Monday 13 July 2020

सन 2019-20 शैक्षणिक वर्षात अनु.जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज मंजुर करणेसाठी अंतीम मुदतवाढ बाबत




        जालना दि. 13 (जिमाका) :- सर्व महाविद्यालय प्राचार्य, महाविद्यालये, विद्यार्थ्यांना, संस्थाप्रमुखांना आवाहन करण्यात येते की, सन 2019-20 शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन नोंदविलेल्या अर्जापैकी परिपुर्ण स्वरुपात पात्र अर्ज मंजुर करुन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांचे लॉगिनवर पाठविण्यासाठी दिनांक 17 जुलै 2020 ही अंतीम तारिख असल्याचे ऑलाईन प्रणालीवर कळविले आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती योजनेचा पहिला Instolment चे Redeem Option क्लिक करुन सुध्दा त्यांचे खातेवर रक्कम जमा झालेली नाही अशा विद्यार्थ्यांशी संपर्क करुन आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक (NPCI Maping) असल्याची खात्री करण्याबाबत सुचना देण्यात यावी. आधार बँक खात्याशी लिंक केल्यानंतर http://resident.udai.gov.in/bank-mapper या साईटवरुन त्याची पडताळणी करावी त्याबाबतचा पुरावा संबधित विद्यार्थ्यांच्या लॉगिनमधुन Grivence पर्यायामध्ये माहिती भरुन सदरील पुरावा अपलोड करावा. सदरील पहिल्या Instolment शिष्यवृत्ती विद्यार्थी महाविद्यालयांस जमा होणार नाही त्याशिवाय दुसऱ्या अर्ज मंजुर झालेले आहेत, त्यांचा दुसरा Instolment चे Redeem प्राप्त होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचे द्वितीय Instolment  ची उपस्थिती नोंदविणे बाकी होती त्यासाठी सुध्दा पोर्टल सुरु झाले आहे, त्यामुळे तात्काळ उपस्थिती नोंदवुन महाविद्यालयाचे दोन्ही लॉगिनमधुन अर्ज मंजुर करण्यात यावा. त्याशिवाय सदरील रक्कम विद्यार्थी/महाविद्यालयास मिळणार नाही, याची गांभिर्याने नोंद घ्यावी.
वरीलप्रमाणे महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर तात्काळ कार्यवाही करुन अर्ज या कार्यालयाच्या लॉगिनवर पाठविण्यात यावेत, याबाबत जाहीर आवाहन   शिवाजी शेळके , सहायक आयुक्त, समाज कल्याण जालना यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment