Thursday 13 August 2020

15 ऑगस्ट रोजी तंबाखुजन्य पदार्थाची शपथ घेण्याच्या सूचना

 


    जालना दि,13:- (जि.मा.का.) :- संपुर्ण राज्य कोविड- 19 या साथरोगाने ग्रासले असून तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यानंतर थुंकल्यामुळे कोरोनाचा विषाणू थुंकीतुन पसरणे हे एक माध्यम आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्य तंबाखुमुक्त करण्याच्या उद्देशाने त्याचप्रमाणे कोव्हीड -19 या आजारावर काही प्रमाणात आळा घालण्यास व साथरोगाची जनजागृती करण्यासाठी राज्यस्तरावर तंबाखु मुक्तीसाठी तंबाखुमुक्त शपथ  दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी स्वातंत्र्य दिनानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणामध्ये पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणा-या ध्वजारोहन सोहळ्यांमध्ये कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितीतांना पालकमंत्री यांच्याद्वारे तंबाखुमुक्तीची शपथ देण्यात आयोजित करण्यात आले आहे.

            तंबाखुमुक्तीसाठी तंबाखु मुक्त  शपथ जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये घेण्याचे आवाहन संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांनी केले आहे.

शपथ

तंबाखु, जर्दा, खर्रा तसेच  बिडी, सिगारेट, ई-हुक्का, ई-सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणुन मी जन्मभर,या व्यसनांपासुन दुर राहण्याचा  संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर, आणि माझा पिरसर, तंबाखूमुक्त रहावा. तसेच इतरांनी तंबाखुजन्य पदार्थांचा परित्याग करावा. यासाठी मी प्रयत्न करेन .भारत सरकारचा,तंबाखु नियंत्रण कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी त्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखुजन्य तसेच ई- सिगारेटमुक्त करेन मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखु मुक्त करण्याचा प्रयत्न करेन.  

ग्रामसभेमध्ये बोलावयाचे मुद्दे

तंबाखुमुळे आरोग्यावर खुप दुष्परिणाम होतात. डोक्याच्या केसापासुन पायाच्या नखा पर्यंत तंबाखुचे दुष्परिणात दिसून येतात. तंबाखुमुळे  उच्चरक्तदाब, मधुमेह, कर्करोग व पक्षाघात यासारखे आजार होतात. गरोदरपणात तंबाखुचे सेवन केल्यामुळे बाळामध्ये कुपोषण, बाळाचे वजन कमी असणे ही लक्षणे दिसून येतात. तंबाखु खाणा-या व्यक्तींमध्ये अर्धांगवायुचे प्रमाण जास्त दिसून येते. उच्चरक्तदाब, मधुमेह, कर्करोग हे आजार जीवनशैलीशी निगडीत असल्यामुळे आपणास जीवनशैली सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. जसे की रोज 35 मिनिटे चालले पाहीजे. तेलकट, खारट पदार्थ उदा- लोणचे, पापड इ. यांचा आहारात कमी वापर करावा. समोसा, बटाटा वडा, गोड पदार्थ, शित पेय जसे कोकाकोला, पेप्सी इ. वारंवार चहा पिणे यावर नियंत्रण ठेवावे. आपले वजन नेहमी नियंत्रीत ठेवावे. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या व कडधान्य यांचा जेवणात जास्त वापर करावा. 30 वर्षावरील सर्व व्यक्तींनी त्याची स्वत:ची मधुमेह, उच्चरक्तदाब व कर्करोगासाठी दरवर्षी नियमित आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करुन घेतली पाहिजे. यामुळे आपण मधुमेह, उच्चरक्तदाब व कर्करोग यांना टाळु शकतो. आपण व्यसन मुक्त रहावे दारु, तंबाखु खाऊ नये. तंबाखुचे हे सर्व दुष्परिणाम पाहुन आज आपण सर्व गावकरी तंबाखु मुक्तीची शपथ घेऊया.

-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment