Tuesday 31 May 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी साधला दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद सर्वसामान्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटीबध्द -- पालकमंत्री राजेश टोपे

 





            जालना, दि. 31 (जिमाका) --- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आज  विविध राज्यातील लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.  तर  जिल्हास्तरावरील कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य  व कुटुंब कल्‍याण आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी  शासनाव्दारे विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ तळागळातील लोकांना मिळण्यासाठी शासन नेहमीच कटीबध्द आहे. पात्र लाभार्थींनीही केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा अवश्य लाभ घेऊन आपली प्रगती करावी, असे आवाहन  केले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी  व मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांनी आज  विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी  दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  शिमला येथील  राष्ट्रीय कार्यक्रमाव्दारे  तर  मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांनी मुंबई येथून  संवाद साधला.  

श्री. मोदी यांनी  सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी  केंद्र शासन समर्पित  भावनेने काम करीत  आहे. यापुढेही  जास्तीतजास्त गरजूंना  विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही देऊन आपल्या भाषणात केंद्र शासनाने देश व जनतेसाठी केलेल्या कार्याबददल मार्गदर्शन केले.  त्यांनी यावेळी विविध राज्यातील  लाभार्थ्यांशी आपुलकीने दिलासादायक संवाद साधला.  याप्रसंगी त्यांच्या हस्ते कळ दाबून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेतंर्गत देशातील दहा हजार कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपये 21  हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरीत करण्यात आली.  

तर जिल्हास्तरावर  जालना येथील  शौर्य रिसॉर्ट  ॲण्ड लॉन्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री राजेश टोपे यांनी मार्गदर्शन केले.  माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी  डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल आदींसह स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसह  लाभाथी व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री  श्री. टोपे म्हणाले की, लोकहितासाठी  केंद्र व राज्य शासनाच्या  अनेकविध योजना आहेत.  राज्याची रमाई आवास योजना आहे, तशीच केंद्राची  प्रधानमंत्री आवास योजना आहे.  प्रधानमंत्री  जन आरोग्य योजनेप्रमाणेच  महात्मा  जोतिराव फुले  जन आरोग्य योजना आहे.  बेरोजगार तरुणांसाठी मुद्रा योजना आहे.  या योजनांचे निकष जरी वेगळे असले तरी  या योजनांमधून लोकांचे कल्याण साधले जाते.  शेतकरी, विदयार्थी, कामगार, आदिवासी,  उदयोग, अल्पसंख्याक  या सर्वांसाठीच वेगवेळया प्रकारच्या अनेक योजना आहेत. त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देणे शासनाचे कर्तव्य आहे.  त्यादृष्टीने प्रशासनाकडून  प्रभावीपणे योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांची प्रगती  साधली जावून आपसुकच  गाव, तालुका, जिल्हा व देशाची  प्रगती  होते.

 

-*-*-*-*-*-*-*-

केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंधरा जिल्ह्यातील लाभार्थींशी साधला संवाद पक्षभेद, राजकारण विसरून लोकांपर्यंत लाभ पोहचविणे महत्वाचे

 


 

मुंबई दि ३१ :  योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते.  हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

            विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सहयाद्री अतिथीगृहातून संवाद साधतांना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.

यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी मुंबईमधील यासीन शब्बीर शेख, निशा शर्मा, कुंजू पवार या महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्रही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले.

 

योजनांमध्ये राज्याचा मोठा सहभाग

केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही 40 टक्के वाटा आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने अगदी तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचविले आहेत आणि लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की हीच आपल्या आयुष्याची कमाई वाटते.

 

महाराष्ट्राच्या प्रभावी कामगिरीचे  कौतुक

प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात ५,००,००० घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही ५ लाख घरे बांधत आहोत. ३५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की. २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशनमध्ये  १९ लाख कुटुंबास नळ जोडणी व पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा देण्यासाठी  १९०० कोटी इतका निधी उपलब्ध करू दिला आहे.

 

याशिवाय पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना स्वच्छ भारत योजना (ग्रामीण व शहरी) इतर केंद्र शासन पुरस्कृत योजना राबविण्यात राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरीय यंत्रणाच्या सक्रीय सहभाग व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे योजनांचा लाभ पोहचविणे शक्य झाले असेही ते म्हणाले.

 

व्याज परतावा सुरू करा

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांना देखील केंद्राने बंद केलेला पीक कर्जावरील दोन टक्के व्याज परतावा परत सुरू करावा व लाखो शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी विनंती केली.

 

अंमलबजावणीचा दुष्काळ महाराष्ट्रात नाही

केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या घटकांपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगोदरच्या पिढ्यांनी लढा दिला आहे. आपल्या देशातल्या लोकांना समाधानाने जीवन जगावे लागता यावे म्हणून प्रयत्न करून या पिढ्यांचे योगदान सार्थ ठरवते अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी महाआवास त्रैमासिक, आझाद का अमृत महोत्सव प्रगती अहवाल, मिशन महाग्राम या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी साधलेल्या संवादात, नगर जिल्ह्यातील दरेवाडीचे मीरा कारंडे, लोणी बुद्रुकचे विनोद पारखे, चांदेगावचे सुखदेव उबाळे, कोल्हापूर जिल्ह्यातील हसुर दुमालाचे जिजाबाई पाटील, सांगरुळचे लक्ष्मी साठे, अर्जूनीचे नितीन आढाव, नाशिक जिल्ह्यातील कवनईचे आनंद पाटील, सटवाई वाडीचे नामदेव मेधाने, बागलाणचे मीरा पवार, नागपूर जिल्ह्यातील भंडारबोडीचे मीराबाई गणवीर, सुमन दोनारकर, खेर्डीचे संगीता निकम, औंरगाबाद जिल्ह्यातील रायपूर येथील बाळू राऊत, भराडीचे कृष्णा महाजन, फुलंब्रीचे सुवर्णा भुईगल या लाभार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.

-*-*-*-*-*-*-

 

वृत्त क्र. 485                                                                                                                        दि.31.5.2022

चांगले आरोग्य राखण्यासाठी तंबाखू खाणे टाळावे – अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे

विविध स्पर्धा, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तंबाखू विरोधी जनजागृती

 

जालना, दि. 31 (जिमाका) – चांगले आरोग्य राखण्यासाठी तंबाखू खाणे टाळावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना आणि जिल्हा प्रशासन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने व धरतीधन ग्रामविकास संस्था यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, समाज कल्याण कार्यालय, जालना येथे आज आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. पिनाटे बोलत होते.

कार्यक्रमास दंत शल्य चिकित्सक डॉ. अतुल देशमुख, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र गायके, एनटीपीसी जिल्हा समन्वयक संदीप गोरे, नर्सिंग कॉलेजच्या प्रचार्या सुनिता रायकर, एमसीईडीच्या प्रकल्प अधिकारी भारती सोसे, बार्टीचे जिल्हा समन्वयक मुंजाजी कांबळे, क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक संतोष देशमुख, धरतीधन ग्राम विकास संस्था, जालनाचे अध्यक्ष मिलिंद सावंत, समुपदेशक सोनाजी भुतेकर उपस्थित होते.

यावेळी रांगोळी, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  डॉ. अतुल देशमुख, डॉ. राजेंद्र गायके, संदीप गोरे यांनी उपस्थितांना तंबाखू, धुम्रपान आणि गुटखा आदी सारख्या आरोग्यास घातक सवयी आणि त्यांच्या दुष्परीणामांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी केले, सूत्रसंचालन मिलिंद सावंत यांनी केले व आभार प्रदर्शन सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान केंद्र शासनाचे पंजीकृत कलापथक शाहीर परिहार आणि संच, जालना यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे तंबाखू विरोधी विषयावर जनजागृती करण्यात आली.

