Friday 24 July 2020

खडकपुर्णा प्रकल्पातुन 3 हजार 808 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा



            जालना दि. 24 – (जिमाका):- खडकपुर्णा प्रकल्पातुन 24 जुलै रोजी सकाळी 9-00 वाजता एकुण 5 वक्रद्वारे 20 से.मी. उघडून नदीपात्रात 3 हजार 808 क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आला असुन पाण्याची आवक पाहुन विसर्ग वाढविणे अथवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती खडकपुर्णा प्रकल्प पुर नियंत्रण कक्षामार्फत देण्यात आली असल्याने नदीकाठच्या परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहुन चालमालमत्ता, चीजवस्तु, वाहने, जनावरे, पाळीवप्राणी, शेतीऔजारे तसेच इतर साधनसामग्री सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत जनजागृती करुन पुरापासुन सावध राहण्याचा इशारा देण्याच्या सुचना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी उप विभागीय अधिकारी, परतुर तसेच तहसिलदार मंठा यांना एका पत्राद्वारे दिल्या आहेत.  तसेच धरणाच्या खालील नदी काठावरील नागरी भागामध्ये सुरक्षेच्यादृष्टीने नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पुर विसर्गाबाबत नागरिकांच्या जिवीत मालमत्तेची हानी टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
*******

No comments:

Post a Comment