Thursday 30 July 2020

सामाजिक अंतर न राखणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाची कारवाई 385 व्यक्तींकडून 75 हजार 700 रुपयांचा दंड वसुल



                                                                           
      जालना,दि. 30 (जिमाका):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यामध्ये सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस तसेच जिल्हा प्रशासनामार्फत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दि.30 जुलै, 2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 375 व्यक्तींकडून 75 हजार 700 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
     यामध्ये जालना तालुक्यात 113 व्यक्तींकडून 24 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे तर बदनापुर 33 व्यक्तींकडून 3 हजार 700, भोकरदन 125 व्यक्तींकडून 25 हजार रुपये, जाफ्राबाद 22 व्यक्तींकडून 3 हजार 800, अंबड 25 व्यक्तींकडून 7 हजार, घनसावंगी 5 व्यक्तींकडून 1 हजार, परतुर 46 व्यक्तींकडून 8 हजार 400 रुपये तर मंठ्यामध्ये 16 व्यक्तींकडून 2 हजार 400 अशा प्रकारे एकुण 385 व्यक्तींकडून 75  हजार 700 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
      नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये,  सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
*******

No comments:

Post a Comment