यावेळी आयोजित चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धेत नर्सिंग कोलेज च्या सर्व विद्यार्थिनींनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. यातील चित्रकला स्पर्धेतील भाग्यश्री गणेश रेटावाल, शितल सखाराम राउत, वैष्णवी निवृत्ती वायाळ आणि कांचन गजानन भारसाकळे यांनी, रांगोळी स्पर्धेतील भाग्यश्री रेटावाल, शितल राउत, निकिता मोरे, भारती कातीरे, निकिता करपे, आणि अन्विता साळवे यांनी आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील अपूर्वा संदीप आल्हाद, प्रमोद सोनुने, जाकिर शेख, डॉ. जालिंदर प्रभाकर ढिल्पे आणि कोमल आल्हाद मधाडे या पुरस्कार विजेत्यांना क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद तर्फे बक्षीस व आरोग्य विभागातर्फे प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. यावेळी सर्वांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचे प्रदीप पवार, प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार, धरतीधान ग्राम विकास संस्था चे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

चांगले आरोग्य राखण्यासाठी तंबाखू खाणे टाळावे – अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे विविध स्पर्धा, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तंबाखू विरोधी जनजागृती

 





 

जालना, दि. 31 (जिमाका) – चांगले आरोग्य राखण्यासाठी तंबाखू खाणे टाळावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना आणि जिल्हा प्रशासन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने व धरतीधन ग्रामविकास संस्था यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, समाज कल्याण कार्यालय, जालना येथे आज आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. पिनाटे बोलत होते.

कार्यक्रमास दंत शल्य चिकित्सक डॉ. अतुल देशमुख, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र गायके, एनटीपीसी जिल्हा समन्वयक संदीप गोरे, नर्सिंग कॉलेजच्या प्रचार्या सुनिता रायकर, एमसीईडीच्या प्रकल्प अधिकारी भारती सोसे, बार्टीचे जिल्हा समन्वयक मुंजाजी कांबळे, क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक संतोष देशमुख, धरतीधन ग्राम विकास संस्था, जालनाचे अध्यक्ष मिलिंद सावंत, समुपदेशक सोनाजी भुतेकर उपस्थित होते.

यावेळी रांगोळी, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  डॉ. अतुल देशमुख, डॉ. राजेंद्र गायके, संदीप गोरे यांनी उपस्थितांना तंबाखू, धुम्रपान आणि गुटखा आदी सारख्या आरोग्यास घातक सवयी आणि त्यांच्या दुष्परीणामांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी केले, सूत्रसंचालन मिलिंद सावंत यांनी केले व आभार प्रदर्शन सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान केंद्र शासनाचे पंजीकृत कलापथक शाहीर परिहार आणि संच, जालना यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे तंबाखू विरोधी विषयावर जनजागृती करण्यात आली.

यावेळी आयोजित चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धेत नर्सिंग कोलेज च्या सर्व विद्यार्थिनींनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. यातील चित्रकला स्पर्धेतील भाग्यश्री गणेश रेटावाल, शितल सखाराम राउत, वैष्णवी निवृत्ती वायाळ आणि कांचन गजानन भारसाकळे यांनी, रांगोळी स्पर्धेतील भाग्यश्री रेटावाल, शितल राउत, निकिता मोरे, भारती कातीरे, निकिता करपे, आणि अन्विता साळवे यांनी आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील अपूर्वा संदीप आल्हाद, प्रमोद सोनुने, जाकिर शेख, डॉ. जालिंदर प्रभाकर ढिल्पे आणि कोमल आल्हाद मधाडे या पुरस्कार विजेत्यांना क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद तर्फे बक्षीस व आरोग्य विभागातर्फे प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. यावेळी सर्वांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचे प्रदीप पवार, प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार, धरतीधान ग्राम विकास संस्था चे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

 

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



     जालना दि.31 (जिमाका) :-    पुण्यश्लोक राजमाताअहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

      यावेळी तहसिलदा  प्रशांत पडघन, नायब तहसिलदार प्रभाकर घुगे, श्री. पुराणिक, श्रीमती मोरे,श्रीमती डिघुळे आदिंची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

Monday 30 May 2022

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेबाबत पंतप्रधानांचे ऑनलाईन मार्गदर्शन पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ११ अनाथ बालकांना प्रमाणपत्र वाटप बालकांसोबत पालकमंत्री यांनी साधला दिलासादायक संवाद सर्वतोपरी सहकार्य करण्याचे दिली ग्वाही

 




 

            जालना, दि. 30 (जिमाका) ---  कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत महत्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमास जिल्ह्यातील 11 अनाथ बालके यावेळी उपस्थित होते. त्यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे मुलांना संदेशपत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी बालकांसोबत दिलासादायक संवाद साधला.

            यावेळी आमदार बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती.आर.एन.चिमंद्रे यांच्यासह  महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            पंतप्रधानांनी यावेळी तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्वाच स्थान आहे ते करीत जा, असा संदेश बालकांना उद्देशून दिला. कोरोनामुळे जालना जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या मुला-मुलींची संख्या 11 आहे. हे सर्व आज उपस्थित होते. त्यांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेव  ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे शुभेच्छा पत्र अशा साहित्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

            पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी बालकांसोबत आस्थेवाईपणे संवाद साधत त्यांच्या आरोग्य आणि शाळेच्या प्रवेशाबरोबरच  शिक्षणाविषयी मनमोकळा संवाद साधला, आपलेपणाच्या भावनाने जिल्हा प्रशासन आपल्याला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले. तुम्ही  चांगला अभ्यास करा आणि विविध क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवा, यासाठी मदतीसह आमच्या शुभेच्छा आहेत. चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षण पूर्ण करा. समाज आपल्या सोबत आहे. तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत, असा दिलासाही श्री. टोपे यांनी उपस्थित बालकांना दिला.

कोविड – 19 या महामारीमुळे ज्या बालकांच्या दोन्ही पालक / कायदेशीर पालक / दत्तक पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी मा. पंतप्रधान यांनी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन या योजनेची घोषणा दि. 29 मे 2021 रोजी केली. या योजनेचे उद्दीष्ट दि. 11 मार्च 2020 ते दि.28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत कोविड – 19 च्या संसर्गामुळे ज्या बालकांनी त्यांचे दोन्ही पालक / कायदेशीर पालक / दत्तक पालक गमावले आहेत अशा बालकांना आधार देणे हे आहे.

            या योजनेचा उद्देश या बालकांची सर्व समावेशक काळजी व शाश्वत रीतीने संरक्षण सुनिश्चित करणे आणि आरोग्य विम्याद्वारे आरोग्य सक्षम करणे, त्यांना शिक्षणाद्वारे सक्षम करणे.तसेच त्यांना त्यांच्या वयाच्या 23 वर्षे पुर्ण झाल्यावर स्वयंपुर्ण अस्तित्वासाठी आर्थिक पाठबळ देणे हे आहेत.

            जालना जिल्हयात कोविड – 19 संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 11 आहे. सदर बालके या योजनेसाठी पात्र असुन त्यांना योजनेचा लाभ मिळवुन देणेसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही पुर्ण झालेली आहे.

            Pmcaresforchildren.in या संकेतस्थळावर दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 11 बालकांची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मा.बाल कल्याण समितीची यांस मंजुरी घेऊन मा.जिल्हाधिकारी यांची देखील सदर पोर्टलवर ऑनलाईन मान्यता घेण्यात आलेली आहे. सदर बालकांचे व मा.जिल्हाधिकारी यांचे संयुक्त खाते मुख्य पोस्ट कार्यालयात उघडण्यात आले आहे.

            पीएम केअर अंतर्गत बालक व मा.जिल्हाधिकारी यांचे संयुक्त पोस्ट खात्यात दोन्ही पालक गमावलेल्या सर्व 11 बालकांच्या त्यांच्या वयोगटानुसार रक्कम दि. 26 एप्रिल 2022 रोजी जमा झालेली आहे. त्याबाबतचे पासबुक, हेल्थ कार्ड, स्नेह पत्र, मा.पंतप्रधान यांचे बालकांना पत्र व सदर योजनेची माहितीपत्रिका असलेली कीट बालकांना पालकमंत्री यांच्या हस्ते आज  वितरीत करण्यात आली.

कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड.अश्विनी धनावत व रामदास जगताप, अधिक्षक अमोल राठोड, आदींसह सचिन चव्हाण, विनोद दाभाडे,  सुरेखा सातपुते, प्रतिभा सुरडकर, रेणुका चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते. 

-*-*-*-*-*-*-*-

6 जुन रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

 


    जालना,  दि. 30 (जिमाका)  - जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दिनांक 6 जुन 2022 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.  लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनदेखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा. लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्वी, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत.  तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना http://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

                                                  -*-*-*-*-*-

Friday 27 May 2022

पंडीत दिनदयाळउपाध्याय रोजगार मेळाव्याचे 28 मे रोजी जालना येथे आयोजन

 


 



 

    जालना दि. 27 (जिमाका) :-    जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना यांचे मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त आयोजित  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 28 मे,2022 शनिवार रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वाजपर्यत मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय, सिरसवाडी रोड, रेल्वे उड्डाण पुलाशेजारी, जालना येथे आयोजित करण्यात आला आहे.  या मेळाव्याच उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याहस्ते होणार आहे.

    एसएससी, एचएससी, आयटीआय, ग्रॅज्युएट्‌स, इंजिनिअर्स  यांचेसाठी एकूण  733 रिक्तपदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 7 कंपन्यांचे  प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

             या रोजगार मेळाव्यामध्ये  चाकण, पुणे येथी महिद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा लि. यांची अप्रेंटिस व ट्रेनी म्हणून आयटीआय फिटर,वेल्डर, इलेक्ट्रिशियन,डिजेल मेकॅनिक,मोटर मेकॅनिक,शिट मेटल वर्कर एकुण 130 पदे आणि दहावी, बारावी , डिप्लोमा व पदवीधर यासाठी एकुण 370 पदे आहेत.

          नवभारत फर्टिलाजर, औरंगाबाद यांची सेल्स ट्रेनी म्हणून दहावी, बारावी व पदवीधर यांचेसाठी एकुण 101 पदे आहेत. जालना येथील विनोदराय इंजिनिअरिंग यांचेकडे ट्रेनी ऑपरेटर आयटीआय वेल्डर,शिट मेटल,फिटर  एकुण 6 पदे आणि ट्रेनी डिजायनर, इंजिनियरींग पदवी (बी.ई.,बी.टेक-मेकॅनिकल किंवा एम.ई.,एम.टेक-मेकॅनिकल) यांची 2 पदे आहेत. जालना येथील विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. यांचेकडे मशिन ऑपरेटर 4 पदे (दहावी व आयटीआय मशिनिष्ट), इलेक्ट्रीशन -1, मशिनिष्ट -1 व सॉप्टवेटर डेव्हलपर 1 , आणि अकाउंटंट 3 पदे (वाणिज्य पदवी आणि 24 महिने अनुभव  आवश्यक)  आहे. एल.जी.बालकृष्ण अँड ब्रदर्स प्रा.लि. जालना यांचेकडे  कॅज्युअल इपीपी ट्रेनी म्हणून 100 पदे (पात्रता दहावी ,बारावी, पदवीधर) आहेत. एन.आर.बी. लिमिटेड जालना यांचेकडे इपीपी ट्रेनी म्हणून 7 पदे ( पात्रता दहावी आणि आयटीआय टर्नर, फिटर,ग्रायंडर,मॅकेनिस्ट) आहेत. माळाचा गणपती येथील  ठाकुरजी सोलवेक्स प्रा.लि. जालना यांचेकडे अकाउटंट 2 पदे (वाणिज्य पदवी आणि टॅली), ट्रेनी 2 पदे (आयटीआय मॅशिनिस्ट), सिव्हिल इंजिनिअर 1 पद (बीई/बीटेक सिव्हील) इलेक्ट्रिशि2 पद (आयटीआय इलेक्ट्रिशीयन ),सॉप्टवेअर डेव्हलपर 1 पद( बीसिए,एमसिए)  अशी एकूण 733 रिक्तपदे प्राप्त झाली आहेत. या मेळाव्यासाठी वरील 7 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड भरती करणार आहेत.

 

                      या सुवर्ण संधीचा बेरोजगार उमेदवारांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तसेच, रोजगार  इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा फोटो आणि आधार कार्ड,सेवायोजन नोंदणीसह उपस्थित रहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच, यापुर्वी महारोजगार वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच, या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर  क्लिक करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळावा 1 (2022-2023)  या मध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी अ‍ॅप्लाय करावे, यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 02482-299033 वर संपर्क करावा. या मेळाव्यास नोकरी इच्छूक उमेदवारांनी  उपस्थित राहुन  मुलाखती द्याव्यात आणि या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संपत चाटे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, जालना यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-*-*-