Friday 9 February 2024

माजी सैनिकांनी सैनिक कल्याण विभागाच्या सरळसेवा पदभरतीसाठी अर्ज सादर करावेत

 

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. तरी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून पात्र उमेदवारांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

   सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी कल्याण संघटक 40 पदे, वसतिगृह अधीक्षक 17 पदे, कवायत प्रशिक्षक 1 पद, शारिरिक प्रशिक्षण निदेशक 1 पद अशा प्रकारच्या गट "क" या पदासाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधिक्षीका, गट-क-3 पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पुर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. वरील पदांपैकी एक पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानूसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता, उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. ही भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट टॅब येथे दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दि. 3 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक असून मुदतीनंतर वेबलिंक बंद होईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment