Tuesday 4 August 2020

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांर्तगत विद्यार्थ्यांस शिष्यवृत्ती


                                           
जालना दि. 4 (जिमाका) :- सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात 10 वी 12 वी, पदवी,पदयुत्तर,वैदकीय, व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीच्या विदयार्थी,विदयार्थीनी यांना सरासरी 60  किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण मिळवणाऱ्या जिल्ह्यातील प्रथम 3 ते विद्यार्थ्यास निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यावृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. अर्जा सोबत जोडावयाची कागदपत्रे :-जातीचा दाखला, मार्क मेमो ,पुढील वर्गात प्रवेश घेतल्या बाबतचा पुरावा , आधार कार्ड,पासपोर्ट साईज फोटो इत्यादी. इच्छुक मातंग, मांग समाजातील विद्यार्थी यांनी 9 ऑगस्ट  2020 पर्यंत खालील कागद पत्रासह अर्ज साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकासमहामंडळ (मर्या) डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजीक न्याय भवन जिल्हा कार्यालय जालना येथे सादर करण्याचे आवाहन विकास प्र.कुंटुकर जिल्हा व्यवस्थापक जालना यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment