Friday 31 July 2020

जिल्ह्यात 62 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 54 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



            जालना दि.31 (जिमाका) :- जालना शहरातील  निलकंठ नगर -1, समर्थ नगर-1, जे.ई.एस. कॉलनी-1, गांधी चमन -2, गोपीकिसन नगर -3, कचेरी रोड -1, प्रियदर्शनी कॉलनी -1, कोळेश्वर गल्ली-1, साई नगर-2, ख्रिश्चन कॉलनी -1,  यशवंत नगर-1, दर्गावेस -1,  काद्राबाद-1, प्रशांतीनगर-5, ग्रीन पार्क -3, प्रितीसुधा नगर-3, म्हाडा कॉलनी -1, संभाजीनगर -1,बदनापूर-1, बुटखेडा-1, साष्ट पिंपळगाव-9, चांदई एक्को -2, जळगांव सपकाळ-2, केदारखेडा -4, पिरगैबवाडी -2, राधगड -1,  शहागड -2, अशा एकुण 54 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला  तर जालना शहरातील तेरापंथी भवन-1, सुखधाम नगर-1, भवानी नगर -4, दानाबाजार-1, कडबी मोहल्ला -1, बजरंग दाल मिल -1, जांगडा नगर -1, रामनगर ख्रिस्ती  कॅम्प -1, ख्रिश्चन कॉलनी -1, प्रशांती नगर -1, एमएसईबी कॉलनी -1, रामनगर पोलीस कॉलनी-1, मुर्तीवेस -1, जमुना नगर -2, भाजी मंडई जुना जालना-1, अयोध्यानगर-1, अकोला तांडा ता. जाफ्राबाद-3, अंबड शहर -4, शहागड -3, साष्टपिंपळगाव-2, वाळकेश्वर -1, राणीउंचेगाव -1, रांजणी -4, चिंचोली -1, देऊळगांव राजा-1, बुटखेडा-4, नुतन कॉलनी,  भोकरदन -3, महेश नगर सेलु-1, अशा एकुण 48  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 14 अशा एकुण 62  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   
        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7347 असुन  सध्या रुग्णालयात-429 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2794, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-135 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-12573 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-62 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2187 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-10114,रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-439 एकुण प्रलंबित नमुने-183, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2361.
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-75, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2293, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-97, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-526, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-36, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-429,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-135,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-54, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1454, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-663 (18 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-24233 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-70 एवढी आहे.
            खंडोबा मंदीर, भोकरदन येथील  रहिवाशी असलेल्या 74 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 27 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना          दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 31 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. गोंदी  ता. अंबड येथील रहिवाशी असलेल्या 39 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 27 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि.30जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला.  सिंगोना ता. परतुर येथील रहिवाशी असलेल्या 60 वर्षीय महिला  रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना        दि. 8 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 10 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि.30 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 
आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 526 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-64,शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना-13,वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह- 52, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-14,मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन,वसतिगृह-5, जे.. एस. मुलांचे वसतिगृह-58, जे. . एस. मुलींचे वसतिगृह-46, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-51, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-23, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-10, मॉडेल स्कुल, परतुर-7, केजीबीव्ही परतुर-18, केजीबीव्ही मंठा-23, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-15,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-2, शासकीय मुलांचे वसतीगृह,बदनापुर-39 ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी-67,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह,घनसावंगी-5,शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-5, शासकीय मुलांचे वसतिगृह, भोकरदन-17, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-24,आय.टी.आय कॉलेज, जाफ्राबाद-1, हिंदुस्तान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-1, सेठ ईबीके विद्यालय, टेभुर्णी -5, राजमाता जिजाऊ इंग्रजी शाळा-8.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत  200 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1047 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. . पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 1 लाख 7 हजार,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 65 हजार 530 असा एकुण 8 लाख 99  हजार 338 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
*******

कोरोनासंदर्भातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरु



      जालना, दि. 31 – कोरोनासंदर्भातील नागरिकांच्या असलेल्या अडचणी, समस्या या संदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली असुन त्याचा क्रमांक 7262927373असा आहे.  कोरोना संदर्भात आवश्यक असलेल्या आरोग्य विषयक माहितीसाठी या हेल्पलाईनवरुन तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत तर नागरिकांच्या काही प्रशासकीय अडचणी असतील त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत सोडविण्यात येणार आहेत.
           कोरोनासंदर्भात आरोग्य तसेच प्रशासकीय समस्या, अडचणी असतील तर नागरिकांनी हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
*******

सामाजिक अंतर न राखणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाची कारवाई 204 व्यक्तींकडून 40 हजार 400 रुपयांचा दंड वसुल



                                                                           
      जालना,दि. 31 (जिमाका):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यामध्ये सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस तसेच जिल्हा प्रशासनामार्फत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दि.31 जुलै, 2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 204 व्यक्तींकडून 40 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
     यामध्ये जालना तालुक्यात 142 व्यक्तींकडून 29 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे तर बदनापुर 21 व्यक्तींकडून 2 हजार 100, जाफ्राबाद 9 व्यक्तींकडून 2 हजार 400, परतुर 32 व्यक्तींकडून 6 हजार 400 रुपये अशा प्रकारे एकुण 204 व्यक्तींकडून 40  हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.                                          
      नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये,  सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
*******

Thursday 30 July 2020

जिल्ह्यात 68 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 40 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


            जालना दि.30 (जिमाका) :- जालना शहरातील  संभाजीनगर -10, देहेडकरवाडी-1, पाणीवेस 1, लोधीमोहल्ला -1, दुर्गामाता रोड -1, अकोले ता. जालना -1, पिवळा बंगला -1, नागेवाडी-1, रामनगर पोलीस कॉलनी -1, मनीषा नगर -3, आर.पी. रोड -5, राममंदिर परिसर-1,समर्थनगर -2, विणकर कॉलनी -2, चंदनझिरा -1, इंदिरानगर -1, ख्रिश्चन कॉलनी -1, विद्यानगर -1, परतुर शहर -2, भोकरदन शहर-2, आवलगाव ता. घनसावंगी -1,अशा एकुण 40 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला  तर जालना शहरातील अंबड चौफुली जवळील एका खाजगी रुग्णालयातील -9, रामनगर-6, बु-हाणनगर-5, भाग्यनगर -4, गोपीकिशन नगर-4, अग्रसेन नगर-3, दर्गावेस-1, इंदिरा नगर -1, पोलीस कॉलनी -1, सिव्हिल हॉस्पिटल -1,पांगारकर नगर -1, साईनगर -2,मंठा चौफुली जवळील एका खाजगी रुग्णालयातील -1, समर्थनगर -3, शिवाजी नगर -2, दु:खीनगर-2, मंमादेवी नगर -1, वैभव कॉलनी -1, कडबीमंडी -1, अलंकार रोड -1, रामनगर पोलीस कॉलनी-1, मिशन क्वॉर्टर-1, शिवाजी महाराज पुतळा परिसर-1, रमाई नगर -1, रेल्वे स्टेशन-1, कचेरी रोड -1, जवाहर बाग -1, रामनगर ख्रिस्ती कॅम्प-1, ढोकसाळ ता. मंठा -1, भांबेरी -1, विद्यानगर सेलू जिल्हा परभणी येथील-1, हिवरा फाटा ता. जालना -1, भोकरदन शहरातील -2 अशा एकुण 64  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 4 अशा एकुण 68  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   
        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7269 असुन  सध्या रुग्णालयात-469 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2758, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-205 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-12284 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-68 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2125 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-9839,रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-439 एकुण प्रलंबित नमुने-231, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2334.
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -64, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2218, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-107, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-573, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-23, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-469,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-95, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-40, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1400, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-658 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-17, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-23003 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-67 एवढी आहे.
            जालना शहरातील जवाहर बाग  येथील रहिवाशी असलेल्या 80 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 26 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना          दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 29 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. भगवान कॉलनी देऊळगाव राजा  येथील रहिवाशी असलेल्या 65वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 29 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना          दि. 29 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 30 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 573 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-7, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह- 5,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-9, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन, वसतिगृह-67, जे.. एस. मुलांचे वसतिगृह-18,,जे. . एस. मुलींचे वसतिगृह-16, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-51, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-2, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-101,गुरुगणेश भवन-59 मॉडेल स्कुल, परतुर-18, मॉडेल स्कुल मंठा-15,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-13, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-43, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-76 ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी-5, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह,घनसावंगी-2, शासकीय मुलींचे, वसतिगृह, भोकरदन-21, शासकीय मुलांचे, वसतिगृह, भोकरदन-10, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-1, आय.टी.आय कॉलेज, जाफ्राबाद-1, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-5, जिजाऊ इंग्रजी शाळा जाफ्राबाद -21, राजमाता जिजाऊ इंग्रजी शाळा -5.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत-200 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1045 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. . पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 99600,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 52 हजार 830 असा एकुण 8 लाख 79  हजार 738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
             जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोरोना आजारासंबंधी असणा-या अडचणी, समस्या या संदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरु करण्यात आली असुन हेल्पलाईन नंबर 7262927373 आहे. या हेल्पलाईन वरुन तज्ञ डॉक्टर व काही प्रशासकीय अडचणी असल्यास प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शन करतील. तरी या हेल्पलाईन जिल्ह्यातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
*******

     

सामाजिक अंतर न राखणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाची कारवाई 385 व्यक्तींकडून 75 हजार 700 रुपयांचा दंड वसुल



                                                                           
      जालना,दि. 30 (जिमाका):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यामध्ये सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस तसेच जिल्हा प्रशासनामार्फत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दि.30 जुलै, 2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 375 व्यक्तींकडून 75 हजार 700 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
     यामध्ये जालना तालुक्यात 113 व्यक्तींकडून 24 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे तर बदनापुर 33 व्यक्तींकडून 3 हजार 700, भोकरदन 125 व्यक्तींकडून 25 हजार रुपये, जाफ्राबाद 22 व्यक्तींकडून 3 हजार 800, अंबड 25 व्यक्तींकडून 7 हजार, घनसावंगी 5 व्यक्तींकडून 1 हजार, परतुर 46 व्यक्तींकडून 8 हजार 400 रुपये तर मंठ्यामध्ये 16 व्यक्तींकडून 2 हजार 400 अशा प्रकारे एकुण 385 व्यक्तींकडून 75  हजार 700 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
      नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये,  सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
*******

जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी



जालना, दि. 30 - कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात विविध प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍यात येत आहे. त्‍यानुषंगाने शासनाने संपूर्ण राज्‍यात लॉकडाऊन दिनांक ३१ऑगस्ट, २०२० रोजीच्‍या मध्‍यरात्री पर्यंत वाढविला आहे. तसेच लॉकडाऊन मधील निर्बंधांची सुलभता आणि लॉकडाउन टप्पानिहाय उघडणे (Easing of restrictions and phase-wise opening of lockdown-Mission Begin Again) बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्‍या आहेत व यामध्‍ये नमुद केल्‍यानूसार स्थानिक स्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी हे त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रात साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी बिगर जिवनाअवश्‍यक बाबी व नागरीकांच्‍या रहदारीवर ठराविक भागात काही उपाययोजना व आवश्यक बंधने लागू करु शकतात. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी लॉकडाऊन मधील निर्बंधांची सुलभता आणि लॉकडाउन टप्पानिहायउघडणे (Easing of restrictions and phase-wise opening of lockdown-Mission Begin Again) बाबत निर्गमित केलेल्‍या सुधारीत मार्गदर्शक सूचनांच्‍या अनुषंगाने खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बिगर जिवनावश्‍यक बाबी जसे शॉपींग, मैदानी व्‍यायाम हे नागरीक वास्‍तव्‍यास असलेल्‍या परिसरातील भागापुरते मर्यादीत राहील. तसेच हे करीत असतांना मास्‍क घालणे, सोशल डिस्‍टंसिंगचे पालक करणे आणि वैयक्तिक स्‍वच्‍छता राखणे बंधनकारक राहील. परिशिष्‍ट - २ मध्‍ये नमुद बाबींकरीता व आवश्‍यक मानवतावादी कार्यासाठी वैद्यकीय कारणासह जाण्‍या-येण्‍यासाठीच परवानगी राहील. आदेशासोबत जोडलेल्‍या परिशिष्‍ट-१मध्ये नमूद केल्यानुसार कोविड व्यवस्थापनाचे राष्ट्रीय निर्देश संपूर्ण जिल्‍ह्यात पाळणे बंधनकारक राहील व याची अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी संबंधीत विभाग,कार्यालय,यंत्रणांची राहील व या आदेशासोबत जोडलेल्‍या परिशिष्‍ट-२मध्ये नमूद केल्यानुसार वेळोवेळी परवानगी दिलेल्‍या बाबी सुरू ठेवल्या जातील.पूर्वीचे सर्व आदेश या आदेशासह संरेखित केल्या जातील आणि 31 ऑगस्ट २०२० रोजीच्‍या मध्‍यरात्री पर्यंत अंमलात राहतील. प्रतिबंधित राहिलेले कामांचे निर्बंध शिथील करणे व मानक कार्यपद्धती / मार्गदर्शक तत्त्वांसह टप्प्याटप्प्याने उघडणे संदर्भात शासनाकडून सूचना प्राप्‍त झाल्‍यानंतर निर्गमित करण्‍यात येतील.
                   कूठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सूचनांचे उलल्ंघन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार कारवाई केलीजाईलत्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.
परिशिष्‍ट-१
कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना
1)  सर्व सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी व प्रवासाच्‍या वेळी फेस कव्हर घालणे अनिवार्य आहे.
2)  सार्वजनिक स्थानांवर सर्व व्यक्तींनी किमान ६ फुट (२ गज की दुरी) अंतर राखणे बंधनकारक राहील.
दुकानदारांनी ग्राहकांमध्ये योग्‍य शारीरिक अंतर सुनिश्चित करावे आणि दुकानात एकाच वेळी ५ पेक्षा अधिक व्‍यक्‍ती जमणार नाही याची दक्षता घ्‍यावी.
3)  मोठया प्रमाणावर गर्दी होणारे मोठी सार्वजनिक संमेलने, मेळावे प्रतिबंधीत राहतील.
लग्‍नासारख्‍या सार्वजनिक कार्यक्रमात अतिथींची संख्या ५०पेक्षा जास्त नसावी.
अंत्‍यविधी,  अंतिम संस्‍कार प्रसंगी २० पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना परवानगी असणार नाही.
4) सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी थुंकणे राज्य, स्थानिक प्राधिकरणाद्वारे कायदे, नियम किंवा नियमांनुसार विहित केलेल्या दंडास दंडनीय असेल.
5)  सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तंबाखू इत्‍यादीचे सेवन करण्‍यास प्रतिबंधराहील.
कामाच्या ठिकाणी पाळावयाचे अतिरिक्त निर्देश:-
6)  वर्क फ्रॉम होमः- शक्‍यतोवर घरून काम करण्याची पध्‍दतीचा अवलंब करावा.
कार्यालयीन कामाच्या ठिकाणे, दुकाने, बाजारपेठ आणि औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये शिफटनिहाय कामाजाच्‍या वेळा निश्चित कराव्‍यात.
7) तपासणी आणि स्वच्छताः- सर्व प्रवेश आणि बाहेर जाण्‍याच्‍या मार्गावर आणि सर्वसामान्य भागात थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश, सॅनिटायझरची व्‍यवस्‍था करावी.
8)  वारंवार स्वच्छताः- सर्व कामाच्‍या ठिकाणाचे, सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हॅडल आदींचे दोन पाळया दरम्‍यान तसेच वांरवार निर्जतूकीकरण करावे.
9)  सामाजिक अंतरः- दोन पाळयांमध्‍ये सुयोग्‍य अंतर ठेवून तसेच भोजन अवकाशाची वेळ योग्‍य अंतराने ठेवून व इतर मार्गाचा वापर करून कामाच्‍या ठिकाणी कामगार,कर्मचारीमध्‍ये योग्‍य अंतर राखले जाईल याची दक्षता कामाच्या ठिकाणी प्रभारी असलेल्‍या व्‍यक्‍तींनी घ्‍यावी.
परिशिष्‍ट-२
1)       सर्व जिवनावश्‍यक शॉप्‍स ज्‍यांना या आदेशाच्‍या पूर्वी खूली राहण्‍यास परवानगी देण्‍यात आलेली आहे ती त्‍या प्रमाणेच सूरू राहतील.
2)      जिल्‍हाअंतर्गत बस वाहतूक ही आसन क्षमतेच्या कमाल ५० टक्के क्षमतेनुसार चालविण्यास परवानगी राहील. तथापी बसमध्ये योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन होण्यासह बसचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायजेशन) करणे आवश्‍यक राहील.
3)      आंतरजिल्‍हा वाहतूकीचे पूर्वीप्रमाणेच नियमन राहील.
4)     सर्व बिगर जिवनावश्‍यक मार्केटस,शॉप्‍स हे सकाळी ९.०० ते सांयकाळी ७.०० पर्यंत सूरू राहतील.
5)      मॉल्‍स व मार्केट कॉमपलेक्‍स हे दिनांक ०५ ऑगस्‍ट २०२० पासून सकाळी ९.०० ते सांयकाळी ७.०० वाजेपर्यंत त्‍यातील सिनेमागृहाशिवाय सुरु राहतील. तथापी मॉल्‍समधील फुड कोर्टस,  रेस्‍टॉरंटस मधील किचन फक्‍त घरपोच वितरण सेवेसाठी सुरु राहतील. शहरी व ग्रामीण भागातील स्‍थानिक प्राधिकरण यासाठी मानक कार्यप्रणाली निश्चित करतील.
6)      खुली जागा, लॉन्स, विना वातानुकुलीत मंगल कार्यालय,हॉल,सभागृह येथे लग्‍न समारंभ पार पाडण्‍यासाठी शासनाचे दिनाकं २३ जुन २०२० रोजीचे आदेश व या कार्यालयाचे आदेश क्र.२०२०/आरबी-डेस्‍क-१/पोल-१/कावि-दिनांक २३ जुन २०२० लागू राहील.
7)     निर्बंधासह (योग्‍य शारीरिक अंतर ठेवून) बाह्य शारीरिक क्रिया (व्‍यायाम, इ.) परवानगी राहील.
8)      वर्तमानपत्रांचे मुद्रण व वितरण (होम डिलिव्हरीसह)करता येईल.
9)     शैक्षणिकसंस्‍था (विद्यापीठ / महाविद्यालय / शाळा) ची कार्यालये / कर्मचारी केवळ शिक्षकेत्‍तर उद्येशाने (only for the purpose of non-teaching activities) जसे ई-सामग्रीचा विकास, उत्‍तरपत्रीकांचे मुल्‍यांकनआणि निकाल जाहिर करण्‍यासाठी, संशोधन कर्मचारी व वैज्ञनिक  कामकाज सूरू ठेवू शकतील.
10)  केश कर्तनालय, स्‍पा, सलून, ब्‍युटी पार्लर हे राज्‍य शासनाचे आदेश दिनांक २३ जुन २०२० व या कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश दिनांक २९/०६/२०२० मध्‍ये दिलेल्‍या अटी व शर्तींनूसार  सूरू ठेवता येतील.
11)   दिनांक 5 ऑगस्ट 2020 पासून गोल्फ कोर्स, आउटडोअर फायरिंग रेंज, जिम्नॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन आणि मल्लखांब यासारख्या खेळांना योग्‍य शारीरिक अंतर आणि स्वच्छताविषयक उपायांसह परवानगी दिली जाईल. जलतरण तलाव चालवण्यास परवानगी दिली जाणार नाही.
12)  सर्व सार्वजनिक आणि वैयक्तिक वाहतुकीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे: 
दुचाकी वाहने
१ +१ हेलमेट व मास्‍क सह
तीनचाकी वाहन
फक्‍त अत्‍यावश्‍यक १ + २.
चारचाकी वाहन
फक्‍त अत्‍यावश्‍यक १ + 3.
प्रवासादरम्‍यान मास्‍क वापरणे बंधनकारक राहील.
13)   काही विशिष्‍ट / सामान्‍य आदेशाद्वारे परवानगी दिलेल्‍याबाबी.
*******