Thursday 21 May 2020

पणन हंगाम 2019-20 (रब्बी) मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु


जालना, दि. 21 - हंगाम 2019-20 (रब्बी)  करिता आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने भरडधान्य (ज्वारी,  मका)  खरेदीसाठी शेतक-यांची नोंदणी प्रक्रिया नाफेड मार्फत ऑनलाईन पध्दतीने NEML पोर्टलवर नोंदणी सुरु करण्यात आली आहे.  नोंदणी करताना शेतक-यांचे सन 2019 मधील चालु वर्षाचा ऑनलाईन 7/12 उतारा, आधारकार्ड, बँक खाते पासबुक स्कॅन करुन पोर्टलवर अपलोड करुनच शेतकरी ऑनलाईन नोंदणी करण्यात येईल. हमी भावाने ज्वारी, मका खरेदीसाठी नोंदणीचा कालावधी हा  दि. 30 जुन 2020 पर्यंत राहणार असल्याचे  नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक सहसकारी संस्था विमल वाघमारे, जिल्हा मार्केटींग अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
भरडधान्य खरेदीसाठी तालुकानिहाय खरेदीदार संस्थांची विभागणी करण्यात आली असुन  जालना बदनापुर तालुक्यासाठी मे.जडाई फार्मर प्रोडयुसर कंपनी रेवगांव ता. जालना, अंबड तालुक्यासाठी अंबड तालुका खरेदीविक्री संघ मर्या. अंबड ता.अंबड, घनसावंगी तालुक्यासाठी मे.हरीयाली ग्रीनव्हेज प्रोडयुसर कंपनी वडीकाळा (तिर्थपुरी) ता.घनसावंगी, भोकरदन तालुक्यासाठी मोरेश्वर शेतकरी सहकारी खरेदी -विक्री संघ मर्या. भोकरदन, जाफ्राबाद तालुक्यासाठी पुर्णा सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या. जाफ्राबाद ता. जाफ्राबाद, परतुर तालुक्यासाठी मे.श्रीराम अंध अंपग औदयोगीक उदयोजक सेवाभावी संस्था मर्या. तर मंठा तालुक्यासाठी नानसी धान्य अधिकोष बहुउद्देशिय सहकारी संस्था मर्या. नानसी ता. मंठा या संस्थेमार्फत भरडधान्याची खरेदी करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
*******

No comments:

Post a Comment