Thursday 27 August 2020

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीसाठी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणिकरण करावे

 


 

   जालना दि.27 (जिमाका) :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -2019 अंतर्गत  जिल्हयातील प्रसिध्द झालेल्या पात्र लाभार्थ्यांपैकी 6797 शेतक-यांनी अद्याप पर्यंत आपले आधार प्रमाणिकरण केलेले नाही.  जिल्हयातील आधार प्रमाणिकरण मोठया प्रमाणात शिल्लक असलेल्या बँकांची नावे व शेतकरी संख्या खालीलप्रमाणे आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 2630 लाभार्थी , एस. बी. आय. 1185 लाभार्थी ,महाराष्ट्र ग्रामीण बँक 733 लाभार्थी, बँक ऑफ महाराष्ट्र 726 लाभार्थी,युनियन बँक ऑफ इंडिया 523 लाभार्थी ,सिंडीकेट बँक 197 लाभार्थी, बँक ऑफ बडोदा 155 लाभार्थी, कॅनरा बँक 138 लाभार्थी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया1 24 लाभार्थी ,बँक ऑफ इंडिया 101 लाभार्थी, या  बँकेच्या खातेदारांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करून घ्यावे.  

    कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यास सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्यांची राहील. मयत लाभार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या वारसांनी आधार प्रमाणिकरण करु नये. ज्या शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करताना ऑनलाईन तक्रारी नोंदविलेल्या आहेत. अशा तक्रारीच्या अनुषंगाने बँक शाखा स्तरावर शेतक-यांकडून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन घेण्याचे कामकाज सुरु आहे.   या  तक्रारी त्वरीत निकाली काढण्याचे दृष्टीने ज्या शेतक-यांनी योजनेअंतर्गत ऑनलाईन तक्रार नोंदविल्या आहेत. त्यांनी त्यांचे कर्जासंबंधीचे आवश्यक कागदपत्रे जसे तक्रार नोंदविल्याची स्लीप,आधार कार्ड, बँक पासबुक, सभासद मयत असल्यास मृत्युचे प्रमाणपत्र व इतर पुरावे घेऊन संबंधीत बँक शाखेस प्रत्यक्ष दयावे त्यामुळे कर्जमाफीचा लाभ तात्काळ संबंधीतास मिळेल असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन  करण्यात येत आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment