Monday 6 July 2020

वाहन लिलावासाठी इच्छुकांनी सिलबंद निविदा पाठविण्याचे आवाहन



                जालना, दि, 6 :- (जिमाका) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथील वाहन जीप महिंद्रा मार्शल क्रमांक एम एच 12 पीए- 4292 असून 1998 मध्ये हे वाहन खरेदी केले आहे.  या वाहनाचा कालावधी पूर्ण झाला असल्यामुळे हे वाहन निर्लेखित करण्यात येणार असून वाहन लिलावासाठी इच्छुकांनी सिलबंद निविदा 15 जुलै, 2020 पर्यंत  पाठविण्याचे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
            उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी लिलाव पध्दतीने हे वाहन विक्री करण्यासाठी खुल्या बाजार भावाप्रमाणे किमंत 70 हजार रुपये ठरवून दिली असून इच्छुकांनी सिलबंद निविदा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे पोष्टाने किंवा स्वहस्ते दि. 15 जुलै 2020 पर्यंत सादर करावेत. निवेदनासोबत एक हजार रुपयाचा डिमांड ड्राप्ट, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जालना यांच्या नावे देण्यात यावा. ज्यांची निविदा स्वीकारली जाईल त्यांना निविदेची किमंत एक हजार रुपये परत केली जाणार नाहीत. निविदा स्वीकारणे किंवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी राखून ठेवले असल्याचेही त्यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment