Wednesday 7 February 2024

‘जिल्हा लिडकॉम आपल्या दारी’ संकल्पनेनुसार 11 फेब्रुवारीला जालना येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

 


जालना, दि. 7 (जिमाका) :- शासन आपल्यादारी अंतर्गत लिडकॉम आपल्या दारी या संकल्पनेनुसार संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय जालना यांच्या विद्यमाने कर्जाविषयी व महामंडळाच्या योजनाविषयक मार्गदर्शन मेळावा रविवार दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक संगीता पराते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी व त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्या माध्यमातुन शासनाच्या विविध योजना राबवुन शैक्षणिक सामाजिक योजनेची अंमलबजावणी करून चर्मकार समाजाला मुख्य प्रवहामण्ये आणण्याकरीता व अर्थिकस्तर उचांवण्याकरीता कर्ज पुरवठा करून वेगवेगळया व्यवसायामध्ये सक्षमपणे उभा करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून महिलांकरीता महिला अधिकारता दिर्घ मुदती कर्ज लघुउद्योग योजना महिला समृध्दी योजना (1.40 लाख ) लघुऋण वित्त योजना (1.40 लाख ) बीजभांडवल योजना विशेष घटक योजना शैक्षणिक योजना महामंडळामार्फत चर्मद्योग व इतर व्यवसायाकरीता प्रशिक्षण राबविण्यात येणार असून त्याची माहिती या मेळाव्यामध्ये देण्यात येणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment