Wednesday 8 July 2020

जिल्ह्यात 28 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 16 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



            जालना, दि. 8 (जिमाका) :-  जालना शहरातील मामा चौक -1, कन्हैयानगर -1, एम.आय.डी.सी.-1, दु:खी नगर-1, काद्राबाद-1, विनकर मोहल्ला-7, कसबा जुना जालना-2, गुरु गोविंदसिंग नगर -2,   अशा एकूण 16 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर शेरेसावर नगर-1, जांगडा नगर-2, मस्तगड-1 मानदेऊळगांव-1, कॉलेज रोड जालना-3, जे.ई.एस.कॉलेज-1, मिशन हॉस्पीटल कॉर्टर -1,नळगल्ली -2, पाणीवेस जालना -1, बुंदेल चौकाजवळ जे.ई.एस. कॉलेज-1, मंगळबाजार-1, फुलबाजार-1, प्रयाग नगर-1, लक्कडकोट -2, आण्णासाठेनगर -1, संभाजीनगर -1, सुखशांती नगर -1, लोधी मोहल्ला -1, आत्वाराम मोहल्ला -1, छत्रपती कॉलनी -1, आंबेडकर नगर-1, मोदीखाना-1 सिनगाव ता. देऊळगावराजा- 1  अशा एकूण  28 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह  प्राप्त झाला  सल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण4875 असुन  सध्या रुग्णालयात-252 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1891, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–122 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-6373 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–28 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-828 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-5448,रिजेक्टेड नमुने-15, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-413 एकुण प्रलंबित नमुने-82,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1587.
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–21, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती1419, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-49, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-565,  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-27, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-252, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -26, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-16,कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-504, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-261 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-29, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-15819 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 34 एवढी आहे. 

            जालना शहरातील शेरेसावर नगर परिसरातील 52 वर्षीय महिला रुग्णास श्वसनाचा, न्युमोनिया, मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे दि.5 जुलै,  2020 रोजी ‍जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांचा दि. 7 जुलै 2020 रोजी मृत्यु झाला. तसेच त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट दि.7 जुलै  2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. जालना शहरातील शंकर नगर, तट्टुपुरा परिसरातील 40 वर्षीय महिला रुग्णास श्वसनाचा, न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे दि.6 जुलै  2020 रोजी ‍जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांचा दि.7 जुलै  2020 रोजी मृत्यु झाला. त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट दि. 8 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला.
            जालना शहरातील प्रयागनगर परिसरातील 58 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा, न्युमोनियाचा व उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे दि.6 जुलै 2020 रोजी ‍जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांचा दि.7 जुलै 2020 रोजी मृत्यु झाला .त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट दि.8 जुलै  2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला.  तसेच जालना शहरातील लोधी मोहल्ला परिसरातील  45 वर्षीय महिला रुग्णास मधुमेह,श्वसनाचा व उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे दि.6 जुलै 2020 रोजी ‍जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांचा दि.6 जुलै  2020 रोजी मृत्यु झाला. त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट दि.8 जुलै  2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
        आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 565 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-02, शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना- 25, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-65, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-16, जे ई एस मुलांचे वसतिगृह- 57, जे ई एस मुलींचे वसतिगृह-45, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-66, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-68, केजीबीव्ही परतुर- 16, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड -09,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-38, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-03, ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, घनसावंगी -06,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-34, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-12, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन-38, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -40, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -17,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-08
        लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 180 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 912 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 851 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे                   मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99 हजार 600, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली  5 लाख 44 हजार 830 असा  एकुण 6 लाख 71 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment