Friday 3 July 2020

जिल्ह्यात 32 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 11 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



            जालना, दि. 3 (जिमाका) :-  जालना शहरातील नाथबाबा गल्ली 03, काद्राबाद 01, कडबी मोहल्ला 02,जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील 01, वाटूर फाटा ता. परतुर येथील 01, गोंदी ता. अंबड येथील 02, भोकरदन शहरातील नुतन कॉलनी येथील 01 असे एकुण 11  रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज तर जालना शहरातील मुर्तीवेस 05, अग्रेसन नगर 02, काद्राबाद 04, पाणीवेस 01, एस. टी. कॉलनी 01, गोपालपुरा 01, चंदनझिरा 01, सोळाचौकी नया बाजार 01, सुवर्णकार नगर 01, आर. पी. रोड 01, सुभद्रानगर 01,  कैलास मंगल कार्यालय भोकरदन 04, जाफ्राबाद शहर 01,शारदा नगर अंबड 02, तुळजा भवानी नगर भोकरदन 03, मसनापुर ता. भोकरदन 01, वालसा वडाळा              ता. भोकरदन 01, धावडा ता. भोकरदन 01 अशा एकूण 32 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. 
     जालना शहरातील सुवर्णकार नगर परिसरातील रहिवासी असलेल्या 85 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनिया आजारोबरोबरच किडनी  निकामी झाली होती व उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने दि.1 जुलै 2020रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यु दि.3 जुलै 2020 रोजी सकाळी 7.00 वाजता झाला.त्यांच्या स्वॅबचा अहवाल दि.3 जुलै 2020 रोजी प्रयोगशाळेकडुन पॉझिटिव्ह प्राप्त झाला.
            मोदीखाना परिसरातील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय महिला रुग्णास श्वसनाचा त्रास, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयावर सुज यांचा त्रास होत असल्याने त्यांना दि.27 जुन 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यांच्या स्वॅबचा अहवाल दि. 29 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. संबंधित रुग्णास दि.29 जुन 2020 रोजी जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयातील जिल्हा डे‍डिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर  या ठिकाणी हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यु दि.3 जुलै, 2020 रोजी झाला.
            जालना शहरातील जांगडा नगर परिसरातील रहिवासी असलेल्या 65 वर्षीय महिला रुग्णास श्वसनाचा, मधुमेह, उच्च रक्तदाब व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे दि.27 जुन,2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यांच्या स्वॅबचा अहवाल दि. 29 जुन, 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यु दि.2 जुलै, 2020 रोजी  झाल्याची  माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण4437 असुन  सध्या रुग्णालयात-200व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1698, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या121 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -5635 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने32 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-652 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4829,रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-413 एकुण प्रलंबित नमुने-150, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1476.
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती29, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 1347, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-111, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-391, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-34, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-200,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-30, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-11, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-379, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-225 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-26, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-14517 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 22 एवढी आहे. 
          आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 391 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे 
          पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -04,शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-13, संत रामदास वसतिगृह जालना-36,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-16,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-46, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-38, मॉडेल स्कूल परतुर-55,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय परतुर-11,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मंठा-03, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-01, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-47,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी -15,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-02, मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-24, मुलांचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह मारत क्र.2 भोकरदन-17,जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद -22, आय. टी.आय. कॉलेज, जाफ्राबाद-22, जे. बी.के. विद्यालय टेंभुर्णी -16.
        लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असून  904  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 829 वाहने जप्त, आय.पी.सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 81 हजार 300, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली  4 लाख 94 हजार 630 असा  एकुण 6 लाख 2 हजार 738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
*******


No comments:

Post a Comment