Saturday 1 August 2020

जिल्ह्यात 82 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 52 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



            जालना दि. 1 (जिमाका) :- जालना शहरातील प्रयाग नगर-1, नाथबाबा गल्ली-1, गोपीकिशन नगर -1, बु-हाण नगर -1, नॅशनल नगर-4, जयभवानी नगर -1, आर.पी. रोड-3,  रामनगर पोलीस कॉलनी -3, कबाडी गल्ली -1, व्यंकटेश नगर -2, मस्तगड -1, चंदनझिरा -3, भीमनगर -2, लक्कडकोट -1, नळगल्ली -1, नयाबाजार -1, दर्गा वेस -2, कन्हैयानगर -6, सामान्य रुग्णालय परिसरातील -1, टाऊन हॉल -1, भाग्यनगर -1, मोदीखाना -1, बालाजी नगर -1,कचेरी रोड -1, प्रशांतीनगर -1, गुडला गल्ली -1, जालना शहर -2, कोष्टी गल्ली काद्राबाद -1, अंबड -1, वरुड बु. -1, बुटखेडा -4, अशा एकुण 52 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील मंठा चौफुली-4, फारशी गल्ली -1, नुतन वसाहत-2, हनुमान नगर-2, युसुफ कॉलनी -1, लक्ष्मीनारायणपुरा-1, भाग्यनगर -3, जमुना नगर -5, सोरटीनगर-1, सकलेचा नगर-3, वैभव कॉलनी -3, समर्थ बँकेजवळ-2, पावरलुम जुना जालना-3, काद्राबाद -1, एम.आर.डी.सी. -1, सामान्य रुग्णालय  निवासस्थान -1, महाकाळा ता. अंबड -11, रोहीलागड-1, शहागड -3, सुखापुरी -1, देऊळगाव राजा -1, उज्जैनपुरी ता. बदनापुर -1, निरखेडा-1, रांजणी-1, शनी मंदीर परतुर -1 अशा एकुण 54 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 28 अशा एकुण 82  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

          जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7495 असुन  सध्या रुग्णालयात-484 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2854, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-170 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-13447 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-82 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2269 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-10868, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-440 एकुण प्रलंबित नमुने-221, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2382.
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-56, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2349, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-496,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-60, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-484,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-102,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-52, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1506, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-691 (18 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-24233 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-72 एवढी आहे.
             अंबड शहरातील रहिवाशी असलेल्या 70 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना            दि. 27 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 31 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. यावलपिंप्री ता. घनसावंगी  रहिवाशी असलेल्या 70 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना             दि. 27 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांचा 1 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 
        आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 496 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-2, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-59,मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन,वसतिगृह-10,जे.. एस. मुलांचे वसतिगृह-8 जे. . एस. मुलींचे वसतिगृह-39, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-63, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-6, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-14, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-58, गुरु गणेश भवन-5, संत रामदास हॉस्टेल -10, मॉडेल स्कुल, परतुर-23, मॉडेल स्कुल, मंठा-2, केजीबीव्ही मंठा-15, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-51,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-62, शासकीय मुलांचे वसतीगृह,बदनापुर-5, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -5,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी-17, शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-5,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 -24, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-1,आय.टी.आय कॉलेज, जाफ्राबाद-8, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत  200 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1051 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. . पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 1 लाख 7 हजार,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 74 हजार 430 असा एकुण 9 लाख 8  हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
*******

No comments:

Post a Comment