Tuesday 28 July 2020

क्रीडा पुरस्कारासाठी खेळाडूंनी अर्ज करण्याचे आवाहन अंतिम दि. 10 ऑगस्ट 2020




    जालना, दि, 28 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जालनाद्वारे दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील खेळाडू क्रीडा मार्गदर्शक संघटक,कार्यकर्ता यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचे तसेच योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव होण्यासाठी व त्यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी इच्छुक क्रीडा खेळांडूनी जिल्हा क्रीडा कार्यालय येथे दि.30 जुलै 2020 ते 10 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज सादर करावेत. दि.26 जानेवारी 2021 प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री यांच्या हस्ते शासकीय कार्यक्रमामध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.  त्यानुसार जिल्हा क्रीडा पुरस्कार गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा संघटक, कार्यकर्ता या प्रकारातील खेळाडूंना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी अटी पुढीलप्रमाणे आहेत.
             गुणवंत खेळाडू 1 पुरुष ,1 महिला व 1 दिव्यांग खेळाडू  -खेळाडूने पुरस्कार लगतपूर्व पाच वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यता प्राप्त खेळांच्या  अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व केलेले असले पाहीजे.
          गुणवंत क्रिडा मार्गदर्शक म्हणून सतत 10 वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व  त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकणाकरिता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल व त्या खेळाडूंची विविध नमुन्यातील हमीपत्र सादर करावयाचे आहे.
         गुणवंत क्रीडा  कार्यकर्ता, संघटक- क्रीडा  कार्यकर्ता याने सतत 10 वर्षे महाराष्ट्रात क्रीडा  विकासासाठी भरीव योगदान दिलेले असावे. त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकणाकरीता त्याच जिल्ह्यातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल.
       पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदारांचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विविध नमुन्यातील अर्ज  गुणवंत खेडाळूंनी  जिल्हा क्रीडा  कार्यालयातुन 30 जुलै 2020 ते 10 ऑगस्ट 2020 पर्यंत प्राप्त करुन घ्यावे. 11 ते 21 ऑगस्ट 2020 या कालावधीत परिपूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रासह सत्यप्रत केलेली, 3 पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे बंद लिफाप्यात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विविध मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.  अशी माहिती एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे  प्रमोदिनी अमृतवाड जिल्हा क्रीडा अधिकारी जालना  यांनी कळविली आहे.
                                                           *******

No comments:

Post a Comment