधित अधिकारी/ कर्मचारी यांच्याविरुध्द जबाबदारी निश्चित करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी,जालना यांनी प्रसिध्दी पत्राकाव्दारे कळविले आहे.
-*-*-*-*-

जिल्ह्यात चौदा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर वीस रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना, दि. 24 (जिमाका) :- शहरातील लक्कडकोट परिसरातील 01,नानक निवास 04, विठ्ठल रुक्मिणी लोधी मोहल्ला 01, काद्राबाद 03, शंकर नगर 01, सरस्वती मंदिर 01,गुडला गल्ली 04, जाफ्राबाद शहरातील अंबेकर नगर 01,जाफ्राबाद शहरातील नगर पंचायत 01, जाफ्राबाद शहरातील आदर्श नगर 01, आदर्श नगर पिंपळखुडा, जाफ्राबाद 01,अंबड शहरातील 01 अशा एकुण 20 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात तर  जालना शहरातील काद्राबाद परिसरातील 02,मंगळबाजार 03, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 3 मधील 01 जवान,        नाथबाबा गल्ली 03,मोदीखाना 01,नुतन कॉलनी, भोकरदन 02,गोंदी ता. अंबड येथील 02 अशा एकूण 14 व्यक्तींच्या 
 पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
              जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण3789 असुन  सध्या रुग्णालयात -104, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1436, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या61, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4674, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–14 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -398, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -4211 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-406 एकुण प्रलंबित नमुने-61, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1320.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–03, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 1215, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-44, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-245, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–16, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -104, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-24, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-20, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-277, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -102, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-07, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-10597, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 12 एवढी आहे.  
        आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 245 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-14, शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-29, संत रामदास वसतिगृह जालना-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-00, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-26, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना59 मॉडेल स्कुल परतुर-05, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-11, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-01 मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -27, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00, हिंदुस्थान मंगल  कार्यालय, जाफ्राबाद-09, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद 00, जेबीके विद्यालय, टेंभुर्णी-28, शेठ इ.बी.के. विद्यालय टेंभुर्णी -30. 
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 872 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 827 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 76 हजार 930 असा एकुण 4 लाख 3 हजार 738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
-*-*-*-*-*-*-

सामाजिक अंतर न राखणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाची कारवाई 73 व्यक्तींकडून 15 हजार 200 रुपयांचा दंड वसुल


जालना,दि. 24 (जिमाका):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरामध्ये सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासनामार्फत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सामाजिक अंतर न राखणाऱ्या 71 व्यक्तींकडून 14 हजार 200 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 2 व्यक्तींकडून 1 हजार  रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये हातगाडीवर भाजीपाला व फळविक्रेते यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
            नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये,  सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
*******

प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्ज उपलब्ध करुन द्या. कंन्टेन्टमेंट झोनमधुन नागरिकांनी बाहेर पडू नये एसबीआय, युनियन बँक तसेच शहरातील कंन्टेन्टमेंट भागास भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सुचना


जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सुचना
            जालना दि. 24 – जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज दि. 24 जुन रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या मुख्य शाखेस, अंबड येथील एसबीआय  तसेच रामनगर येथील युनियन बँकेला भेट देऊन शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीककर्जाचा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.  तसेच जालना शहरातील कन्टेन्टमेंट झोनला प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली.
            बँक अधिकाऱ्यांकडून आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकांच्या लागवडी तसेच मशागतीसाठी पीककर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते.  शासन तसेच प्रशासनामार्फत प्रत्येक बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  पीककर्जाचे दिलेले उद्दिष्ट प्रत्येक बँकांनी शंभर टक्के पुर्ण करावे.  तसेच जिल्ह्यातील एकही गरजू शेतकरी पीककर्जापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देत ज्या बँका दिलेले उद्दिष्ट पुर्ण करणार नाहीत अथवा पीककर्ज देण्यास टाळाटाळ करतील अशा बँकांवर कारवाई करण्याचा ईशाराही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिला.
            यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, एलडीएम निशांत ईलमकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांनो कंन्टेन्टमेंट भागातुन बाहेर पडू नका
            जालना शहरामधील कंन्टेन्टमेंट भागास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत या भागाची पहाणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये.  केवळ अत्यावश्यक असेल त्या वेळीच घराबाहेर पडा.  सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायरचा वापर, वारंवार साबणाने हात धुणे या बाबींची सवय लावून घेण्याबरोबरच प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अंबड येथील कापूस खरेदी केंद्राला भेट
            अंबड येथे सुरु करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्राला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची पहाणी करुन एकाही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना यावेळी दिले.
            यावेळी आमदार नारायण कुचे, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हाउपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांच्यासह अधिकारी व शेतकऱ्यांची  उपस्थिती होती


अंबड तहसिल कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट
            अंबड येथील तहसिल कार्यालयास जिल्हाधिकारीरवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन तेथील कामकाजाचा महसुल अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
            यावेळी उप विभागीय अधिकारी शशीकांत हदगल, तहसिलदार श्री शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
*******           

मौजे निरखेडा येथील सोयाबीन पेरलेल्या शेतीची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडून पाहणी




जालना (जिमाका) दि. 24 :-   खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली. पेरणीनंतर काही गावातील बियाणांची उगवण होत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जालना तालुक्यातील मौजे निरखेडा येथील श्री जाधव या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन महाबीजकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्याची कमी पेरणी झालेल्या क्षेत्राची पहाणी करुन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
     यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी श्री गाडे, मोहीम अधिकारी श्री कराड, मंडळ कृषी अधिकारी श्री सुखदेवे, कृषी सहाय्यक श्रीमती कुलकर्णी व गावातील शेतकरी उपस्थित होते.
000000

Tuesday 23 June 2020

सामाजिक अंतर न राखणारे 72 व्यक्तीकडून 14 हजार 400 रुपये व तोंडाला मास्क न लावणा-या 15 नागरिकांकडून 7 हजार 500 रुपये दुकानदाराकडुन 200 रुपये असा 23हजार 900 रुपये दंड वसुल


असा 23हजार 900 रुपये दंड वसुल
        जालना, (जिमाका) दि, 23 :- जिल्हा प्रशासनाकडून गठीत करण्यात आलेले एकूण 8 पथकाकडून शहरामध्ये सकाळच्या व दुपारच्या सत्रामध्ये सामाजिक अंतर न राखणारे नागरिक, तोंडाला मास्क न लावणारे नागरिक व इतर बाबींसाठी नागरिकांवर कार्यवाही करण्यात आली असून  पथकांमार्फत  सामाजिक अंतर न राखणारे 72 व्यक्तींकडून एकुण 14 हजार 400, तोंडाला मास्क न लावणा-या 15 नागरिकांकडून 7 हजार 500 रुपये आणि सामाजिक अंतर न राखणा-या  एका दुकानदाराकडून 200 रुपये असे एकूण 23 हजार 900 रुपये दंड आकारण्यात आला असल्याचे, उपपोलीस अधिक्षक जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
                    तसेच नगर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रतिबंध क्षेत्रांमध्ये हातगाडीवर भाजीपाला व फळे विक्रेते यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली  आहे.
-*-*-*-*-*-*-



जिल्हास्तरीय बँकर्स समितीची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न


            जालना दि. 23 :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज दि. 23 जुन रोजी जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सन 2020-21 वार्षिक पतपुरवठा आराखड्यामध्ये तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
            या बैठकीस अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी निशांत ईलमकर, नाबार्डचे पी.जी. भागवतकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, संतोष शर्मा, ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक               श्री वानखेडे, एसबीआय बँकेचे श्री सदावर्ते, अग्रणी बँकचे श्री तावडे, प्रदीप जोशी यांच्यासह विविध बँकांचे व्यवस्थापकांची उपस्थिती होती.
            या आराखड्यामध्ये पीककर्जासाठी 1 हजार 600 कोटी, दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी 400 कोटी, तर लघु व मध्यम उद्योगासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यावेळी वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे तसेच महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार संस्था यांच्या सन 2019-20 वार्षिक कार्य अहवाल पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
*******

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत चारचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरु


          जालना, दि. 23 - सदयस्थितीत चालु असलेली एमएच-21 बीएफ---ही मालिका पुर्ण होत आलेली असून दि.29 जुन 2020 पासुन एमएच 21 बीक्यु (MH-21BQ) ही चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,असेआवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
*******

लक्ष्मी कॉटेक्स कापुस खरेदी केंद्रास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट एकाही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही याची दक्षता घ्या



जालना, दि. 23 – जालना येथे सीसीआयच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या लक्ष्मी कॉटेक्स या कापूस खरेदी केंद्राला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची पहाणी करुन एकाही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना यावेळी दिले.
            या पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमवेत अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हाउपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, जिनिंगचे मालक रमेशजी मुंदडा, ग्रेडर हेमंत ठाकरे  आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जिल्ह्यामध्ये विक्रीविना पडून असलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाचे दोनवेळेस सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जिल्हयात चार ठिकाणी अशाच पद्धतीचे कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असुन या केंद्राच्या माध्यमातुन कापसाची खरेदी करण्यात येत आहे.  जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याचा कापूस विक्रीवाचुन पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.  जिनिंग मालकांच्या असलेल्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
*******