Monday 27 July 2020

जिल्ह्यात 93 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 40 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



            जालना दि.27 (जिमाका) :-  जालना शहरातील काद्राबाद- 14, मस्तगड-3, भाग्यनगर-1, पानीवेस -1, दर्गावेस-1, रुख्मिणी गार्डन-1, बदनापुर -1, पुंडलीक नगर-1, व्यंकटेश नगर-1, कसबा-1, मंगळबाजार-1, संभाजीनगर -3,  कचेरी रोड-1, आशिर्वाद नगर-4, मोदीखाना-2,  जालना शहर-2, धावडा -1, आन्वा-1 अशा एकुण 40 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील प्रशांत नगर-3, भीमनगर-3, विठ्ठल मंदीर कसबा-3, मिशन हॉस्पिटल जवळील-3,मराठा बिल्डिंग-2, रामनगर-2, चरवाईपुरा-2,गुरुकृपा कॉलनी-1, यशवंत नगर -1, समर्थनगर-1, विद्यानगर, मंठा रोड-1, चंदनझिरा-1, आझाद मैदान, म्हाडा कॉलनी-1, गीतांजली कॉलनी-1, शास्त्री मोहल्ला-1, लक्कडकोट-1, गणपती गल्ली-1, हनुमान घाट-1, सिव्हिल हॉस्टिपल-1, आनंदवाडी, राममंदिर-1, जालना शहर-34, बुटखेटा ता. भोकरदन-6, केदारखेडा ता. भोकरदन-4, कॉटन मार्केट, मेहकर-3, खामगाव-2, हिस्वन खुर्द ता. जालना-1 , साष्ट पिंपळगाव-1, शहागड-1, देवमुर्ती-1, गारखेडा औरंगाबाद-1, पळसखेड-1, ता. सिंदखेडराजा-1 अशा एकुण 87 रुग्णांचा स्वॅबचा व अँटीजेन तपासणीद्वारे 06 अशा एकुण 93 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   
        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-6942 असुन  सध्या रुग्णालयात-459 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2682, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-236 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-11652 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने -50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने93 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1950 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-9411,रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-437 एकुण प्रलंबित नमुने-202, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 2252
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-30, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती2104, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-93, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-674 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-31, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-459,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-202, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 40, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1262, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-584 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-41, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-21568 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-63 एवढी आहे.
            जालना शहरातील पाणीवेस परिसरातील रहिवाशी असलेल्या 75 वर्षीय महिला रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 17 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना          दि. 27 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 26 जुलै2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला.
अंबड  शहरातील  रहिवाशी असलेल्या 69 वर्षीय महिला रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना   दि. 18 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 19 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 26 जुलै,2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला.
वाढेगाव ता. मंठा येथील रहिवाशी असलेल्या 58 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्याने त्यांना दि. 22 जुलै, 2020 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यांच्या लाळेचा नमुना दि. 25 जुलै, 2020 रोजी प्राप्त झाला.  त्यांच्यावर उपचार सुरु असताना दि. 27 जुलै, 2020 रोजी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 


        आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 674 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-6 , वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-22,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-37, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन, वसतिगृह-52,जे.. एस. मुलांचे वसतिगृह-20,जे. . एस. मुलींचे वसतिगृह-56, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-54, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-83, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-89, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-13,गुरु गणेश भुवन -13,मॉडेल स्कुल, परतुर-5, केजीबीव्ही, परतुर-2, मॉडेल स्कुल मंठा-22,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-45, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-69, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-26,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -2, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह,घनसावंगी-5,शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-8, शासकीय मुलांचे वसतिगृह, भोकरदन-00, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.2 भोकरदन-3,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-18, आय.टी.आय कॉलेज, जाफ्राबाद-8,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -7, पार्थ सैनिक स्कुल, जालना-9.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत-197 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1038 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 99600,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 3 हजार 530 असा एकुण 8 लाख 29 हजार 938 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
*******


No comments:

Post a Comment