Tuesday 26 May 2020

जालना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील गाळ लाभाधारक शेतकऱ्यांनी स्वखर्चाने काढून घ्यावा -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन


जालना दि. 26 (जिमाका) –  सध्या उन्हाळयाच्या कालावधीत शेतीमधील मशागतीचे कामे सुरु आहेत.  त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील बरेचशे प्रकल्प, सिंचन तलाव, साठवण तलावातील पाणीसाठी कमी झालेला आहे.  त्यामुळे बऱ्याचशा तलावात मोठ्या प्रमाणात गाळ मिळु शकतो.  या गाळाचा वापर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी केल्यास शेत जमिनीची प्रत सुधारुन शेतजमिनीची सुपिकता वाढुन शेती उत्पन्नात वाढ होणार आहे.  त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी तलावात उपलब्ध असलेला गाळ शेतकऱ्यांना शेतीसाठी स्वखर्चाने काढणार असतील तर त्यासाठी तातडीने नियोजन करावे.  तसेच शेतकरी स्वखर्चाने गाळ घेऊन जाण्यास तयार असतील त्यांनी संबंधित तहसिलदार, सिंचन विभागाच्या कार्यालयाकडे संपर्क करुन रितसर परवानगी घेऊन गाळ काढुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
सध्या जालना जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे एकुण 47, प्रकल्प व जलसंधारण विभागाचा एक लघुपाटबंधारे तलाव व 13 साठवण तलाव, जिल्हा परिषद विभागाकडील 14 सिंचन तलावापैकी ज्या तलावात अत्यल्प पाणीसाठी आहे किंवा जे प्रकल्प कोरडे आहेत त्यामधील गाळ काढण्याचे काम त्वरित संबंधित तलावाचे शाखाधिकारी व उप विभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली करण्यात यावे.  त्यानंतर ज्या प्रमाणात गाळ काढण्यासाठी बुडीतक्षेत्र उपलब्ध हेाईल्, त्याप्रमाणे सर्व कामे सुरु होतील, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तलावातील गाळ काढल्यामुळे तलावाणी पाणी साठवण क्षममेमध्ये वाढ होऊन सिंचनक्षमता वाढीस मदत होणार असल्याचेही नमूद केले आहे.
कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता गाळ काढण्यासाठी सामाजिक अंतर ठेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. पावसाळा कालावधी लवकरच असल्याने उर्वरित कालावधीचा विचार करता विविध ठिकाणी एकाच वेळी कामे सुरु होतील, याची दक्षता घेण्चाचे निर्देशही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
*******

No comments:

Post a Comment