Friday 15 May 2020

जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत हद्दीतील बांधकामे चालु ठेवण्यास अटी व शर्तीवर परवानगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी


जालना, दि. 15 (जिमाका):- जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत हद्दीमधील बांधकामे चालु ठेवण्यासाठी अटी शर्तीवर परवानगी दिली आहे.
            जिल्ह्यातील शहरी क्षेत्रामधील वेळोवेळी निश्चित केलेले बाधित क्षेत्र (Containment Zone) वगळुन सर्व शासकीय खासगी चालु असलेल्या बांधकामास काम सुरु करण्यासाठी परवानगी द्यावयाची आहे. यासाठी अर्जदाराने संबंधित तहसिलदार (Incident Commander) यांच्याकडे रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे.  नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रामध्ये पुर्वीपासुन चालु असलेली बांधकाम पूर्ववत चालु ठेवण्यासाठी परवानगी राहील.  सदरचे बांधकाम कामगार स्थानिक मजुरांमार्फत करणे बंधनकारक राहील.  स्थानिक क्षेत्राबाहेरील कोणताही कामगार आणता येणार नाही. याकामी संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी अहवाल संबंधित तहसिलदार (Incident Commander) सादर करावा. त्यावर सबंधित तहसिलदार (Incident Commander) यांनी परवानगी देणेबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.  तहसिलदार (Incident Commander) यांनी फक्त कोरोना कालावधीसाठी चालु असलेल्या बांधकाम करण्याची परवानगी द्यायाची आहे.  बांधकामाच्या परवानगीबाबत अर्जदार यांच्याकडून शासन मार्गदर्शक सुचनांचे पालन करणार असल्याबाबत शपथपत्र घ्याव विनाविलंब चालु असलेल्या बांधकामास परवानगी द्यावी. ज्या नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत बांधकामे चालु आहेत अशा ठिकाणावरील कामगार हे कामाच्या आवाराच्या बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता घ्यवी.  तसेच संबंधित ठेकेदार यांनी कामगारांच्या भोजनाची पिण्याच्या पाण्याची सोय कामाच्या आवारातच करणे आवश्यक राहील. सदरची परवानगी ही आजमितीस जालना जिल्ह्यात रहिवाशी असलेल्या कामगार यांच्यासाठीच असुन नव्याने परजिल्ह्यातील कामगार येणार नाहीत, याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदार यांची राहील. कामाच्या ठिकाणी आवश्यक मास्क सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सींग तसेच आरोग्य सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहील.
            वरील आदेशाचे पालन करणाऱ्या व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा..वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येईल पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
*******

No comments:

Post a Comment