Tuesday 25 September 2018

गोवर रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घेतला आढावा लसीकरणाबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याचे आवाहन





          गोवर आणि रुबेला या आजारांपासून मुला-मुलींना सुरक्षित करण्यासाठी जिल्हयात गोवर रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येत असून याबाबत करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा तसेच लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी धर्मरुगुरुंसाठी बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.  यावेळी जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारीचा आढावा घेतला घेतला.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कमलाकर फड,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, तहसिलदार संतोष बनकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. संतोष कडले, शहा आलम खान फिरोज खान, शेख रियाज गनी, काकड नसरुल्लाखान शफीउल्ला खॉ, शेख अफसर, शेख इमाम, श्रीमती कुरेशी हुर बी अब्दुल मजीद, श्रीमती शेख निामत बी अय्युब, श्रीमती आशा बेगम शेख चाँद, पठाण फेरोज खान हस्तेखान, शेख युनुस लालमियाँ, फय्याज खान पठाण, एजाज खान, श्रीमती रुगसाना अहेमद कुरेशी, श्रीमती आबेदा बी शेख महेबुब, शेख फरोज शेख अजीज, फरान फय्याज अन्सारी, श्रीमती कुरेशी नसरीन मुसा यांच्यासह विविध धर्माचे गुरु यावेळी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की, लहान वयाच्या मृत्युसाठी गोवर व रुबेला हे आजार मोठया प्रमाणात कारणीभूत ठरत असल्यामुळे केंद्र शासन व राज्य शासनाने राज्यात मोहिम राबविण्याचे निश्चित केले असून यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण, तसेच इतर विभागांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण तसेच ग्रामविकास विभागाची महत्वाची भूमिका राहणार आहे. प्रत्येक स्तरावरील यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील पात्र मुला-मुलींची अचूक माहिती गोळा करतांना एकही पात्र बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            लसीकरणाबाबत जनजागृती होण्यासाठी मदरसामधील 15 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांबरोबरच सर्व धार्मिक संस्थांनी त्यांच्याकडे होणाऱ्या बैठकांच्या माध्यमातुन तर सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये लसीकरणाबाबत नागरिकांना महत्व पटवून देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी  श्री बिनवडे यांनी यावेळी केले.
            यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी लसीकरणाबाबत करण्यात आलेल्या पूर्वतयारीची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली तर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले यांनी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेमध्ये अल्पसंख्याक संस्था, मदरसा प्रमुख यांच्या सहभागाचे महत्व पटवुन दिले. डॉ. दीपाली गायकवाड यांनी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेबाबत सविस्तर असे सादरीकरण केले.
            यावेळी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीच्या कामाचाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी आढावा घेतला.
*******


पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



            जालना, दि. 25 – पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 
             याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर,  तहसीलदार (सामान्य) संतोष बनकर, नायब तहसीलदार मयुरा पेरे, रवी कांबळे श्रीमती के.के.कुलकर्णी, श्रीमती आर.आर.महाजन, यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन केले.

Sunday 23 September 2018

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना समाजातील गोरगरीब कुटूबांच्या स्वास्थासाठी वरदान ठरेल -पालकमंत्री बबनराव लोणीकर




            जालना, दि. 23 – देशातील 50 कोटी नागरिकांना तसेच जालना जिल्ह्यातील 1 लाख 48 हजारपेक्षा अधिक कुटूंबाना आरोग्य सेवेचा लाभ देणारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना समाजातील गोरगरीब कुटूबांच्या स्वास्थासाठी वरदान ठरेल, असा विश्वास राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.
झारखंड रांची येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आयुष्मान भारत’योजनेचा राष्ट्रव्यापी शुभारंभ केला तर या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे पदुम राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे-पाटील, आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे,रघुनाथ तौर, घनश्याम गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते आदींची उपस्थिती होती. 
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, आजचा दिवस देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. जगातील सर्वात मोठ्या अशा शासकीय आरोग्य सुरक्षा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून करण्यात आला आहे. समाजामध्ये  गोरगरीब कूटुंबांना एखादा गंभीर स्वरुपाचा आजार जडल्यास आपल्या संपुर्ण आयुष्याची कमाई या उपचारामध्ये गमवावी लागते. कधी कधी तर उपचारासाठी पैसै नसल्या कारणाने  आपला जीवही गमवावा लागतो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजातील प्रत्येक गरिबाला उपचार मिळाला पाहिजे या विचारानेच आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात केली असल्याचे सांगत या योजनेमध्ये 1 हजार 122 आजारांचा समावेश करण्यात आला असुन या कुटूंबाना प्रतिवर्षी प्रतिकुटूंब आरोग्यासाठी रु.5 लक्ष विमा सरंक्षण राहणार आहे. या योजनेअतंर्गत त्या कुटूंबाना ठराविक आजारसाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. 
महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्मयतातुन राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या संकल्पनेतुन समाजातील प्रत्येक गोरगरीबांना मोफत उपचार देण्याचे काम करण्यात आले असुन या योजनांचा फायदा जालना जिल्ह्यातील अनेक रुग्णांना झाल्याचे सांगत देशातील 50 कोटी जनतेसाठी सुरु केलेल्या ऐतिहासिक अशा योजनेबद्दल त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही यावेळी व्यक्त केले. 
राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, भारत देशातील सर्वसामान्य कुटूंबातील नागरिकांसाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरु केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत एक हजार एकशे बारा आजरांचा समावेश असलेल्या या योजनेचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या अशा शासकीय आरोग्य सुरक्षा योजनेचा शुभारंभ केला आहे.  जगातील पहिली आरोग्य सेवा योजना अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी सुरू केली होती त्यात 10 कोटी लोकांना लाभ मिळत होता मात्र आयुष्यमान भारत योजनेमध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी देशातील 50 कोटी नागरिकांचा विचार केला आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठी योजना ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात गोल्डन ई-कार्डचेही वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी केले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, लाभार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******

Monday 17 September 2018

जवखेडा गावातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची राज्यपाल श्री विद्यासागर राव यांच्याकडून पहाणी




जालना, दि. 17 – भोकरदन तालुक्यातील जवखेडा येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांना महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी करत समाधान व्यक्त केले.
            यावेळी खासदार रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे,    जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय माईनकर, जलसंधारण अधिकारी श्री डोणगावकर, भास्करराव दानवे, आशाताई पांडे, शालीग्राम म्हस्के,घनश्याम गोयल  आदींची उपस्थिती होती.
            भोकरदन तालुक्यातील जवखेडा येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामास राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी करत या कामांमध्ये झालेल्या जलसंचयाच्या माहितीबरोबरच याचा शेतकऱ्यांना झालेल्या फायद्याची उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तदनंतर जगनराव मुकूंदराव दानवे यांच्या शेतात करण्यात आलेल्या शेततळयास प्रत्यक्ष भेट देऊन त्याचीही पहाणी राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी केली. 
            उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधताना राज्यपाल श्री विद्यासागर राव म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आज जालना येथे उपस्थित राहता आले याचा मनस्वी आनंद आहे.  हैद्राबाद संस्थानामध्ये महाराष्ट्रातील पाच जिल्हे, कर्नाटकचे तीन जिल्हे व तेलंगणाचे आठ जिल्ह्याचा समावेश होता. मुक्तीसंग्रामामध्ये मराठीपुत्रांचा फार मोठा वाटा होता.  जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अत्यंत चांगल्या पद्धतीची कामे झाली असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत असल्याचेही राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितले.
            या कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******

डॉ. बारवाले यांच्या कार्याची माहिती पाठ्यपुस्तकात समाविष्ठ करावी -राज्यपाल चे. विद्यासागर राव






            जालना, दि. 17 – डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे मुक्ती संग्रामातील  तसेच नेत्रसेवा आणि महिकोच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची माहिती नवीन पिढीला समजण्यासाठी शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ठ करावी असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.
            स्वर्गीय डॉ बारवाले यांनी स्थापन केलेल्या जालना येथील महिको रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टच्या श्री. गणपती नेत्रालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्ह्याचे पालकमंत्री  तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब दानवे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल,चेअरमन डॉ. राजेंद्र बारवाले, वैद्यकीय संचालक डॉ.ऋषिकेश नायगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
             मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मराठीत शुभेच्छा देवून राज्यपालांनी भाषणास सुरुवात केली. श्री. गणपती नेत्रालयाच्या गौरवपूर्ण् कार्याचा उल्लेख करुन ते म्हणाले की, ग्रामीण भागातील गोरगरीबांना गेल्या 10 वर्षापासून उत्तम आणि दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करुन देवून नेत्रालयात राज्यातील सर्वांत मोठी नेत्रपेढी निर्माण केली आहे. सामाजिक भान जपणाऱ्या श्री. गणपती नेत्रालयाच्या उभारणीत डॉ. बद्रीनारायण बारवाले यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्या  दुरदृष्टीला आणि कार्याला वाहिलेल्या नेत्रालयाची प्रगती अत्यंत उल्लेखनीय असून अंधत्व मुक्त गाव निर्माण करण्याची सुरु केलेली योजना अत्यंत गौरवास्पद आहे. असेही ते म्हणाले.
             डॉ. बारवाले यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या चरीत्रग्रंथाचे प्रकाशनही राज्यपालांच्या  हस्ते यावेळी झाले. त्या अनुषंगाने बोलतांना राज्यपालांनी डॉ बारवाले यांच्या  अनेक स्मृतींना उजाळा दिला व त्याचे कार्य नव्या पिढीला सदैव प्रेरणा देत राहील अशी भावना व्यक्त केली. डॉ. बारवाले  यांच्या उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी नेत्रालय, महिको या संस्था पुढाकार घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
             डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला जालना येथे कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करुन दिली असल्याचे सांगून या संस्थेची उभारणी लवकरात लवकर करुन विद्यापीठाने युवा पिढीला कौशल्यावर आधारीत गरजेनूसार अभ्यासक्रम तयार करावे व प्रशिक्षण देवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दयाव्यात असे आवाहन राज्यपालांनी  केले.
 जागतिक   तापमानवाढ आणि वातावरण  बदलाचा  परीणाम  मराठवाड्यासारख्या भागावर जास्त होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करुन राज्यपालांनी या संकटाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज प्रतिपादन केली.
 विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी  यावेळी बोलतांना नेत्रालयाच्या कार्याचा गौरव केला व गोरगरीब रुग्णांसाठी करीत असलेल्या दर्जेदार आरोग्य सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ.बारवाले यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
 पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी श्री. गणपती नेत्रालयाच्या दर्जेदार रुग्णसेवेमुळे जालना शहराचे नाव राज्यच नव्हे तर देशभर पोहोचल्याचे सांगत नेत्रालयाच्या उत्कृष्ट कार्याचा आपल्या भाषणात आढावा घेतला.  महिकोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन देवून कृषीक्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सांगून त्यांनी बारवाले कुटूंबाला शुभेच्छा दिल्या.  खासदार रावसाहेब दानवे यांनीही यावेळी नेत्रालयाच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करीत डॉ. बारवाले यांच्या दुरदृष्टी आणि सामजिक बांधिलकीबाबत आठवणी सांगितल्या.
 प्रांरभी श्री. गणपती नेत्रालयचे चेअरमन राजेंद्र बारवाले यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. डॉ. बद्रीनारायण  बारवाले यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आज विस्तार पाहता वटवृक्ष झाला आहे. यामध्ये त्यांच्या समवेत अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले. सुसज्ज नेत्रालयातून 1 लाख 98 हजार इतक्या मोठ्या प्रमाणात नेत्र शस्त्रक्रिया करण्यात यश मिळाले असून निवारणीय अंधत्व मुक्त गावांची संकल्पना राबविण्यातही नेत्रालय यशस्वी होत आहे. यापुढेही  माफक दरामध्ये अति उच्च दर्जाची आरोग्य सेवा पूरविण्यास कटिबद्ध  असल्याचे  त्यांनी सांगितले. श्री गणपती नेत्रालयाने नेत्रसेनेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत जिल्ह्यातील चार गावे निवारणीय अंधत्व मुक्त गावे म्हणून घोषित केली. त्यापैकी पिंपळगाव थोटे ता. भोकरदन आणि रामखेडा ता. बदनापूर या गावांच्या सरपंचांचा राज्यपाल यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला
 या  कार्यक्रमास खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राजेश टोपे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, नेत्रालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. नम्रता काबरा यांनी केले. 
***-*-*-*-*-
.

Monday 10 September 2018

गुणवत्तापूर्ण शिक्षणावरच भर – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर





            जालना, दि. 10 – देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्याची बीजे शिक्षणातच असुन नाविन्यपूर्ण शोध, अनुसंधान या बाबींवर भर देऊन देशाच्या प्रगतीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
            जालना एज्युकेशन सोसायटीचे आर.जी. बगडिया कला, एस.बी. लखोटीया वाणिज्य व आर. बेझंजी विज्ञान महाविद्यालयाच्या हिरक महोत्सव सांगता समारंभप्रसंगी जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री जावडेकर बोलत होते.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पदुम राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, आमदार अतुल सावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. बी.ए. चोपडे, प्र. कुलगुरु प्रो. डॉ. अशोक तेजनकर, पुरुषोत्तम बगडिया,फुलचंद भक्कड, हेमेंद्र लखोटीया, जवाहर काबरा, रसायन तंत्रज्ञान केंद्राचे कुलगुरु डॉ. यादव, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवतराव कराड, भास्करराव दानवे, भास्करराव आंबेकर, रामेश्वर भांदरगे-पाटील, घनश्याम गोयल, किशोर शितोळे आदींची उपस्थिती होती.
            केंद्रीय मंत्री श्री जावडेकर म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशात राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ अनेक थोर नेत्यांनी सुरु केली.  त्यामुळेच आज आपण शिक्षण क्षेत्रात प्रगत आहोत.  शिक्षण ही देशाला तारुण नेणारी बाब असुन शिक्षणामध्ये गुणवत्ता हीच प्राथमिकता असुन सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलीला जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचवण्याची ताकद केवळ शिक्षणामध्ये असुन शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या संस्थांना विविध योजनांच्या माध्यमातुन बळकट करण्याचा शासनाचा प्रयत्न असुन देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासन अनेकविध उपक्रम राबवित असल्याचेही  केंद्रीय मंत्री श्री जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

            प्रत्येकाला शिक्षण मिळाव यासाठी स्वयंम सारखा उपक्रम सुरु करण्यात आला असुन या माध्यमातुन प्रत्येक इच्छुकाला ऑफलाईन व ऑनलाईन शिक्षण देण्याच काम करण्यात येत असुन या माध्यमातुन 23 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.  9 वी ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल बोर्डच्या माध्यमातुन शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असुन प्रत्येकाला शाश्वत नोकरीची हमी देणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणावरही भर देण्यात येत असल्याचेही केंद्रीय मंत्री           श्री जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, गेल्या साठ वर्षामध्ये जेईएस महाविद्यालयाने मोठी प्रगती केली असुन अनेक विद्यार्थी या महाविद्यालयाने घडविले आहेत. समाजातील प्रत्येक गोरगरीब  व सर्वसामान्यांच्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याच काम केंद्रीय मंत्री श्री जावडेकर यांच्या पुढाकाराने होत असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर दहा ते अकरावर्षानंतर जेईएस महाविद्यालयाची स्थापना झाली असुन गेल्या 60 वर्षाच्या कालखंडामध्ये या महाविद्यालयाने अनेक गुणवंत विद्यार्थी घडविण्याची काम केलं.  याच महाविद्यालयातून आपणही शिक्षण घेतले असुन महाविद्यालयानेच आपल्याला संस्काराची शिदोरी दिल्याचे सांगत महाविद्यालयाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
            अध्यक्षीय भाषणात खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्या काळात शिक्षणाच्या अपुऱ्या संधी होत्या त्या काळात जेईएस महाविद्यालयाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. महाविद्यालयाने दिलेली शिक्षणाची शिदोरी आयुष्यभर  पुरणार असल्याचे सांगत शिक्षणाच्या बाबतीत जिल्हा मागे असुन जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होत असताना जिल्हा शैक्षणिक विकासातही अग्रेसर राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.  जिल्ह्यात आयसीटी महाविद्यालय सुरु करण्यात आले असुन कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी स्कील डेव्हलपमेंट इनस्टीट्युटही सुरु करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. बी.ए. चोपडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
            कार्यक्रमाचे संचलन सुरेश केसापुरकर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांनी मानले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह जेईएस महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******

Thursday 6 September 2018

परतूर शहराचा चेहरामोहरा बदलणार परतूर शहराच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी गटातटाचे राजकारण न करता विकास कामाला सहकार्य करा - पालकमंत्री बबनराव लोणीकर





            जालना, दि. 6 – परतूर शहरामध्ये 200 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातुन विविध विकास कामे करण्यात येत आहे.  येणाऱ्या काळात परतूर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा आपला मानस असुन पदाधिकाऱ्यांनी गटातटाचे राजकारण न करता विकास कामांना सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            परतूर येथे 45 कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाचे भूमिपुजन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, मोहन अग्रवाल, रामेश्वर तनपुरे, रमेश भापकर, गणेश खवणे, प्रदीप ढवळे, अशोकराव बरकुले, शहाजी राक्षे, भगवानराव मोरे, बद्रीनारायण ढवळे, बी.डी. पवार, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसिलदार राजाभाऊ कदम, मुख्य अभियंता के.टी. पाटील, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता श्री सोनलकर आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, परतूर शहराची लोकसंख्या वाढत आहे.  वाढत्या लोकसंख्येनुसार नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करुन घेण्यात येत असुन परतूर शहराच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेण्यात आला असुन या माध्यमातुन विविध विकास कामे करण्यात येत आहेत.  परतूर शहरामध्ये अद्यावत अशा नाट्यगृहाच्या उभारणीबरोबरच न्यायालयाची दर्जेदार अशा इमारतीबरोबरच शादीखाना, स्मशानभूमी यासारखी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करण्यात येत असुन गेल्या चार वर्षात नगरपालिकेला विविध विकास कामांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            परतूर शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम बऱ्याच दिवसापासून रखडले होते.  यापूर्वी हा पुल गावामध्ये तयार करण्यात येणार होता.  परंतू स्थानिक व्यापाऱ्यांनी हा पुल गावातून गेल्यास येथील व्यवसाय धोक्यात येणार असल्याचे सांगून हा पुल इतरत्र वळविण्याची मागणी केली होती.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करुन या पुलाचा मार्ग बदलण्यात आला असुन यामुळे येथील व्यापार टिकण्याबरोबरच या उड्डाणपुलामुळे सुमारे 100 पेक्षा अधिक गावातील गावकऱ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न मिटणार असुन ज्या व्यापाऱ्यांच्या दुकानाची जागा यामध्ये संपादित करण्यात आली आहे त्यांना मावेजापोटी 9 कोटी 28 लक्ष रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            परतूर शहरातील वीज व्यवस्था सुरळीत होऊन नागरिकांना योग्य क्षमतेने वीज पुरवठा व्हावा यासाठी 21 ट्रान्सफार्मर कार्यान्वित करण्यात आले असुन चारशे पोल बदलण्यात येत आहेत. सह किलोमीटर एचटी लाईन, बारा किलोमीटर एलटी लाईन तसेच 19 किलोमीटर ए.बी. केबलही टाकण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठरावित दलितवस्तीमध्येच रस्त्यांची कामे करण्यात येत होती.  शहरातील प्रत्येक दलितवस्तीमध्ये मजबुत व दर्जेदार रस्ते व्हावेत यासाठी एक कोटी आठ लक्ष रुपये तर शहरातील मुख्य रस्त्याच्या कामांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            राष्ट्रीय रुरबन मिशन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत परतूर तालुक्यातील आष्टीसह परिसरातील १६ गावांची निवड करण्यात आली असून यासाठी १८५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. निधीच्या माध्यमातून 16 गावातील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येत आहे. राष्ट्रीय रुरबन अंतर्गत आष्टी-पांडेपोखरी रस्त्यावर राज्यातील पहिली शेतकऱ्यांची मिनी एमआयडीसी उभारण्यात येत आहे. या मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच महिलांच्या बचतगटांना छोटछोटे उद्योग उभे करुन देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगला भावही या माध्यमातून मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. 


            रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई, ही देशातील अग्रगण्य संस्था असून मागील ८१ वर्षापासून रसायन तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन व नाविन्यपूर्ण कार्य करीत आहे. या संस्थेच्या उप केंद्रासाठी मौजे शिरसवाडी, ता.जि.जालना येथील गट नं.132 मधील 200 एकर शासकीय जमिन उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात आली असून या उपकेंद्राच्या कामाचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले आहे. सध्या औद्योगिक वसाहती मध्ये भाडे तत्वारील जागेत हे उपकेंद्र सुरु करण्यात आले असुन उपकेंद्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशही देण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यासह राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी सोय झाली असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जालना जिल्ह्याचा विकास अधिकगतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असुन मराठवाड्यासह जिल्ह्यातील जवळपास 40 हजार लोकांना रोजगार देऊ शकणाऱ्या आणि सुमारे 6 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करण्याची क्षमता असलेल्या 109 कोटी रुपये गुंतवणुकीचा सीडपार्क जालना परिसरात होत आहे.  या सीडपार्कमुळे बियाणे उद्योगासमोरील अडचणी दूर करण्याबरोबरच पायाभुत सुविधांचा विकास करुन बियाणे उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्मितीद्वारे रोजगार आणि गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांनी आयुष्यभर जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संपूर्ण देश स्वच्छ व सुंदर करण्याचे आवाहन केले.  त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात 60 लक्ष शौचालयांची उभारणी करुन महाराष्ट्र राज्य देशात प्रथम आले असुन उभारण्यात आलेल्या शौचालयांचा प्रत्येक नागरिकाने नियमित वापर करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

            उपकेंद्रावर तसेच ट्रान्सफार्मरवर विजेचा अतिरिक्त ताण पडल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना पुरेसा विजेचा पुरवठा करण्यात अडचणी येत होत्या या प्रश्नावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी वीज वितरणामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर शासनाने भर दिला असून जिल्ह्यातील जनतेला व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला सुरळीतपणे वीजेचा पुरवठा होण्यासाठी जिल्ह्यात 1500 नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आले असून जिल्ह्यासाठी नवीन 33 केव्हीचे 49 उपकेंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 19 उपकेंद्राच्या उभारणीचे काम सुरु झाले असून 170 कोटी रुपये खर्चून जालना येथे 220 केव्ही केंद्राचे काम करण्यात येत आहे तर परतूर येथील 220 केव्ही केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर 132 के.व्हीच्या नवीन 4 केंद्राचा प्रस्ताव असून ही सर्व कामे पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला अखंडितपणे विजेचा पुरवठा होणार असुन  मतदारसंघामध्ये  आठ 33 के.व्ही. उपकेंद्राबरोबरच 500 ट्रान्सफार्मरची उभारणी करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            तेलंगणा, आंध्रप्रदेश, श्रीलंका व गुजरात या राज्याच्या धर्तीवर जालना, परतूर व मंठा या तालुक्यातील 176 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातुन शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारली जात आहे. या योजनेचे काम अत्यंत जलदगतीने करण्यात येत असून खडकपुर्णा प्रकल्प उद्धभ पकडून या तीन तालुक्यातील 92 गावासाठी रुपये 117 कोटीची नवीन योजना मंजूर करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातुन तीनही तालुक्यातील गावांना येणाऱ्या काळात केवळ 7 रुपयांमध्ये एक हजार लिटर एवढे स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यातील रस्ते विकासावर अधिक प्रमाणात भर देण्यात येत असून जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरांसह ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे.  शंभर गावात पक्के व डांबरी रस्त्याचे जाळे निर्माण करण्यात आले असुन  राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे.  हा मार्ग पुर्ण झाल्यास  परिसराचा विकास होण्याबरोबरच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.  शेगाव ते पंढरपूर मार्गे जालना या मार्गावर गतकाळात अपघातामध्ये वारकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. विदर्भातील प्रत्येक भाविकांना पंढरपूर या श्रद्धास्थानापर्यंत  कमी वेळात पोहोचता यावे यासाठी नवीन दिंडी मार्ग होणे आवश्यक होते. त्यामुळे शेगाव ते पंढरपूर मार्गे लोणार-परतूर-माजलगाव हा मार्ग व्हावा अशी मागणी वेळोवेळी  नागपूर व दिल्ली येथे जाऊन  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्याने हा रस्ता तातडीने मंजूर करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजनेच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात येत असुन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली असुन त्यापैकी 1 लाख 32 हजार 447 लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 648 कोटी 52 लक्ष इतकी रक्कम जमा करण्यात आली असुन उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येत आहे.  जिल्ह्यातील 96 हजार 56 शेतकऱ्यांना 655 कोटी 54 लक्ष रुपये पीककर्जाचे वाटप करण्यात आले असुन जालना जिल्हा मराठवाड्यात पीककर्ज वाटपात प्रथम क्रमांकावर आहे.  बोंडअ ळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने 275 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असुन त्यापैकी 183 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.  तसेच पीकविम्यापोटी 5 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 176 कोटी 81 लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती देत शेतकऱ्यांनी पीकवलेला माल हमी भावानेच व्यापाऱ्यांनी खरेदी करण्याचा शासनाने निर्णय घेतला असुन हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला दंडाबरोबरचे शिक्षेची तरतूद करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
परतूर शहरात 63 कोटी 37 रुपयांच्या विकास कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
            शहरातील दलित वस्तीमधील रस्ते काम                                    -1 कोटी 8 लक्ष
            शहरातील मुख्य रस्ता                                                    - 6 कोटी
            शहरातील विविध भागात मंजूर 31 ट्रान्सफार्मर              
            6 कि.मी. एच.टी. लाईन, 12 कि.मी. एलटी लाईन,       - 2 कोटी 31 लक्ष
            19 कि.मी. ए.बी. केबल
            रेल्वे उड्डाणपुल                                                              - 45 कोटी
            रेल्वे उड्डाणपुल भु-संपादन                                             - 9 कोटी 28 लक्ष
            यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, मोहन अग्रवाल, मुख्य अभियंता के.टी. पाटील यांचीही समयोचित भाषणे झाली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी केले.
            कार्यक्रमास परतूर नगरपरिषदेचे नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह शंभरपेक्षा अधिक गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******
           

Tuesday 4 September 2018

स्पर्धा परीक्षेमधील यशस्वीतेसाठी लोकराज्य मासिक उपयुक्त जिल्हा पुरवठा विभाग लोकराज्यमय करणार - जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर







स्पर्धा परीक्षेमधील यशस्वीतेसाठी लोकराज्य मासिक उपयुक्त
जिल्हा पुरवठा विभाग लोकराज्यमय करणार
                                           - जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर
          जालना, दि. 4 जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी वाचनाबरोबरच निरीक्षणही तेवढेच महत्वाचे असुन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होणे ही जीवनातील एक मोठी संधी आहे. ही  संधी प्राप्त करण्यासाठी लोकराज्यसारख्या मासिकाचे वाचन अत्यंत उपयुक्त असल्याचे मत जिल्हापुरवठा अधिकारी राजू नंदकर यांनी केले.
            जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकराज्य वाचक अभियानाच्या शुभारंभ  श्री नंदकर यांच्या हस्ते करण्यात आला.  त्याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थीनींशी संवाद साधताना श्री नंदकर बोलत होते.
            यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी एस.बी. हजारे, जिल्हा प्रकल्प अधिकारी के.डी. दांडगे, माहिती सहाय्यक अमोल महाजन आदींची उपस्थिती होती.
            श्री नंदकर म्हणाले की, शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक हे अधिकृत व अचूक माहितीचा खजिना आहे. सन 2006 पासून लोकराज्यचे रुपडे बदलले असुन अत्यंत आकर्षक मांडणी, सुटसुटीत विषय, शासकीय योजनांची माहिती, मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय व शासन निर्णय आदी माहितीचा खजिना लोकराज्यच्या माध्यमातून नाममात्र मूल्यामध्ये जनतेपर्यंत पोहोचत असुन स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास यशासाठी लोकराज्यचे नियमित वाचन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपले नातेवाईक, मित्र यांनाही लोकराज्य वाचनासाठी प्रेरित केले पाहिजे. लोकराज्य हे केवळ एक मासिक नसून शासनाचा माहितीस्त्रोत आहे. त्यामुळे शासकीय योजना, उपक्रमाच्या विश्वासू माहितीसाठी लोकराज्यचे नियमित वाचन करणे गरजचे असल्याचेही श्री नंदकर यांनी यावेळी सांगितले.


..2..
            सध्या स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाने अपडेट राहिले पाहिजे. आजघडीला 7 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन  नोंदणी केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी मोठी स्पर्धा असुन स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जिद्द, चिकाटी व नियोजनपूर्ण अभ्यास करण्याची गरज असुन विद्यार्थ्यांनी दररोज तीन वृत्तपत्रांचे वाचन करण्याबरोबरच महिन्याभरात माहितीपूर्ण अशा तीन मासिकांचे वाचन करणे आवश्यक आहे.  स्पर्धा परीक्षेमध्ये चालूघडामोडींची माहिती असणे आवश्यक असुन ती आपणाला वृत्तपत्राच्या माध्यमातुन मिळत असते.  स्पर्धा परीक्षेसाठी करण्यात येणाऱ्या अभ्यासामध्ये सातत्य असणे आवश्यक असुन या परीक्षेमध्ये यश न मिळाल्यास विद्यार्थ्यांनी खचून न जाता कष्टसाध्य पद्धतीने अभ्यास करावा,  असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            लोकराज्य मासिकाची उपयुक्तता व त्यातील असलेली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने जिल्ह्यात लोकराज्य वाचक मेळावा अभियान राबविण्यात येत असुन या अभियानाला प्रतिसाद म्हणून जिल्हा पुरवठा विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानदारांसह लोकराज्यचे चारशे वर्गणीदारांची नोंदणी करणार असल्याची ग्वाहीही श्री नंदकर यांनी यावेळी दिली.
            यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी एस.बी. हजारे, जिल्हा प्रकल्प अधिकारी के.डी. दांडगे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री महाजन म्हणाले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्मये, समाजमामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येते.   या उपक्रमाचाच एक भाग म्हणून लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे माहितीदूत उपक्रमही राज्यभर राबविण्यात येत आहे. लोकराज्य मासिकाचे अधिकाधिक वर्गणीदार होण्याबरोबरच माहितीदूत उपक्रमातही युवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार राजेंद्र वाणी यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयातील अनिल परदेशी, मधुकर खांडेभराड, विजय उघडे, संतोष पाखरे आदींनी परिश्रम घेतले.      कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात लोकराज्यचा स्टॉल तसेच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******

Monday 3 September 2018

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध - पालकमंत्री बबनराव लोणीकर





जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध
                             - पालकमंत्री बबनराव लोणीकर
        जालना, दि. 3 –   जिल्ह्यातील जनतेला रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
            परतूर तालुक्यातील दैठणा खु. येथे प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्यांतर्गत मंजुर असलेल्या एक कोटी 54 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, रमेश भापकर, रामेश्वर तनपुरे, बद्रीनाथ ढवळे, अशोक बरकुले, सतीश निर्वळ, नितीन जोगदंड, सुरेश सांळुके, प्रभाकर सवणे, रामजी कचरे, राजाभाऊ कचरे, दत्ताभाऊ सवणे,महमुदभाई, संतपराव टकले आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, दळणवळणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासासाठी मंत्रीपदाची धुरा सांभाळताच आपण जिल्ह्यातील संपुर्ण रस्त्यांची माहिती घेऊन पुढील पाच वर्षात करावयाच्या रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.  गेल्या तीन वर्षाच्या काळात 200 गावांमध्ये पक्के व डांबरी रस्ते तयार करण्यात आली आहेत.  गावांना रस्ते व्हावेत,  शेतकऱ्यांना त्यांचा माल वेळेवर बाजारामध्ये नेण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला जलदगतीने वाहतुक करता यावी यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते तयार करण्यात येत आहेत.  या रस्त्यांचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.  येणाऱ्या पाच वर्षात हा रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारीही या कंत्राटदारांवर निश्चित करण्यात आली असुन येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वाडी,वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या, दर्जेदार व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री  श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरांसह ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे.  शंभर गावात पक्के व डांबरी रस्त्याचे जाळे निर्माण करण्यात आले असुन  राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे.  हा मार्ग पुर्ण झाल्यास  परिसराचा विकास होण्याबरोबरच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.  शेगाव ते पंढरपूर मार्गे जालना या मार्गावर गतकाळात अपघातामध्ये वारकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. विदर्भातील प्रत्येक भाविकांना पंढरपूर या श्रद्धास्थानापर्यंत  कमी वेळात पोहोचता यावे यासाठी नवीन दिंडी मार्ग होणे आवश्यक होते. त्यामुळे शेगाव ते पंढरपूर मार्गे लोणार-परतूर-माजलगाव हा मार्ग व्हावा अशी मागणी वेळोवेळी  नागपूर व दिल्ली येथे जाऊन  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्याने हा रस्ता तातडीने मंजूर करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजनेच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात येत असुन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली असुन त्यापैकी 1 लाख 32 हजार 447 लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 648 कोटी 52 लक्ष इतकी रक्कम जमा करण्यात आली असुन उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येत आहे.  जिल्ह्यातील 96 हजार 56 शेतकऱ्यांना 655 कोटी 54 लक्ष रुपये पीककर्जाचे वाटप करण्यात आले असुन जालना जिल्हा मराठवाड्यात पीककर्ज वाटपात प्रथम क्रमांकावर आहे.  बोंडअ ळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने 275 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असुन त्यापैकी 183 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.  तसेच पीकविम्यापोटी 5 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 176 कोटी 81 लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            उपकेंद्रावर तसेच ट्रान्सफॉर्मरवर विजेचा अतिरिक्त ताण पडल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना पुरेसा विजेचा पुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. या प्रश्नावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी वीज वितरणामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर शासनाने भर दिला असून जिल्ह्यातील जनतेला व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला सुरळीतपणे वीजेचा पुरवठा होण्यासाठी जिल्ह्यासाठी नवीन 33 केव्हीचे 49 उपकेंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 19 उपकेंद्राच्या उभारणीचे काम सुरु झाले असून 170 कोटी रुपये खर्चून जालना येथे 220 केव्ही केंद्राचे काम करण्यात येत आहे. तर परतूर येथील 220 केव्ही केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर 132 के.व्ही.च्या नवीन 4 केंद्राचा प्रस्ताव असून ही सर्व कामे पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला अखंडितपणे विजेचा पुरवठा होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            तेलंगणा, आंध्रप्रदेश, श्रीलंका व गुजरात राज्य तसेच इस्त्राईल देशाच्या धर्तीवर जालना, परतूर व मंठा या तालुक्यातील 176 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारली जात आहे.  त्याचबरोबरच मतदासंघातील 92 नवीन गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला असुन यासाठी 125 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. येत्या वर्षभराच्या कालावधीत ही योजना पूर्ण करुन जालना, परतूर व मंठा तालुक्यातील गावांना शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असुन येणाऱ्या काळात घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी, जिरडगाव, कुंभारपिंपळगाव व रांजणी सर्कलमधील गावांना वॉटरग्रीडद्वारे शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याबरोबरच दर्जेदार रस्ते करण्याचा मानस असल्याचेही पालकमंत्री  श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले. 
            मतदार संघातील तीनशे गावांना येणाऱ्या काळात रस्ते, वीज, पाणी यासारख्या मुलभूत सोई-सुविधा पुरविण्यात येणार असुन गावात होणाऱ्या प्रत्येक विकास कामांना गावकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते परतूर तालुक्यातील कावजवळा येथे अर्थसंकल्प अंतर्गत परतूर-रांजणी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या 3 कोटी रुपये किंमतीच्या कामाचा तसेच ब्राम्हणवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक व प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्यांतर्गत मंजूर असलेल्या एक कोटी 65 लक्ष रुपयांच्या विविध कामांचाही शुभारंभ करण्यात आला.
 कावजवळा येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, रमेश भापकर, रामेश्वर तनपुरे, डिंगबर मुजमुले, पंजाबराव बोराडे, शहाजी राक्षे,अंकुश आबा कदम, शेख रहोमोदिन, सुरेश दादा साळुके, रमेशराव केवारे, शेख आयुबभाई, श्रीपाद तरासे, संरपच सोमनाथ मगर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, कार्यकारी अभिंयता श्री सोनलकर हे तर ब्राम्हणवाडी येथे झालेल्या कार्यक्रमास राहुल लोणीकर, मदनलाल शिंगी, रिझू सोळंके, मानिकराव वाघमारे, नाथा जिजा, रामप्रसाद थोरात, रंगनाथ येवले, मुरली काका, बाळासाहेब  तात्या, विष्णु अण्णा सोळुंके, विलास सोळुंके, तुकाराम सोळुंके, अण्ण्णासाहेब ढवळे, अमोल तौर, विष्णु शहाणे, बाबासाहेब थोरात, तुकाराम सोळुंके, सतीश देशमुख, सुधाकर सोळुंके   यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******