Saturday 31 October 2020

जिल्ह्यातील मृत्यूदर कमी होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा -- पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

 



   जालना, दि. 31 (जिमाका):-  जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचा प्रमाण  चांगले असले तरी मृत्यू दर कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्न करण्याचे निर्देश  राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांबरोबरच खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते.

         यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी श्रीमती निमा अरोरा, टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडीत, डॉ. आनंद निकाळजे, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, डॉ. श्रीमती पद्मजा सराफ, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, डॉ. कडले, डॉ. घोडके, डॉ. संजय जगताप, कल्याण सपाटे,  जालना येथील इंडीयन मेडीकल असोसिएशनचे तज्ञ्ज डॉक्टर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

       पालकमंत्री श्री टोपे म्हणाले,  जिल्ह्यात कोरोना विषाणुने बाधित झालेल्या रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार देण्यासाठी सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच पुरेशा प्रमाणात मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होत असले तरी   जिल्ह्यातील मृत्युचा दर कमी करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.  गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी टेलिआयसीयुसह इतर सुविधा जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून रुग्णांवर उपचारासाठी मुंबई, दिल्ली येथील डॉक्टरांची मदत घेण्यात यावी.  जिल्ह्यात असलेल्या आयएमएच्या तज्ज्ञ डॉक्टरांचीही रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत घेण्याबरोबरच कोरोनाबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये भिती बसलेली असुन रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच त्यांचे समुपदेशही करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

      टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉ. राहुल पंडित यांनी आज जालना येथील जिल्हा रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची तपासणी केली. जिल्ह्यातील कोविड बाधितांवर उपचारासाठी श्री. पंडित यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असल्याचे सांगत रुग्णांच्या तपासण्या, रेमेडिसेंविर  औषधाचा वापर, रुग्णांना योग्य औषधे देणे याबाबतीमध्ये श्री. पंडित यांनी मार्गदर्शन केले.    जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र असा इन्टेन्सिव्ह केअर विभाग  उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून आय. सी.यु. मधील सर्व डॉक्टर,नर्सेस यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. जालन्याला आरोग्य क्षेत्रात पुढे घेऊन जाण्यासाठी श्री. पंडित यांच्या भेटीचा मोठा उपयोग होणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले. 

पालकमंत्री श्री. टोपे यांच्या उपस्थितीत डॉक्टर राहुल पंडित यांच्या हस्ते 20 के.एल. ऑक्सीजन प्लांटचा शुभारंभ

  जालना येथील जिल्हा रुग्णालय मध्ये उभारण्यात आलेल्या 20 के.एल. क्षमता असलेल्या ऑक्सीजन प्लांटचा डॉक्टर राहुल पंडित यांच्या हस्ते ‍फित कापुन शुभारंभ करण्यात आला.  यावेळी  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. निकाळजे, डॉ. संजय जगताप, डॉ. घोडके,आदींची  उपस्थिती होती.

     यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले जालना येथे यापूर्वी 20 के. एल. क्षमतेच्या प्लांटची उभारणी करण्यात आली असून आज नव्याने 20 के. एल.क्षमतेच्या प्लांटचा शुभारंभ करण्यात आला आहे.रुग्णालयात असलेल्या 500 बेडसना पूर्ण क्षमतेने ऑक्सिजनचा पुरवठा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

-*-*-*-*-*-

जिल्ह्यात 70 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 247 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 31 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 247 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  कुंडलीका फार्म -1, एमआयडीसी नीढोना -4,  सोनल नगर -1, कन्हैया नगर -1, शिवनगर -2, रामनगर -1, साडेगाव -1, भाग्यनगर -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर  -1, डाहा -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -3, आनंदवाडी -1,घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी -4, जांब समर्थ -2, माहेर जवळा -1, बाचेगाव -1, बोडखा -1, घोन्सी बुद्रुक -1,घांगरा तांडा -1, नागोबाजी वाडी -3, कुंभार पिंपळगाव -1, भांबेरी -1, शिवनगाव -8, अंबड तालुक्यातील  जामखेड -1, म्हाडा कॉलनी -2,  शीरसगाव -2, अंबड शहर -2, गंगा चिंचोली -2, वडीगोद्री -1,यशवंत नगर -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, दरेगाव -1, नजीक पांगरी -1, भोकरदन तालुक्यातील आन्वा -1, तुपेवाडी -2, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -9, औरंगाबाद -1, बीड -1,अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 70  तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 70 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16724 असुन  सध्या रुग्णालयात-242 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5857 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-283 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-68874 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -70 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10799 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-57258 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने- 490, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4923

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-19, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5371 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -32, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 73 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-242, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 32, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-247, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-9817, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-697 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-167098 मृतांची संख्या-285     

               जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.      

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 71 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-1, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-16, के.जी.बी.व्ही.परतुर-10, के.जी.बी.व्ही.मंठा -5,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड -20,शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-10, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-6, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-00, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2  भोकरदन- 1, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -2

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

70

10799

डिस्चार्ज

247

9817

मृत्यु

2

285

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

219

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

66

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्हीटी रेट

283

70

38995

8522

21.85

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्हीटी रेट

25

00

30017

2277

7.59

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्हीटी रेट

308

70

69012

10799

15.65

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78676

 होम क्वारंटाईन            62194

 संस्थात्मक क्वारंटाईन   16482

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

276

 होम क्वारंटाईन        205

संस्थात्मक क्वारंटाईन  71

एकुण सहवाशितांची संख्या

167098

हाय रिस्क   62912

लो रिस्क    104186

 रिकव्हरी रेट

90.91

मृत्युदर

2.64

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4597

 

अधिग्रहित बेड

315

 

उपलब्ध बेड

4282

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

186

 

उपलब्ध बेड

434

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

56

 

उपलब्ध बेड

399

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

99

 

उपलब्ध बेड

96

ऑक्सिजन बेड क्षमता

 

405

 

अधिग्रहित बेड

121

 

उपलब्ध बेड

284

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

8

 

उपलब्ध बेड

106

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

73

 

उपलब्ध बेड

3449

 

-*-*-*-*-*-*-