Tuesday 24 May 2022

नगर परिषद प्रभाग रचनेवर हरकती व सुचनांबाबत सुनावणी संपन्न

 


जालना दि.24 (जिमाका) :-  राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या  आदेशानुसार जालना जिल्ह्यातील जालना, परतूर, अंबड, भोकरदन या चार नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुक -2022 मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे, रहिवाश्यांच्या माहितीसाठी व हरकतीसह सूचना मागविण्यात आल्या होत्या. सदर चार नगर परिषदांकडे प्राप्त झालेल्या हरकती व सूचना यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

जालना नगर परिषद  - 31, भोकरदन नगर परिषद – 00, परतूर नगर परिषद – 1, अंबड नगर परिषद -7, असे एकुण -39.     वरीलप्रमाणे प्राप्त हरकती व सुचनांवर सुनावणीकरीता हरकतीदारांना सुनावणीची लेखी नोटीसा मुख्याधिका-यांमार्फत देऊन सुनावणी दि. 23 मे 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेऊन प्रत्येक हरकतीदार/अर्जदार यांना समक्ष बोलावून त्यांचे हरकतीचे स्वरुप तपासून त्यांना प्रभागांच्या हद्दीबाबत असलेल्या हरकती संदर्भात गुगल अर्थच्या नकाशावर सध्याचे प्रारुप व हरकतदाराने प्रभागांच्या हद्दीबाबत प्रोजेक्टरच्या सहाय्याने स्क्रीनवर दाखविण्यात आले.

            वरील प्राप्त हरकती व सुचनांवर जिल्हाधिकारी यांनी अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे विभागीय आयुक्त, औरंगाबाद व राज्य निवडणुक आयोग, मुंबई यांच्याकडे माहिती पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी,  नगर विकास शाखा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment