Thursday 13 August 2020

आंतराष्टीय युवा दिनाचे औचित्य साधून 15 डिसेंबरपर्यंत विविध उपक्रमाचे आयोजन

 


 

            जालना,दि,13:- (जि.मा.का.) 12 ऑगस्ट हा आंतराष्ट्रीय युवादिन म्हणून साजरा केला जातो युवा वर्ग हा एचआयव्ही/एडस संदर्भात अधिक संवेदनशिल असून या निमित्ताने युवकांमध्ये जनजागृती निर्माण होण्याच्या दृष्टिने युवा दिनाचे औचितय साधून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्राण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक (डापकु) सामान्य रुग्णालय जालना यांच्याकडून जिल्हयात दि. 12 ते 26 ऑगस्ट 2020  या कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्स यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.स्पर्धेचे दिनांक पुढीलप्रमाणे आहेत.

                    दि. 28 ऑगस्ट 2020 रोजी सोशल मिडीयावर 1 मिनिटाचा प्रचारात्मक व्हिडीओ One Minute Promotional Video (Stigma fee HIV and Covid Talks)  रेडीओ चॅनलवरुन मुलाखत/ व्याख्यानाव्दारे एचआयव्ही/ एड्सची माहिती पोहचविणे व्याख्याने विषय : Stigma fee HIV and Covid  जीआयएफ/मीमस (HIF/MEMES) आणि बक्षीस वाटप,  वृत्तपत्रामध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त लेख (News lettr oniydCampaign) या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

                       यावर्षी युनायटेड संघटनेचे युवा दिनाविषयीचे youth Engagement for giobal Action असे घोषवाक्य असून अंतराष्ट्रीय युवादिन पाळतांना कोविड-19 च्या काळात महाराष्ट्र शासनाच्या कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालण होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये ऑनलाईन एज्युकेशनच्या सुविधा असल्यास त्यामार्फत ऑनलाईन व्याख्याने,ऑनलाईन स्पर्धा आयोजित करुन रेडीओवर मुलाखती आयोजित करुन युवा पिढीपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.     

                                                                          *******

 

No comments:

Post a Comment