Thursday 29 February 2024

रब्बी हंगाम 2023-24 अंतर्गत पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे/ गारपीटमुळे नुकसानग्रस्त पिकाच्या क्षेत्राची पूर्वसूचना देण्यासाठी जाहीर आवाहन करणेबाबत

 


        जालना, दि. 29 (जिमाका) :- प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 शासनाने राबविण्यासाठी

दि.26 जुन 2023 अन्वये जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीला मान्यता दिलेली आहे. त्या अन्वये शेतकऱ्यांनी पिक विमा भरून आपले पिक संरक्षित केले आहे. परंतु दि.26 फेब्रुवारी 2024  रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे / गारपीटमुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात प्राथमिक नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. त्यानुषंगाने ज्या शेतकऱ्यांच्या पिक विमा काढलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन  क्रॉप इन्सुरन्स ॲप

  (https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central)  डाऊनलोड करुन त्यामध्ये पिक विमा संरक्षण घेतलेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त फोटोसह अपलोड करावी किंवा 1800-103-7712 टोल फ्री क्रमांक किंवा https://login.universalsompo.in/crop_claim website/  या संकेत स्थळावर तक्रार नोंद करावी. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार नोंदवणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि कंपनीच्या जिल्हा/ तालुका कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह सदरची तक्रार नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीची नोंद करणे आवश्यक आहे. सध्या पिकाचे नुकसान हे अवकाळी पावसामुळे / गारपीटमुळे झाले असल्याने हेच कारण नमूद करून नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे. हरभरा, गहू व ज्वारी या पिकाचा पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी यापूर्वी जरी तक्रार दिली असली तरी त्यांनी परत नुकसान भरपाईसाठी तक्रार देण्यात यावी. जेणेकरून नुकसान भरपाई पहिल्यापेक्षा जास्त मिळेल. तरी सर्व शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवताना योग्य ती खबरदारी घेऊनच नुकसानग्रस्त क्षेत्राची नुकसान सुचना / तक्रार विमा कंपनीकडे नोंदविण्याचे  आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment