Thursday 29 February 2024

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध


जालना, दि. 29 (जिमाका) :-  मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणीक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणी अंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी मा. न्यायमूर्ती (निवृत्त) संदीप शिंदे यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती.

त्यानुषंगाने जिल्हयातील 13 विभागातील अभिलेखाची तपासणी करणे बाबत संबंधीत विभागाचे विभागप्रमुख यांना कळविण्यात आले होते. त्यानुषंगाने उपरोक्त 13 विभागातील विभाग प्रमुख यांनी त्यांचे कडील उपलब्ध अभिलेखाची तपासणी करुन अहवाल सादर केले असता विविध विभागातील एकूण 3 हजार 318 नोंदी आढळून आल्या होत्या, सदरील नोंदी या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या jalna.nic.in आणि jalna.gov.in या वेबसाईटवर नांगरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात  आलेल्या आहेत.

तसेच, नंतरच्या कालावधीत मा. समिती अध्यक्ष संदीप शिंदे (निवृत्त) व मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी तपासणी सुरु ठेवणेबाबत दिलेल्या निर्देशानुसार वरील सर्व विभागाची पुनश्चय तपासणी करण्यात आली. सदरील फेरतपासणी मध्ये दुय्यम निबंधक कार्यालय जालना व भोकरदन यांच्या कार्यालयामध्ये एकूण 403 तसेच जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख यांच्या अधिनस्त कार्यालयामध्ये 688 इतक्या नोंदी आढळून आलेल्या आहेत. सदर नोंदी या त्यांच्या कार्यालयाचे नोटीस बोर्डवर तसेच गाव स्तरावर प्रसिध्द करण्यात आल्या असुन सदरील नोंदी वरील वेबसाईटवर प्रसिध्द करण्याची कार्यवाही सुरु आहे.

जिल्हयामध्ये एकूण 4 हजार 664  नोंदी आढळून आलेल्या असुन सदर नोंदीच्या अनुषंगाने जिल्हयामध्ये आतापर्यंत एकूण 6 हजार  220  इतके कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा विशेष कक्ष समितीचे अध्यक्ष सोहम वायाळ यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविले आहे.

                                                                   -*-*-*-*-*- 

गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवाचे" 1 मार्चला उद्घाटन जालना येथील कलश सिड्स मैदानावर कृषी महोत्सवाचे आयोजन 5 मार्चपर्यंत कृषी महोत्सव

 

     जालना, दि. 29 (जिमाका) - कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या विद्यमाने जालना शहरात दि.1 ते 5 मार्च 2024 या कालावधीत भव्य "गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले आहे.  

     जालना येथील कलश  सिड्स मैदान, मंठा चौफुली येथे कृषी महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन  1 मार्च 2024  रोजी सकाळी 11.00 वाजता राज्याचे सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते तर केंद्रीय  रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास सर्व लोकप्रतिनिधी ही उपस्थित राहणार आहेत. या कृषी महोत्सवास जिल्ह्यातील शेतकरी बंधू-भगिनींनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

     कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समूह, गट संघटित करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणींद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देणे या या कृषी महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहेत.

     कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्त्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालन, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे.

     या सोबत जालना जिल्हयातील पिक परिस्थितीवर आधारित  बांबू लागवड, रेशीम लागवड , मोसंबी लागवड व सीताफळ, तूर, सोयाबीन लागवड या सारख्या  विविध पिकावर मार्गदर्शन करण्यासाठीं  चर्चा सत्र व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे .

      लोककला, शालेय विद्यार्थ्याचं कलादर्शन देखील होणार आहे.

महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम यांचे आयोजन केले आहे याच काळात तृणधान्य आधारित पाक कला स्पर्धा व खरेदीदार विक्रेता संमेलन आयोजित करण्यात येणाऱ आहे. 1.5 टन वजनाचा रेडा हे  या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असणार आहे.

-*-*-*-*-*-*-

रब्बी हंगाम 2023-24 अंतर्गत पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे/ गारपीटमुळे नुकसानग्रस्त पिकाच्या क्षेत्राची पूर्वसूचना देण्यासाठी जाहीर आवाहन करणेबाबत

 


        जालना, दि. 29 (जिमाका) :- प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 शासनाने राबविण्यासाठी

दि.26 जुन 2023 अन्वये जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीला मान्यता दिलेली आहे. त्या अन्वये शेतकऱ्यांनी पिक विमा भरून आपले पिक संरक्षित केले आहे. परंतु दि.26 फेब्रुवारी 2024  रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे / गारपीटमुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात प्राथमिक नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. त्यानुषंगाने ज्या शेतकऱ्यांच्या पिक विमा काढलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन  क्रॉप इन्सुरन्स ॲप

  (https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central)  डाऊनलोड करुन त्यामध्ये पिक विमा संरक्षण घेतलेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त फोटोसह अपलोड करावी किंवा 1800-103-7712 टोल फ्री क्रमांक किंवा https://login.universalsompo.in/crop_claim website/  या संकेत स्थळावर तक्रार नोंद करावी. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार नोंदवणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि कंपनीच्या जिल्हा/ तालुका कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह सदरची तक्रार नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीची नोंद करणे आवश्यक आहे. सध्या पिकाचे नुकसान हे अवकाळी पावसामुळे / गारपीटमुळे झाले असल्याने हेच कारण नमूद करून नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे. हरभरा, गहू व ज्वारी या पिकाचा पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी यापूर्वी जरी तक्रार दिली असली तरी त्यांनी परत नुकसान भरपाईसाठी तक्रार देण्यात यावी. जेणेकरून नुकसान भरपाई पहिल्यापेक्षा जास्त मिळेल. तरी सर्व शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवताना योग्य ती खबरदारी घेऊनच नुकसानग्रस्त क्षेत्राची नुकसान सुचना / तक्रार विमा कंपनीकडे नोंदविण्याचे  आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

-*-*-*-*-*-

अंबड तालुक्यात संचारबंदी शिथिल

 

     जालना, दि. 29 (जिमाका) - संपूर्ण अंबड तालुक्याकरीता दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजीचे रात्री 12.01 वाजेपासुन ते पुढील आदेशापावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) प्रमाणे संचारबंदी आदेश लागु करण्यात आले होते.

दरम्यान, अंबड शहर (नगर परिषद हद्दीपावेतो) दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजीचे 12.01 वाजेपासून संचारबंदी आदेश शिथील करण्यात आले.

तसेच दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी अंबड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पाहता परिस्थिती नियंत्रणात असून जनजीवन पुर्वपदावर आल्याने संपूर्ण तालुक्याकरीता संचारबंदी शिथील करणे आवश्यक आहे. त्याअर्थी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) प्रमाणे अंबड तालुक्यातील ग्रामीण भागाकरीता लागु केलेले संचारबंदी आदेश दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजीचे सायंकाळी 6.00 वाजेपासून शिथील करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे

-*-*-*-*-*-

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


    जालना, दि. 29 (जिमाका) :- जालना जिल्ह्यात दि. 8 मार्च 2023 रोजी महाशिवरात्री असल्याने विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. 21 फेब्रुवारी 2024 पासून इयत्ता 12 वीची परीक्षा सुरु  झाली असून परीक्षा केंद्रासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव व धनगर समाज एस.टी. प्रवर्गात समाविष्ठ करावे या अनुषंगाने जिल्ह्यात विविध प्रकारचे आंदोलन कार्यक्रम सुरु आहेत त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.  

सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द गटबाजी व आरोप प्रत्यारोप विविध कारणांवरुन सुरु आहे. तसेच शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी विविध संघटनाकडून आत्मदहन, उपोषण, धरणे मोर्चे, निर्दशने, रास्तारोको, इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना सोहम वायाळ यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

   तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

 

हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.

       हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 1 मार्च 2024 रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि.14 मार्च 2024  रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

अनाथ बालकांसाठी विविध दाखल्यांसाठी पंधरवडा आयोजित

  

        जालना, दि. 29 (जिमाका) :-  जालना जिल्ह्यात अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला  व मतदान ओळखपत्र आदि उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व महसुल विभागाच्या समन्वयातून अनाथ बालकांसाठी पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.

            शासनाच्या निर्देशानुसार दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च  2024 या कालावधीमध्ये अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला , अधिवास व राष्ट्रियत्वाचा दाखला  व मतदान ओळखपत्र इत्यादी उपलब्ध करून देण्याबाबत संपुर्ण राज्यात पंधरवडा राबविण्यासंबंधीत सुचना देण्यात आल्या आहेत.   जिल्ह्यात देखील सदर पंधरवडा राबविण्यात येणार असुन अनाथ मुलांना वरील प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व महसुल विभागाच्या यंत्रणेसोबत समन्वय साधुन सदरील प्रमाणपत्र अनाथ मुलांना शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातुन उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

            निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना येथे एक समर्पित कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तरी अनाथ बालकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्राबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने सदर समर्पित कक्षास   दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीत भेट द्यावी व पुढील आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,  जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Wednesday 28 February 2024

पाटबंधारे विभागाअंतर्गत थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन

 

 

     जालना, दि. 28 (जिमाका) :- पाटबंधारे प्रकल्पातुन बिगर सिंचन योजनेस पाणी पुरवठा करण्यात येतो. पाण्याच्या वापरानुसार विभागाची 855.53 लक्ष बिगर सिंचन पाणीपट्टी थकीत आहे.   सर्व योजना धारकांना पाटबंधारे विभागाद्वारे जाहीर आवाहन करण्यात आले आहे की 7 दिवसाच्या आत पाटबंधारे विभाग जालना यांच्या नावे धनादेशाद्वारे पाणीपट्टी भरावी अन्यथा संबंधीत योजनेच्या पाणी पुरवठ्यासह विद्युत पुरवठा दि. 5 मार्च 2024 पासून खंडीत करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, कार्यवाही उद्भवणाऱ्या जनक्षोभास कार्यालय जबाबदार असणार नाही याची गांर्भियाने नोंद घ्यावी, असे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

खाली दिल्याप्रमाणे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत थकीत पाणीपट्टीची गावे व  रक्कम दिलेली आहे

नगर परिषद परतुर – 40.38 लक्ष रुपये, महानगरपालिका, परभणी- 191.66 लक्ष रुपये ,जिल्हा परिषद, परभणी -74.72 लक्ष रुपये, नगर परिषद पुर्णा – 107.91 लक्ष रुपये, नगर परिषद सेलु -83.62, महानगरपालिका नांदेड -135.94 लक्ष रुपये, नगर पंचायत मंठा 18.49 लक्ष रुपये, 176 व्हिलेज ग्रीड ड्रिकिंग वॉटर स्कीम एमजेपी जालना -20.53 लक्ष रुपये,  नगर परिषद भोकरदन  -44.14 लक्ष रुपये, रामेश्वर साखर कारखाना -77.45 लक्ष रुपये, नगरपंचायत बदनापुर -15.99 लक्ष रुपये, कृषी महाविद्यालय बदनापुर – 0.32 लक्ष रुपये, नगर पंचायत मंठा -34.24 लक्ष रुपये,  नगर पंचायत अंबड – 5.14 लक्ष रुपये,

  

-*-*-*-*-*-

शासकीय नर्सिंग महाविद्यालयात विशाखा समिती विषयी कार्यशाळा संपन्न

 

 



    जालना, दि. 29 (जिमाका) :- शासकीय नर्सिंग महाविद्यालयात दि. 27 फेब्रुवारी रोजी महिला समुपदेशन केंद्रात कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ विशाखा समिती विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित अध्यक्ष प्राचार्या पार्वती लोडते, प्रमुख पाहुणे स्वयंसेविका दीक्षा घोडके, समुदेशक रोहित म्हस्के, उपप्राचार्य किरण जाधव, पराग जोशी, एकनाथ गावडे, पुष्पलता भालतिलक मिनल कुलकर्णी  व इतर स्टाफ तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

            या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना रोहित म्हस्के यांनी विशाखा समिती काय ? कशा प्रकारे काम करते ? त्याची मदत कशी घ्यावी ? तक्रार कशी करावी ? महिलांच्या मदतीसाठीच्या शासकीय यंत्रणा तसेच महिला समुपदेशन केंद्राची भुमिका स्पष्ट करण्यात आली. मार्गदर्शन करताना मुलींनी सहन करु नये त्यांनी अन्याय अत्याचार विरुध्द बोलणे खूप गरजेच आहे असे दिक्षा घोडके यांनी मार्गदर्शन केले.

-*-*-*-

Tuesday 27 February 2024

"परीक्षा केंद्रावर एकाच वेळी महसुल विभागाची अचानक तपासणी"

 






     जालना, दि. 28 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) दि. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान जालना जिल्ह्यातील एकूण 80 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे.

परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्याकरीता व परीक्षेचे सुरळीत संचलनाकरीता तसेच परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पहाणी करण्याकरीता जिल्हा प्रशासनामार्फत बैठे पथक व भरारी पथकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. तथापी सदर पथकामार्फत योग्य ती कार्यवाही होत नसल्याबाबातच्या तक्रारी विविध प्रसार माध्यमाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे  प्राप्त होत होत्या, या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पाचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार व निवासी उपजिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी तातडीची बैठक घेऊन एक नविन भरारी पथक कार्यान्वीत करून जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी व परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले, या करीता जालना जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, अशा 26 अधिकाऱ्यांचा समावेश असलेले नियंत्रण पथकाचे आदेश निर्गमित करण्यात आले. तसेच या कार्यालयामार्फत भरारी पथकाचे आदेश निर्गमित करण्यात आले, ज्यामध्ये एकुण 14 अधिकारी यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी नुतन  विद्यालय, संत ज्ञानेश्वर जुनि.कॉलेज इंदेवाडी, किंग शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक कॉलेज रेवलगाव उर्दु जुनियर कॉलेज या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या व निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ व सर्व तहसिलदार यांनी आज परीक्षा केंद्रावर एकाच वेळी अचानक तपासणी केली व परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर बाहय उपद्रव होणार नाही या दुष्टीकोनातून पुरेसा बंदोबस्त ठेवण्याबाबत व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यात यावी असे निर्देश दिले. तसेच परीक्षा केंद्र प्रमुख पर्यवेक्षक, बैठे पथक भरारी पथक यांनी कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्याबाबतच्या सुचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालय शेलगाव ता. बदनापुर येथील परीक्षा केंद्रावर अचानक भेट दिली. तसेच मौजे केळीगव्हाण येथे रामकृष्ण पाती आर.पी. शाळा येथे भेटी दरम्यान खालील बाबी आढळून आल्या. 

परीक्षार्थीना सुचना देण्यासाठी कुठलीही व्यवस्था/यंत्रणा आढळुन आली नाही.  विद्यार्थ्यांसोबत पालकांना सुद्धा शाळेच्या परीसरात प्रवेश दिलेला दिसुन आला. तपासणी करतांना विद्यार्थ्यांचा गोंधळ, गडबड दिसुन आला. पोलीस कर्मचारी व होमगार्ड गैरहजर दिसुन आले.परीक्षा कक्षात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी आढळून आले. एकाच बाकावर तीन तीन विद्यार्थी बसलेले दिसुन आले.

 

      या त्रुटीबाबत संबंधित शिक्षणाधिकारी मंगल धुपे व शाम देशमुख यांना संबंधित केंद्र प्रमुख यांना नोटिसा काढून कार्यवाही करण्याच्या तात्काळ सुचना मोबाईल वरून दिल्या याबाबत जिल्हाधिकारी यांनी सुध्दा कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.

     या त्रुटीबाबत संबंधित परीक्षा केंद्र प्रमुख यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांनी धारेवर धरून अश्या गैरप्रकारांना तात्काळ आळा घालण्याबाबत सक्त सुचना दिलेल्या आहेत. सदर परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडव्यात परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाही याबाबत विद्यार्थी पालक, शिक्षक व संस्थाचालक यांनी दक्षता घ्याव्या  असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाला प्रतिसाद


 

    जालना, दि. 27 (जिमाका) :- महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक कवी विष्णू  वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी 27 फेब्रुवारी रोजी सर्वत्र मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला जातो, या दिवसाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

     जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सुर्यवंशी यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतिश जाधव तसेच कनिष्ठ लिपिक शंकर पवार व विद्यार्थी वाचक व साहित्य रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक असलेली विविध पुस्तके,कथा,कादंबरी, आत्मचरित्र तसेच ऐतिहासिक साहित्य  या ग्रंथप्रदर्शनामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले होते. अशी माहिती  जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय कार्यालय सतिश जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

-*-*-*-*-*-

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

 






     जालना, दि. 28 (जिमाका) :- ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दि. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.27 फेब्रुवारी 2024 रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य प्रा. राजेंद्र सोनवणे, प्रा. विश्वंभर वडजे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार प्रणाली तायडे, तहसिलदार अनिल नव्हाते  व सर्व अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.

   या कार्यक्रमामध्ये  तहसिलदार प्रणाली तायडे, सर्व अ.का. राजीव शिंदे, वैशाली तोटे, वैशाली डिघुळे, यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. संपदा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले. 

-*-*-*-*-*-

 

Monday 26 February 2024

जालन्यात 1 ते 5 मार्च दरम्यान भव्य कृषी प्रदर्शन कलश सिड्स मैदान, मंठा चौफुली येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन सर्व शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी ---जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 


 

     जालना, दि. 26 (जिमाका) -कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या विद्यमाने जालना शहरात दि.1 ते 5 मार्च 2024 या पाच दिवसाच्या कालावधीत  कृषी महोत्सवाचे आयोजन कलश  सिड्स मैदान, मंठा चौफुली येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनास जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकरी बंधू -भगिनींनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

 

कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समूह, गट संघटित करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणींद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देणे या योजनेचे प्रमुख उद्देश आहेत.

    कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्त्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालन, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे.

  या सोबत जालना जिल्हयातील पिक परिस्थितीवर आधारित  बांबू लागवड, रेशीम लागवड , मोसंबी लागवड व सीताफळ, तूर सोयाबीन लागवड या सारख्या  विविध पिकावर मार्ग दर्शन करण्यासाठीं  चर्चा सत्र व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे .

लोककला , शालेय विद्यार्थ्याचं कला दर्शन देखील होणार आहे.

महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम यांचे आयोजन केले आहे याच काळात तृण धान्य आधारित पाक कला स्पर्धा व खरेदीदार विक्रेता संमेलन आयोजित करण्यात येणाऱ आहे. 1.5 टन वजनाचा रेडा हे  हया प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असणार आहे.

-*-*-*-*-*-*-

जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशान्वये कलम 144 (2) लागू

 


 

        जालना, दि. 24 (जिमाका) :- सगे सोयरे अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करुन, सगे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे दि. 10 फेब्रुवारी 2024 पासुन मौ. अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि.जालना येथे उपोषणास बसले आहेत. या मागणीस पाठींबा देण्यासाठी जिल्हयातील विविध भागात आंदोलन, उपोषण चालु आहेत. सगे सोयरे अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करुन, सगे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण जालना जिल्हयामध्ये 60 ते 65 ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी मौ. अंतरवाली सराटी, ता.अंबड येथे मराठा समाजाची आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी घेतलेले बैठकीमध्ये यापुढील आंदोलन मुंबई येथे करणार असल्याचे तसेच त्यासाठी मुंबई येथे जाणार असल्याचे बैठकीमध्ये जाहीर केले असून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनास पाठींबा देण्यासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जावू नये याकरीता आग्रही असल्याने मौ. अंतरवाली सराटी, ता. अंबड येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमण्याची शक्यता असून त्यामुळे धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व तालुक्यातील इतर मार्गावर मोठया प्रमाणावर गर्दी जमून दळणवळण विस्कळीत होण्याची, सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत होण्याची, गर्दीमुळे सार्वजनिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.

       जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जालना यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये संपुर्ण अंबड तालुक्याकरीता दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजीचे  रात्री 12.01  वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा संचारबंदी आदेश दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहतील. तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत, दरील आदेशामधून खालील बाबींना सुट राहील. शासकीय/निमशासकीय कार्यालये, शाळा/महाविद्यालये, राष्ट्रीय महामार्ग व इतर मार्गावरील वाहतूक,दूध वितरण,पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना. असे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.

-*-*-*-*-*-

Friday 23 February 2024

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 3 मार्च रोजी 5 वर्षाखालील प्रत्येक बालकाला पोलिओची लस अवश्य द्या -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 

  



जालना, दि. 23 (जिमाका) :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार 3 मार्च 2024 रोजी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. 5 वर्षाखालील आपल्या बालकाला पोलिओचा डोस मिळेल याची पालकांनी खात्री करावी. नजिकच्या पोलिओ बुथवर जाऊन पोलिओ डोस घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. तसेच आरोग्य विभागाने पल्स पोलिओची मोहिम प्रभावीपणे राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. आर.एस. पाटील, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. गजानन म्हस्के, समाज कल्याण अधिकारी एस.के. भोजने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  कोमल कोरे,अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण पवार, आय.एम. अध्यक्ष एम. डी. अंबेकर, आय. ए. पी अध्यक्ष डॉ. जेथलिया आदिंसह वैद्यकीय अधिक्षक तालुका  आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. 

जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले व त्या वर्षी जागतीक पातळीवर 3,50,000  एकुण रुग्ण व सन 2003 ला 1900 रुग्ण त्यानंतर पोलिओ रुग्णाची संख्या 125 व त्यानंतर 7 रुग्ण हे मोहिम राबविण्यात आल्यामुळे कमी झाली आहे.

      त्यानुसार राज्यात सन 1995 पासुन राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येत आहे. या मध्ये 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. गेल्या 26 वर्षापासुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सार्वजनिक आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागामार्फत यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. भारतामध्ये 13 फेब्रुवारी 2011 नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळुन आलेला नाही व भारताला पोलिओ निर्मुलनाचे प्रमाण पत्र 27 मार्च 2014 मध्ये मिळालेले आहे. तरी शेजारील देशाचा पोलिओचा धोका लक्षात घेता हि मोहिम राबविण्यात येत आहे.

     जालना जिल्हयात एकुण बुथ संख्या 1793 असुन ते 5 वर्षापर्यतचे अंदाजीत लाभार्थी संख्या 2,53,653 आहे. एकुण शितसाखळी केंद्र 56 असुन सर्व ठिकाणी पर्याप्त लसीचा साठा उपलब्ध आहे.

जालना जिल्हयासाठी 3,43,000 एवढी लसीची मात्रा उपलब्ध झालेली आहे. ती सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय इ. पुरविण्यात येणार आहे. शहरी भागात 272 बुथ असुन एकुण लाभार्थी 49597 एवढे आहे. तसेच ग्रामीण भागात 1521 बुथ असुन लाभार्थी 2,04,056 एवढे आहे.

       मोहिमे अंतर्गत काही कारणास्तव लस घेता आली नाही तर आपल्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करुन बाळास पोलिओ लस देण्यात येणार आहे.  

      जिल्हयामध्ये एकुण ट्राझीट टिम 131 असुन जिल्हामध्ये बस स्थानक, रेल्वे स्टेशन, टोल नाका, येथे प्रवाशी लाभार्थी करिता बुथ ठेवण्यात आलेले आले.

    जिल्हयामध्ये एकुण मोबाईल टिम 109 असुन विटभटया, खंडीकेंद्र, ऊसतोड कामगार, वाडया, यांच्या करिता फिरते पथक ठेवण्यात आलेले आहे.

             

                                                          -*-*-*-*-

घोषवाक्याच्या माध्यमातुन मतदानाबाबत जनजागृती

 

        जालना, दि. 23 (जिमाका) :- नेहरु युवा केंद्र, व संत भगवान बाबा युवा मंडळ यांच्या वतीने मतदान जनजागृती,  मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी मंठा व परतुर या तालुक्यामध्ये घोषवाक्याच्या माध्यमातुन मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच घोषवाक्याच्या माध्यमातून करा आपल्या मताचे दान हीच आहे लोकशाहीची शान, 18 वर्षाची वय केली पार करुन  घ्या मताचा अधिकार, तुमचा हक्क तुमचं मत, अशी घोषवाक्ये व त्याला साजेशी चित्रे रेखाटत मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच स्वयंसेवकांनी रेखाटलेली  घोषवाक्ये मंठा व परतुर तालुक्याच्या विविध ठिकाणी काढण्यात आली. यावेळी वैभव कांगणे, रवि कांगणे, सतुबा बोंडे, श्रावण बोंडे, सुरेश कांगणे, रामकिसन कांगणे, महादेव कांबळे, अनिकेत जगदाळे, योगेश काळुंखे, लक्ष्मण राऊत, रोहित भापकर इत्यादींच्या उपस्थितीत जनजागृती करण्यात आली. अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी नेहरु युवा केंद्र यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

Thursday 22 February 2024

23 फेब्रुवारीपासून अनाथ बालकांसाठी पंधरवडा आयोजित

 


        जालना, दि. 22 (जिमाका) :-  जालना जिल्ह्यात अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला  व मतदान ओळखपत्र आदि उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व महसुल विभागाच्या समन्वयातून अनाथ बालकांसाठी पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.

            शासनाच्या निर्देशानुसार दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च  2024 या कालावधीमध्ये अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला , अधिवास व राष्ट्रियत्वाचा दाखला  व मतदान ओळखपत्र इत्यादी उपलब्ध करून देण्याबाबत संपुर्ण राज्यात पंधरवडा राबविण्यासंबंधीत सुचना देण्यात आल्या आहेत.   जिल्ह्यात देखील सदर पंधरवडा राबविण्यात येणार असुन अनाथ मुलांना वरील प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व महसुल विभागाच्या यंत्रणेसोबत समन्वय साधुन सदरील प्रमाणपत्र अनाथ मुलांना शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातुन उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

            निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना येथे एक समर्पित कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तरी अनाथ बालकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्राबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने सदर समर्पित कक्षास   दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीत भेट द्यावी व पुढील आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,  जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

4 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 


जालना दि. 22 (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही  दिनाचे  महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजन करण्यात येते.  तरी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही  दि  सोमवार दि. 4 मार्च 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत आयोजित  करण्यात आला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

              लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा.  लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी,  विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत.   तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना  https://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


जालना दि. 22 (जिमाका) :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 10 वी 12 वी परीक्षा दिनांक 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवी दिल्ली यांनी जालना जिल्ह्यातील निश्चित केलेल्या 4 परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी जारी केले आहेत.

परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी अध्यक्ष, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवी दिल्ली यांनी जालना जिल्हयात निश्चित केलेल्या 1) गोल्डन जुबली स्कुल, संतोषी माता मंदीर देऊळगाव राजा रोड जालना 2) पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, संतोषी माता मंदीर देऊळगाव राजा रोड, जालना 3) जवाहर नवोदय विद्यालय आंबा परतूर, 4) सेंट मेरीस हायस्कुल, देऊळगाव राजा रोड, जालना या चार परीक्षा केंद्र परिसरात परीक्षा चालु असतांना काही पालक, परीक्षा न देणारे विद्यार्थी उपद्रव करीत असतात. परीक्षार्थ्यांना नकला पुरविणे व परीक्षा केंद्राच्या परिसरात घुटमळत राहणे त्यांच्या या कृतीमुळे परीक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, वरील परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत वरील केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणे आवश्यक आहे.

या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे. सदर आदेशाची प्रसिध्दी पोलीस अधिक्षक, जालना यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे करावी. सदरील आदेश वरील परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एमसीईडीतर्फे थ्री डी प्रिंटींग व रिव्हर्स इंजिनिअरिंग निवासी प्रशिक्षणाचे आयोजन

 


 

जालना दि. 22 (जिमाका) :- उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) आयोजीत आणि महाराष्ट्र उद्योजक, व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष (मैत्री) मुंबई यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत अनुसुचित जाती (एस.सी.) प्रवर्गासाठी 45 दिवसीय निःशुल्क 3 डी प्रिंटींग व रिव्हर्स इंजिनिअरिंग या निवासी तांत्रीक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.

तांत्रिक अभ्यासक्र ३ डी प्रिंटींग व रिव्हर्स इंजिनिअरिंग संबंधित मूलभूत संकल्पना समजून घेणे, ऑटोकॅड, स्कनिंग, सोल्डीड वर्क्स, कॅटीया कॅड इ. अनेक विषयांवर प्रात्यक्षिकांद्वारे सविस्तर प्रशिक्षण तज्ञाद्वारे दिल्या जाईल. तसेच उद्योजकीय अभ्यासक्रम: उद्योजकीय व्यक्तिमत्व विकासशासकीय कर्ज प्रकल्प अहवाल उद्योग व्यवस्थापन उद्योग संघी बाजारपेठ पाहणी तंत्र संभाषण कौशल्य विपणन कौशल्य, बाजारपेठ व्यवस्थापनवा योजनाची माहितीउद्योग नोंदणी इ.

अनुसूचित प्रवर्गातील, वय 18 ते 45 वर्ष, स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची तीव्र इच्छा, पूर्णवेळ प्रशिक्षणास उपस्थित राहणे अनिवार्य, शिक्षण: किमान बारावी विज्ञान / Diploma/ Degree in Mechanical, Production, Electrical, Electronics, and Automobile उत्तीर्ण असावा सोबत मार्कशीट/आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र. शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी), पासपोर्ट साईझचे २ फोटो वरील सर्व कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रती जोडाव्यात.

तरी संबंधितांनी अधिक माहितीकरिता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी) अ-३८, एमआयडीसी रेल्वे स्टेशन एरिया, देवगिरी कॉलेज जवळ छत्रपती संभाजीनगर येथे श्री विनोद त्रिभुवन मो 9960339813 कार्यक्रम समन्वयक एम.सी.ई.डी. किंवा व्ही.पी तुपे, प्रकल्प अधिकारी एम. सी.ई.डी. औरंगाबाद मो. 9049228888 येथे त्वरित संपर्क करावा असे आवाहन श्री. डी. यू. थावरे, विभागीय अधिकारी एम.सी.ई.डी. श्री. स्वप्नील राठोड  महाव्यवस्थापक   छत्रपती संभाजीनगर जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-