Monday 3 August 2020

10 वी व 12वी नंतरच्या करिअर संधीबाबत मार्गदर्शन व समुपदेशन वेबिणार

   
   जालना दि. 3 (जिमाका) :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अंतर्गत 10 वी व 12 वी नंतरच्या करिअर संधीबाबत मोफत मार्गदर्शन व समुपदेशन वेबिणार दिनाक 5 ऑगस्ट  2020 रोजी दुपारी 12.30 वाजता नलाईन वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन व समुपदेशन सत्राचे google meet च्या meet.google.com/dgs-uuec-xxu  लिंकवर आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन समुपदेशन व करिअर मार्गदर्शन या मोफत सत्रामध्ये 10 वी व 12वी नंतरच्या करिअर संधी बाबत मार्गदर्शन व समुपदेशन वेबिणार मध्ये  डॉ अनिल जाधव, युवा व्यावसायिक, राष्ट्रीय करिअर सेवा, कामगार व रोजगार मंत्रालय, भारत सरकार हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थीनि, पालकांनी या संधीचा फायदा घ्यावा. वेबिणार बाबत काही अडचणी आल्यास श्री. फुले व्यवसाय व मार्गदर्शन विभाग यांच्याशी (( 02482) 225504 या नबर वर संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशलय विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment