Tuesday 28 July 2020

बांधकाम कामगारांनी अनोळखी व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचे आपले कागदपत्रे देवून आपली फसवणूक करु नये


            जालना दि.28 (जिमाका) :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, जालना जिल्ह्यातंर्गत नोंदित बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत अर्थसहाय्य केले जाते. लॉकडाऊनच्या काळात मंडळाच्या मुख्य कार्यालय, मुंबई यांच्या मार्फत  कोव्हीड-19 च्या अनुषंगाने लॉकलाऊनच्या कालावधीत सक्रिय जिवीत बांधकाम कामगारांना 2 हजार रुपये अर्थसहायाने वाटप होत आहे.
     मुंबई मंडळाच्या निर्देशानुसार संबंधित कार्यालयाने बांधकाम कामगारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी संभावत असल्याने कोरोना विषाणुच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध योजनेचे लाभ वाटप, सुरक्षा संच वाटप, नोंदणी, नुतनीकरण या सर्व कामकाजांना लॉकडाऊनच्या कालावधीत दि.22 मार्च पासुन ते आजपर्यत स्थगिती दिलेली आहे.
       जालना जिल्ह्यात मंडळास  निर्देश  आले की, लॉकडाऊनच्या काळात विविध प्रकारच्या नवीन योजना एजंट, कार्यकर्ते व इतर संघटनेचे कर्मचारी यांना परस्पर अस्तित्वात आणुन त्याबद्दलच्या अफवा पसरवून  बांधकाम कामगारांना फोनद्वारे, प्रत्यक्ष भेटीद्वारे कागदपत्रांची (आधार कार्ड, नोंदणी पावती, नुतनीकरण इ. कागदपत्र ) मागणी करुन लगेच खात्यात टाकू देतो असे आश्वासन देवून मनमानी पैशाची मागणी करत आहे.
        आपल्या माध्यमातून सर्व नोंदित व अनोंदित बांधकाम कामगाराना सुचित करण्यात येते की, लॉकडाऊनच्या कालावधीत 2 हजार रुपये अर्थसहाय्याशिवाय कोणत्याही प्रकारची नवीन योजना अस्तित्वात आलेली नाही, अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडून कसल्याही प्रकारचे कागदपत्रे संबंधित कार्यालयाखेरीज कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे देवू नये, असे सरकारी कामगार अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दी पत्राकाव्दारे कळविले आहे.
*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment