Friday 15 May 2020

अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरु ठेवण्यासाठी वेळा निश्चित जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे सुधारीत आदेश जारी


जालना, दि. 15 (जिमाका) :-         कोव्हीड-19 च्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या काळात  नागरिकांची अत्यावश्यक वस्तुंची खरेदीसाठी गैरसोय होऊ नये यादृष्टीकोनातुन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळा एका आदेशान्वये निश्चित करुन दिल्या आहेत.    किराणा, धान्य दुकाने, डिमार्ट, दुध, भाजीपाला दुकाने, पिठाची गिरणी, मिरची कांडप गिरणी,घरपोहोच भाजीपाला व किराणा माल, पेट्रोल पंप सर्वांसाठी हे सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 डिझेल पंप सर्वांसाठी सकाळी 7.00 ते 5.00  वाजेपर्यंत  सुरु राहतील.  न शिजवलेले मटण, चिकन व मासे विक्री ( फक्त घरपोहोच सेवा) सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत,
      सर्व शासकीय कार्यालये, ग्रामीण, नागरी भागातील सर्व पोस्ट कार्यालये, एमएसईबी, दुरसंचार विभाग आदी शासकीय कार्यालये (सुट्टीचा दिवस वगळता)  राष्ट्रीयकृत व्यावसायिक बँका, ग्रामीण, नागरी भागातील खासगी, राष्ट्रीयकृत बँका, विविध कार्यकारी सोसायट्या, विविध पतसंस्था (सुट्टीचा दिवस वगळता) नियमित कार्यालयीन पुर्णवेळ.
        ई-कॉमर्स (फक्त घरपाहोच सेवा), इलेक्ट्रीकल्स व इलेक्ट्रॉनिक साहित्यांची दुकाने, हार्डवेअर,सिमेंट दुकाने, प्टीकल्स दुकाने, प्लंबींग व सॅनिटरी हार्डवेअर दुकाने, बांधकामाची निगडीत रंगकाम व फरशी साहित्याची दुकाने. पेपर विक्री व्यवसाय दुकाने (पेपरस्टॉल) सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत तर पेपर वितरणासाठीची वेळ सकाळी 9.00 पुर्वी राहील. खते, बियाणे, औषधे, कृषीयंत्रे, औजारे, ट्रॅक्टर उपकरणे व त्यांची दुरुस्ती, स्पेअरपार्ट, स्प्रेपंप, सिंचन साहित्य, पाईप, ठिबक, तुषार सिंचन, शेततळे अस्तरीकरण कागद आदीसबंधी दुकाने व दुरुस्ती यांच्यासाठीची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6-00 अशी राहील.
      खासगी हॉस्पीटल, खासगी डॉक्टरांची सेवा, औषधी दुकाने, हॉस्पीटलमधील औषधी दुकाने, एलपीजी गॅस पुरवठा,प्रसार माध्यमांची अधिकृत कार्यालये हे पुर्णवेळ सुरु राहतील. जिल्ह्यातील ने-आण करणारे दुधविक्रेते यांना वरील वेळेव्यतिरिक्त सायंकाळी 6-00 ते 8-00 या वेळेत जिल्ह्यात दुध वाटपासाठी, संकलन केंद्रावर जमा करण्यासाठी आदेशातुन सुट देण्यात आली आहे. 
            आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येऊन कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
                                                   *-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment