Wednesday 22 July 2020

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचे आवाहन



      जालना, दि. 22 (जिमाका) :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपले आधार प्रमाणिकरण केलेले नाही, त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
          ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करताना ऑनलाईन तक्रारी नोंदविलेल्या आहेत, अशा तक्रारी संबंधाने बॅक शाखा स्तरावर शेतकऱ्यांकडुन आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन घेण्याचे काम सुरु असुन तक्रारींचा तातडीने निपटरा करण्याच्यादृष्टीने ज्या शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत ऑनलाईन तक्रार नोंदविल्या आहेत.त्यांनी कर्जासंबंधीचे आवश्यक ती कागदपत्रे जसे तक्रार नोंदविल्याची स्लीप ,आधार कार्ड, बँक पासबुक, सभासद मयत असल्यास मृत्युचे प्रमाणपत्र व इतर पुरावे घेऊन संबंधीत तालुक्याच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष दयावे. जेणेकरुन कर्जमाफीचा लाभ तात्काळ संबंधितास मिळेल, असेही जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
*-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment