Saturday 30 May 2020

जिल्ह्यात सहा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह यशस्वी उपचारानंतर अकरा कोरोनाबाधितांना डिस्चार्ज


यशस्वी उपचारानंतर अकरा कोरोनाबाधितांना डिस्चार्ज
            जालना दि. 30 (जिमाका) –   जिल्हा सामान्य रुग्णालयातुन राज्य राखीव पोलीस बलगट क्रं 3 चे दोन जवान, नविन जालना परिसरातील एका खाजगी रुग्णालयातील तीन कर्मचा-यांचा, पीरगैबवाडी ता. घनसावंगी येथील पाच व रांजणी ता. घनसावंगी येथील एका अशा एकुण अकरा कोरोनबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्यांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने दि. 30 मे 2020 या सर्वांना जिल्हा रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच         दि. 30 मे, 2020 रोजी साईनगर जालना येथील एक, खापरदेव हिवरा ता. घनसावंगी येथील तीन, धावडा              ता. भोकरदन येथील एक, नानसी पुनर्वसन ता. मंठा येथील एक अशा एकुण सहा जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
सध्या रुग्णालयात 59 व्यक्ती भरती आहेत, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 13 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2632 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने - 6 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -123 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2466, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या -347, एकुण प्रलंबित नमुने -39, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-11, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-44, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-79, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 3762 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
            कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 402 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-36, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-24,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -25, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-20, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -109 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-03, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-00, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-14 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -12 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -20, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-37, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे 13 अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -32, मॉडेल स्कुल मंठा-48, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर - 9, सेठ ई.बी.के. विद्यालय टेंभुर्णी -00 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 699 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 135 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 621 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख   603 असा एकुण   3 लाख 27  हजार 438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे
*-*-*-*-*-*-*

मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन जैववैद्यकीय घनकच-याची विल्हेवाट लावावी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे निर्देश


जालना, दि. 30 - जिल्हयातील सर्व खासगी तसेच शासकीय, निमशासकीय संस्था पॅथलॅब, आयुर्वेद, युनानी होमीयोपॅथीक, अॅलोपॅथी, दंत इत्यादी रुग्णसेवेतून आंतर बाहयरुग्ण विभागातून निर्माण होणारा जैववैद्यकीय            घनकच-याची विल्हेवाट जैव वैद्यकीय (व्यवस्थापन हाताळणी) कचरा नियम, २०१६ प्रमाणे करणे आवश्यक असून जिल्हयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेली संस्था कार्यरत आहे. सदर संस्था केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करुन जैव वैद्यकीय कच-याचे वैज्ञानिक पदधतीने जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावते. सर्व वैद्यकिय संस्थानी या संस्थेमार्फत किंवा इतर विहित पध्दतीने जैव वैद्यकिय कच-याची विल्हेवाट लावण्याची संपूर्ण व्यवस्था करावी. त्याचबरोबर वापरण्यात आलेल्या मास्कचीही विल्हेवाट योग्य पद्धतीने करण्यात यावी. यासाठी अंतिम 15 दिवसांची मुदत देण्यात येत आहे. यानंतर याप्रमाणे उपाययोजना केल्यास आपणाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
-*-*-*-*-*-

कोव्हीड केअर सेंटरमधील सोई- सुविधांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा


जालना दि. 30 (जिमाका) –  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जालना व बदनापुर तालुक्यातील एकुण 15 कोव्हीड केअर सेंटरच्या नोडल अधिकारी, प्रमुख व्यवस्थापकाची कोव्हीड केअर सेंटरमधील सोयीसुविधांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यता आलेल्या बैठकीत घेतला.
            या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपजिल्हा निवडणुक अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, संपर्क अधिकारी डॉ. संतोष कडले, तहसिलदार जालना श्रीकांत भुजबळ, तहसिलदार बदनापुर संतोष बनकर यांची उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालयातील नियुक्त डॉक्टरांनी कोव्हीड केअर सेंटरमधील रुग्णांची नियमितपणे तपासणी करावी. कोव्हीड केअर सेंटरमधील भरती असलेल्या सहवाशीतांची भोजन, निवासाची चोख व्यवस्था करण्यात यावी.  परिसरामध्ये स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच रुग्णांची असुविधा होत आहे अशी तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री‍ बिनवडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
                                                                    -*-*-*-*-*-

Friday 29 May 2020

जिल्ह्यात सात व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर आठ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना दि. 28 (जिमाका)-  जालना जिल्ह्यात दि. 28 मे, 2020 रोजी रात्री उशिरा पुष्पक नगर, जालना येथील दोन व्यक्तींच्या स्वॅबचा, कानडी ता. मंठा येथील एक, नुतनवाडी ता. जालना येथील एक, डोलारा ता. परतुर येथील एक, मठ पिंपळगाव ता. अंबड येथील एक व जालना शहरातील नुतन वसाहत परिसरातील एक अशा एकुण सात व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटीव्ह आला आहे. 
            तसेच वडगाव वखारी ता.जालना येथील तीन, टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील एक, शिरनेर ता. अंबड येथील एक, नवीन जालना परिसरातील खासगी रुग्णालयातील दोन कर्मचारी, साईनाथ नगर, जालना येथील एक अशा एकुण आठ कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन त्यांच्या स्वॅबचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना आज दि. 29 मे, 2020 रोजी रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
सध्या रुग्णालयात 81 व्यक्ती भरती आहेत, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 173 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2619 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -7 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -117 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2300, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या -347, एकुण प्रलंबित नमुने -198, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-08, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-33, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-84, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-2672 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
            कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 392 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-29, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-24,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -17, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-21, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -109 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-03, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-00, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-14 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -12 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -15, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-26, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –41, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-42, मॉडेल स्कुल मंठा-37, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर - 2, सेठ ई.बी.के. विद्यालय टेंभुर्णी-00 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 691 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 134 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 620 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 98 हजार 230 असा एकुण   3 लाख 25  हजार 38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे
*******




जालना जिल्ह्यात संचारबंदी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे सुधारित आदेश जारी


जालना दि. 29 (जिमाका) –  कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक कोरोना विषाणुमुळे व्यक्ती पॉझिटीव्ह आढळुन आल्याने याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणुची साखळी खंडीत करण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दि. 28 मे, 2020 रोजी जालना जिल्ह्यातील संपुर्ण ग्रामीण, नागरी क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया सहिंता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये संचारबंदीचे आदेश जारी केले होते.  परंतु नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करुन आज दि. 29 मे, 2020 रोजी सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले असुन या आदेशानुसार खालील बाबींना सुट देण्यात आली आहे.
वैद्यकीय सेवा, सर्व शासकीय व खाजगी रुग्णालये, दवाखाने, रुग्णवाहिका सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, खत, बी-बियाणे यांची दुकाने, खत वाहतुक व त्यांचे गोदाम, तसेच कापुस, गहु, हरभरा खरेदी, अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये महसुल, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, ग्रामविकास, अग्निशमन, कोविड- 19 कोरोना संबंधित कर्तव्यावर असणारे अधिकारी, कर्मचारी, औद्योगिक कारखाने, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॅानिक मिडिया यांचे संपादक, वार्ताहार, प्रतिनिधी , वितरक इत्यादी, पेट्रोल पंप वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने यांना या संचारबंदीधुन सुट देण्यात आली आहे. तसेच  दुध विक्रेते गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये घरोघरी जाऊन सकाळी 6 ते 9 या कालावधीत विक्री करावी, एका ठिकाणी थांबुन विक्री करता येणार नाही. सर्व शासकीय रास्त भाव दुकान व राष्ट्रीयकृत बँका केवळ रास्त भाव दुकानदार यांचेकडुन चलनाद्वारे पैसे भरणा करुन घेण्यासाठी, पाणी जार, पाणीटँकर सप्लाय, परवानाधारक भाजी व फळ विक्रेते (गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये घरोघरी जाऊन सकाळी 6 ते 9 या कालावधीत विक्री करावी, एका ठिकाणी थांबुन विक्री करता येणार नाही),  सर्व राष्ट्रीयकृत बँक सर्व प्रकारच्या शासकीय चलान भरण्याकरिता, ऑनलाईन किराणा (फक्त घरपोहोच),  सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये त्यांचे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने.
आदेशाचे पालन न करणा-या व्यक्ती, अधिकारी,कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येईल आणि पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक, जालना व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व उपविभाग जिल्हा जालना, सर्व तालुका दंडाधिकारी जिल्हा जालना, मुख्याधिकारी सर्व नगर परिषद व नगर पंचायती जिल्हा जालना यांच्यावर राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये नमूद केले आहे.  हे आदेश दि. 31 मे रोजीच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहतील.
*******

Thursday 28 May 2020

रोजगाराची आवश्यकता असणाऱ्या व्यक्तींनी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवकांशी संपर्क साधावा - मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा


जालना दि. 28 (जिमाका)-  सद्यस्थितीत ऊस साखर कारखाने बंद झाल्यामुळे  व कोवीड -19 या साथरोगाच्या पार्श्वभुमीवर इतर राज्य, जिल्ह्यातुन जालना जिल्ह्यातील मुळ गावी अनेक मजुरांचे स्थलांतर झालेले आहे.  त्यामुळे ज्यांना रोजगारांची आवश्यकता आहे त्यांनी तात्काळ आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधावा. याकामी काही अडचण असल्यास आपल्या पंचायत समिती, नरेगा कक्ष अथवा जिल्हा परिषद नरेगा कक्ष यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
            जालना जिल्ह्यातील मुळगावी परतलेल्या कामगारांना, मजुरांना त्यांचे गावातच रोजगार उपलब्ध करुन देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचातीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी आपल्या रोजगार सेवकांमार्फत सर्वेक्षण करुन घ्यावे. कामाची मागणी असणा-या प्रत्येक मजुराचे नमुना नंबर 1 भरुन घेऊन कुटुंबनिहाय जॉबकार्ड तयार करुन घ्यावेत व त्यांचे मागणीनुसार गावाच्या हद्दीतच काम उपलब्ध करुन घ्यावे.
            मनरेगा अंतर्गत यापुर्वी दिलेल्या सर्व सुचना व वेळोवेळी निघालेले शासन निर्णय व मार्गदर्शक सुचना यांचे पालन करुन सर्व मजुरांना काम पुरविण्यात यावे व वेळेवर मजुरी मिळण्याचे दृष्टीने सर्व प्रक्रिया विहित मुदतीत पार पाडावी, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.  
                                                                             -*-*-*-*-*-*-




जिल्ह्यात 25 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आतापर्यंत 25 रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 28 (जिमाका)-  जालना जिल्ह्यात दि. 28 मे, 2020 रोजी 25 व्यक्तींचा स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त  झाला असुन आतापर्यंत 25 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णलयातुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
            जालना शहरातील ढोरपुरा परिसरातील व सध्या शासकीय मुलींचे निवासी वसतीगृह, जालना या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या तीन जणांच्या स्वॅबचा अहवाल, जालना शहरातील नुतन वसाहत परिसरातील व सध्या शासकीय मुलींचे  निवासी वसतीगृह मोतीबाग, जालना या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरणात असलेलया तीन व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल, मठपिंपळगाव ता. अंबड येथील व सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, अंबड या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या सहा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल, काटखेडा ता. अंबड येथील व सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, अंबड या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या पाच व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल, मुंबईवरुन परतलेले व मुळचे अंबड शहरातील शारदानगर परिसरात राहणारे आणि सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, अंबड या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या पाच जणांच्या स्वॅबचा अहवाल, सामनगांव ता. जालना येथील एका 32 वर्षीय पुरुषाच्या स्वॅबचा अहवाल, बदनापुर येथील एका 33 वर्षीय पुरुषाच्या स्वॅबचा अहवाल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. 3 येथील व सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या एका 42 वर्षीय जवानाच्या स्वॅबचा असे एकुण 25 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल दि. 28 मे 2020 रोजी प्रयोगशाळेकडुन पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण 2274 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 71 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 1024 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 60 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2448 एवढी आहेदैनिक पॉझिटीव्ह नमुने -25 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -110 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2256, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या -345, एकुण प्रलंबित नमुने -78 तर एकुण 953 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या-08, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या- 843 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या- 29, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -410, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-17, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -71, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -25, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-2568 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
            कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 410 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-21, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-25,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -42, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-14, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -128 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-03, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-00, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-14 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -12 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -15, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-24, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे 52, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-04, मॉडेल स्कुल मंठा-39, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर - 2, सेठ ई.बी.के. विद्यालय टेंभुर्णी-15 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 679 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 121 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 618 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 96हजार 830 असा एकुण   3 लाख 23  हजार 638 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून 

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन


जालना,दि.28स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी  निवृत्ती गायवाड यांनी  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
 यावेळी  तहसिलदार प्रशांत पडघन, नायब तहसिलदार श्रीमती स्नेहा कुहिरे , नायब तहसिलदार श्रीमती मयुरा पेरे, श्रीमती  आर. आर. महाजन ,  श्रीमती संपदा कुलकर्णी श्रीमती छाया कुलकर्णी, यांच्यासह इतर अधिकारी , कर्मचारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
      *-*-*-*-*-*-*

पुढील तीन दिवस जालना जिल्ह्यात संचारबंदी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी


जालना दि. 28(जिमाका) –  कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. सद्यस्थितीत दि. 28 मे 2020 रोजीपर्यंत जालना जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक कोरोना विषाणुमुळे व्यक्ती पॉझिटीव्ह आढळुन आल्याने याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणुची साखळी खंडीत करण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) मधील तरतुदी नुसार दि. 28 मे 2020 रोजीच्या रात्रीच्या 12 वाजेपासुन ते दि. 31 मे 2020 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत जालना जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण, नागरी क्षेत्रात संपुर्ण संचारबंदी लागु करण्यात आले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
वैद्यकीय सेवा, सर्व शासकीय व खाजगी रुग्णालये, दवाखाने, रुग्णवाहिका सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, खत, बी-बियाणे यांची दुकाने, खत वाहतुक व त्यांचे गोदाम, तसेच कापुस, गहु, हरभरा खरेदी, अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये महसुल, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, ग्रामविकास, अग्निशमन, कोविड- 19 कोरोना संबंधित कर्तव्यावर असणारे अधिकारी, कर्मचारी, औद्योगिक कारखाने, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॅानिक मिडिया यांचे संपादक, वार्ताहार, प्रतिनिधी , वितरक इत्यादी, पेट्रोल पंप वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने यांना या संचारबंदीधुन सुट देण्यात आली आहे. तसेच  दुध विक्रेते गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये घरोघरी जाऊन सकाळी 6 ते 9 या कालावधीत विक्री करावी, एका ठिकाणी थांबुन विक्री करता येणार नाही. सर्व शासकीय रास्त भाव दुकान व राष्ट्रीयकृत बँका केवळ रास्त भाव दुकानदार यांचेकडुन चलनाद्वारे पैसे भरणा करुन घेण्यासाठी सुट देण्यात आली आहे.
या संचारबंदी कालावधीत जालना जिल्ह्यातील नागरीकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑॅफलाईन पास मिळणार नाही. परंतु मेडीकल इर्मजन्सी असल्यास पाससाठी नागरीकांनी ऑनलाईन अर्ज www.covid19.mhpolice.in  या संकेतस्थळावर भरुन प्राप्त करुन घेता येईल.
 जालना जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुखांना अतिशय आवश्यकता भासल्यास अपर जिल्हादंडाधिकारी, जालना यांचेशी संपर्क साधुन अत्यावश्यक बाब म्हणुन कार्यालय उघडण्याची व अतिशय मर्यादीत अधिकारी  व कर्मचा-यांना बोलविण्याची परवानगी घ्यावी.
आदेशाचे पालन न करणा-या व्यक्ती, अधिकारी,कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येईल आणि पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक, जालना व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व उपविभाग जिल्हा जालना, सर्व तालुका दंडाधिकारी जिल्हा जालना, मुख्याधिकारी सर्व नगर परिषद व नगर पंचायती जिल्हा जालना यांच्यावर राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये नमूद केले आहे.
*******

पालकमंत्री राजेश टोपे यांची कोव्हीड रुग्णालयास भेट रुग्णांना उपचारासोबतच पौष्टीक आहार देण्याचे निर्देश



जालना, दि. 28 (जिमाका):- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दि. 27 मे रोजी रात्री उशिरा जालना येथील कोव्हीड हास्पीटलला आज भेट देत रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेत रुग्णांच्या प्रकृतीमध्ये त्वरेने सुधारणा होण्यासाठी रुग्णांना औषधोपचाराबरोबरच पौष्टीक आहार देण्याचे निर्देश दिले.
        या भेटीप्रसंगी मंत्रीमहोदयांसमवेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा  शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
        कोव्हीड रुग्णालयासंदर्भात माहिती घेताना पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जिल्ह्यात कोव्हीड बाधितांना तातडीने उपचार मिळावेत या उद्देशानेच अत्यंत कमी कालावधीमध्ये या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.  या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या कोव्हीडबाधित रुग्णांना आवश्यक ते औषधोपचार देण्याबरोबरच रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये पौष्टीक अशा बाबींचा समावेश करण्याचे निर्देशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
        जिल्ह्यातील रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात मिळाव्यात यादृष्टीकोनातुन आवश्य त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असुन निधीची कमतरता भासु दिली जाणार नाही. रुग्णालयास आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत असुन रुग्णालयासाठी आवश्यक तंत्रज्ञही तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी दिले.  कोव्हीड रुग्णालयासाठी तातडीने दोन हजार पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
        जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या निर्देशानुसार रुग्णांना आवश्यक त्या औषधोपचाराबरोबरच त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक असल्याने या रुग्णांसाठी संतुलित आहाराचा दिनक्रम ठरविण्यात आला आहे.  रुग्णांना दोन वेळेत वरण, भात, भाजी, पोळी याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यामध्ये मदत करणारे उकडलेले अंडे, गुळ, शेंगदाणे, सोयाबीन वडी, दुध याबरोबरच प्रोटीनचा भरपुर समावेश असलेल्या थ्रेप्टीन बिस्कीटांचाही या रुग्णांच्या आहारामध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी मंत्री महोदयांना दिली.
*******