Monday 31 August 2020

माई आवास योजनेंतर्गत प्रत्येक पात्र व गरजु लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ द्या योजनेचा लाभ देण्यात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार घरकुलाची प्रलंबित असलेली कामे जलदगतीने पुर्ण करा - पालकमंत्री राजेश टोपे

 

            




            जालना, दि. 31:- रमाई आवास योजनेंतर्गत प्रत्येक पात्र व गरजु लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ देण्यात यावा. या बाबतीत अधिकाऱ्यांची कुठलीही सबब ऐकुन घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देत मागील वर्षातील प्रलंबित असलेली कामे जलदगतीने पुर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

            रमाई आवास योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.

            यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, श्रीमती नंदनवन यांच्यासह सर्व तालुक्याचे गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

            पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, रमाई घरकुल योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यास दरवर्षी घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात येते. परंतु मागील दोन ते तीन वर्षातील उद्दिष्ट १०० टक्के पुर्ण झाले नसल्याने नाराजी व्यक्त करत जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण झालेच पाहिजे. घरकुलाची करण्यात येणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापुर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

            सन 2016-17, 2018-19 या वर्षामध्ये प्रलंबित असलेल्या घरकुलाची कामे जलदगतीने पुर्ण करण्यात यावीत. या घरकुलाच्या उभारणीसाठी निधीची कमतरता भासत असल्यास आपण व्यक्तीश: मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत या योजनेसंदर्भात दर आठवड्याला आढावा घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

            समाजातील गोरगरीब व्यक्तींच्या कल्याणासाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येतात.  परंतु त्या योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे.  कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाची वागणुक द्या.  केवळ शासकीय कामकाज म्हणुन काम न करता समाजाप्रती आपलेही काही देणे लागते या भावनेतुन प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने काम करण्याची गरज असुन या योजनेपासुन एकही पात्र व गरजु लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केल्या.

            जायकवाडी धरण 90 टक्के भरले असुन या धरणात अधिकच्या पाण्याची आवक झाल्यास धरणातुन केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते.  त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात यावा.  आपत्तीच्या अनुषंगाने उपलब्ध साहित्याची तपासणी करुन घेण्याबरोबरच पुर परस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी निवारा, पाणी, भोजन या सर्व सोई-सुविधांचे नियोजन आत्ताच करुन ठेवण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.  *******

जिल्ह्यात 67 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 113 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 

      जालना दि. 31 (जिमाका) :- जालना शहरातील प्रशांतीनगर -2,ढवळेश्वर -2, एस.आर.पी.एफ. -1, समर्थ नगर -5, चौधरी नगर -1, इंदिरा नगर -1, संजय नगर -1,करवा नगर -5, संभाजी नगर-6, बजरंग दालमील -1, जांगडा नगर -2, वैभव कॉलनी -2, कन्हैया नगर-2, बालाजी पार्क -1, भाग्यनगर -1, जालना शहर -2, अग्रसेन नगर -7, गुरु गोविंदसिंग नगर -1, योगेश नगर -1, गणेश नगर -1,भायली -1, लोधा कॉलनी परतुर -3, देवी दहेगांव -1, हुसेन नगर बदनापुर -1, देऊळगाव मही -2, भोकरदन  -1, आष्टी -1, देवमुर्ती -2,गणेशपुर-1, पिंपळगांव-1, कोठी -1, शनिवार पेठ देऊळगाव राजा-1, चंदनझिरा-3, हस्त पोखरी -1, सिंदखेडराजा-1,परतुर -2, गाढेगव्हाण -1, किनगांवराजा -1, सरस्वती कॉलनी परतुर-1, आळंद -1,मेरा -2, असोला जहागीर -1, निधोना-1,सिव्हील कॉलनी -1, चिखली -1, रामसगांव -1,रामवाडी जि. औरंगाबाद -1, शेवली -1,गुंडेवाडी -1, धानोरा -2, रामेश्वर गल्ली परतुर -4, भोई गल्ली -1, लखमापुरी -1, जामखेड -1, शहागड -1, सुखापुरी -1, महाकाळा -20 अशा एकूण 113 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला तर जालना शहरातील यशवंत नगर-2,अंकुशनगर -1, मोदीखाना -1, इंदिरा नगर -1, मंठा चौफुली -3, सराफा नगर-6, संभाजी नगर -1, मंठा -5, उमरखेड ता. मंठा -2, बोरखेडी चिंचोली -3, देऊळगाव उगले -2, घनसावंगी -12,किर्ला -1, पोलीस स्टेशन रोड मंठा -1, बोराडे गल्ली मंठा-1,आंबेडकर चौक मंठा-1, पोलीस स्टेशन मंठा-5, ब्राम्हण गल्ली मंठा -1, बदनापुर -1, गोलापांगरी -1, बालाजी मंदीर, सिंदखेडराजा -1, पिंपळगावाडी-1, चंदनझिरा -1, अंतरवाली सराटी -3,अंबड-1, सहकार नगर लोणार -1  अशा प्रकारे RT-PCR तपासणीव्‍दारे 59 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 8 व्यक्तींचा अशा एकुण 67 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-10444 असुन  सध्या रुग्णालयात-206 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3816, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-135, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या- 33971 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-67 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-4712 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-28878, रिजेक्टेड नमुने-47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-281, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3195

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-22,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3432 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती - 73 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-342, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-31, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-206, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-79, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 113 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3409, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -1164 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-51958 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-139 एवढी आहे.

 

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात निलम नगर, जालना येथील  59 वर्षीय कोरोना बाधित पुरुष रुग्णाचा  मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

  आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 342 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-25, जे.. एस. मुलींचे वसतिगृह-13, वन प्रशिक्षण केंद्र वस्‍तीगृह-7,  राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक -12, ,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-15,  मॉडेल स्कूल परतुर-11, के.जी.बी.व्ही.परतुर-19, के.जी.बी.व्ही. मंठा-29, मॉडेल स्कूल मंठा-12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, अंबड-21, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-17, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-31, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-46, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -15, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-24, शासकीय मुलांचे वसतिगृह, भोकरदन -10, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-5, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -12, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफराबाद-18

 

 जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या  26 नागरीकांकडुन  5 हजार 300 तर आजपर्यंत जिल्‍ह्यातील आठही तालुक्‍यात मास्‍क न वापरणे , सोशल डिस्‍टंसिंगच्‍या नियमाचे पालन न करणा-या एकुण  4 हजार 451 नागरीकांकडुन 9 लाख 43 हजार  810  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

 

                                                               -*-*-*-*-*-*-

 

Saturday 29 August 2020

जिल्ह्यात 98 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 87 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

  

      जालना दि. 29 (जिमाका) :- जालना शहरातील इंदिरा नगर -1, गुरु गोविंदसिंग नगर -1, भिमनगर -1, योगेशनगर-2, शांकुतलनगर -1, लक्ष्मीनगर -1, नुतन वसाहत -1, प्रितीसुधानगर -2 , फुलंब्रीकर नाट्यगृह -1, भवानीनगर -1, संभाजीनगर -1, सोनलनगर -1, सकलेचा नगर -1, मिशन हॉस्पीटल परिसर -1, उतार गल्ली -1, श्रीकृष्ण रुख्मिणीनगर -1, पांगारकर नगर -1, श्री कॉलनी नगर -1, दानाबाजार -5, झाशीची राणी पुतळा परिसर -2, नयाबाजार -1, नाथबाबा गल्ली -1, नेहरु रोड -8, बडी सडक -1, कालीकुर्ती -4, राज बिल्डिंग -1, एस.आर.पी.एफ. गेट -1, रहेमानगंज -1, रुख्मिणीनगर -1, शनी मंदिर -1, जुना जालना -1, काद्राबाद -1, आझाद मैदान -1, अंबड -2, घनसावंगी -1, डोंगरगाव -2, अकोला ता. बदनापुर -1, पांगरी गोसावी -1, वरखेड -1, मंठा -4, रामनगर साखर कारखाना -2, चिखली -1, बावणे पांगरी -6, देवठाणा -1, जयभवानी गल्ली परतुर -2, चिंचोली -3, सिंदखेडराजा -1, दाभाडी -1, पाचोड -1, चंदनझिरा -1, देऊळगाव मही -1, खासगाव -1, सेलु जि. परभणी -1, बदनापुर -1, वखारी -2 अशा एकुण 87 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर जालना शहरातील शनिमंदिर -1, अग्रसेन नगर -1, मोदीखाना -3, कृष्णकुंज -1, ढवळेश्वर -1, कन्हैयानगर -1, सकलेचा नगर -1, तुळजाभवानी नगर -1, शांकुतल नगर -1, हलदोला ता. बदनापुर -1, भोरखेडा गायके जाफ्राबाद -1, घनसावंगी -2, दैठणा -2, वाघाळा सिंदखेडराजा -2, अंतरवाली -1, सिरसगाव -1, नेर -1, गोंदी -1, गोलापांगरी -1, हिस्वन -2, कु-हाडी -1, देऊळगाव राजा -3, सिद्धेश्र्वर पिंपळगाव -1, लोणगाव -1, भारज -1, बठाण -3, देऊळगाव उगले -1, तपोवन -1, टेंभुर्णी -2, बोरखेडी -1, सेलगाव -1, केळीगव्हाण -1, आष्टी -3, हातडी -4, कराळा ता. परतुर -7, हिवर्डी -1, निळखेडा -3, बोरगाव -1, एकुण 62 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 36 अशा एकुण 98 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 10187 असुन  सध्या रुग्णालयात -205 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3747, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या -288,एवढी तरकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-32942 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 98(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -4529 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-27959, रिजेक्टेड नमुने -47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 354, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3172

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -30, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3367 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -116 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-281,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-26, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -205,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 42,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-87 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3246, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या - 1147 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-51492 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 136 एवढी आहे.

 

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन  सहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात सुखापुरी ता. अंबड येथील 65  वर्षीय पुरुष, बदनापुर शहरातील 75 वर्षीय महिला, टाकळी बाजार ता. भोकरदन येथील 45 वर्षीय पुरूष, डिग्रस ता. देऊळगावराजा येथील 65 वर्षीय पुरुष, फुल बाजार जालना शहर येथील 74 वर्षीय महिला  व जालना शहरातील 58  वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

 

 

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 281 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 15, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -20,  वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -18,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर बी ब्लॉक -16,  मॉडेल स्कुल परतुर - 18,केजीबीव्ही परतुर - 16, केजीबीव्ही मंठा -29, मॉडेल स्कुल मंठा -06,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-18, शासकीय मुलींचे वसतिगृह  अंबड -14,अंकुश नगर साखर कारखाना -20,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -36, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -22, अल्पसंख्याक मुलींचे  वसतीगृह घनसावंगी -13, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -8,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -12,

 

   जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 44 नागरीकांकडून 8 हजार 600 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 401 नागरिकांकडुन 9 लाख  34 हजार 360 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                               -*-*-*-*-

 

Friday 28 August 2020

जिल्ह्यात 61 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 81 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 

      जालना दि. 28 (जिमाका) :- जालना शहरातील सरस्वती कॉलनी -1, आदर्श कॉलनी -4, जयभवानी गल्ली-1, भाग्यनगर -3, गणपती गल्ली -1, अंबर हॉटेल परिसर -1, जालना शहर -9, गवळी मोहल्ला -1,तट्टुपुरा -1, महावीर चौक-1, मिलनत नगर -1, समर्थ नगर -2, रंगारी गल्ली -2, विद्युत नगर -1, नागेवाडी -1, निळकंठ नगर -1, कसबा -1, आनंदवाडी -1,  साईनगर -1, सहकार बँक कॉलनी -1, कुचरवटा -1, कचेरी रोड -1, संभाजीनगर -7, मिशन हॉस्पिटल  परिसर -2, सतकर नगर -1, सामान्य रुग्णालय परिसरातील 4, सोनल नगर -1, आनंदनगर -1, सेवली -3,परतुर -2, चिंचोली -1, उस्वद ता. मंठा -4, बदनापुर -2, देवगाव तांडा -1, जाफ्राबाद -1, नांदेड -1, घनसावंगी -1, वडाळी जि. बुलढाणा -1, ढोकमाळ तांडा -1, विद्यानगर सेलु -1, शिवाजी गल्ली -1, पिंपळखुटा -1, देऊळगाव मही -1, शंकरनगर लोणार -1, सिव्हिल कॉलनी देऊळगाव राजा -1, देवळा -1, दैठणा -1, खडका ता. घनसावंगी -1, दुधना काळेगाव -1  अशा एकुण 81 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर जालना शहरातील भाग्यनगर -1, गणेशनगर -1,नुतन वसाहत -1, श्रीकृष्ण रुख्मिणी नगर -3, युसुफ कॉलनी -1, विद्युत नगर -1,अंबड रोड -1, बदनापुर -1,ढाकेफळ -1, घनसावंगी -2, लिंबोणी -2,नेर -1,हिसवपुरा -2, हिवरा रोषणगाव -1, भाटेपुरी -3, बाजी उम्रद तांडा -1,पाथ्रुड तांडा 1, काजळा -1, उंबरखेडा ता. मंठा -1, टेंभुर्णी -1, तडेगाव -1, कुंभारी -1,जानेफळ -1, रामसगाव -1, पानेवाडी -1, शंकर नगर लोणार -1, बेथमल -1, बाबुलतारा -1, माळी गल्ली बदनापुर -1,पाडळी -1  एकुण 37 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 24 अशा एकुण 61 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 10020 असुन  सध्या रुग्णालयात -205 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3721, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या -237,एवढी तरकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-33271 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 61(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -4431 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-27485, रिजेक्टेड नमुने -47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 255, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3146

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -37, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3337 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -56 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-281,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-19, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -205,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 45,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-81 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3159, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या - 1142 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-50104 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 130 एवढी आहे.

 

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 281 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 15, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -20,  वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -18,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर बी ब्लॉक -16,  मॉडेल स्कुल परतुर - 18,केजीबीव्ही परतुर - 16, केजीबीव्ही मंठा -29, मॉडेल स्कुल मंठा -06,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-18, शासकीय मुलींचे वसतिगृह  अंबड -14,अंकुश नगर साखर कारखाना -20,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -36, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -22, अल्पसंख्याक मुलींचे  वसतीगृह घनसावंगी -13, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -8,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -12,

 

   जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 29 नागरीकांकडून 5 हजार 500 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 357 नागरिकांकडुन 9 लाख  25 हजार 760 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                               -*-*-*-*-