Friday 23 February 2024

घोषवाक्याच्या माध्यमातुन मतदानाबाबत जनजागृती

 

        जालना, दि. 23 (जिमाका) :- नेहरु युवा केंद्र, व संत भगवान बाबा युवा मंडळ यांच्या वतीने मतदान जनजागृती,  मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी मंठा व परतुर या तालुक्यामध्ये घोषवाक्याच्या माध्यमातुन मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच घोषवाक्याच्या माध्यमातून करा आपल्या मताचे दान हीच आहे लोकशाहीची शान, 18 वर्षाची वय केली पार करुन  घ्या मताचा अधिकार, तुमचा हक्क तुमचं मत, अशी घोषवाक्ये व त्याला साजेशी चित्रे रेखाटत मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच स्वयंसेवकांनी रेखाटलेली  घोषवाक्ये मंठा व परतुर तालुक्याच्या विविध ठिकाणी काढण्यात आली. यावेळी वैभव कांगणे, रवि कांगणे, सतुबा बोंडे, श्रावण बोंडे, सुरेश कांगणे, रामकिसन कांगणे, महादेव कांबळे, अनिकेत जगदाळे, योगेश काळुंखे, लक्ष्मण राऊत, रोहित भापकर इत्यादींच्या उपस्थितीत जनजागृती करण्यात आली. अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी नेहरु युवा केंद्र यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment