Tuesday 18 August 2020

गणेशमुर्ती बनविणा-या,विकणा-या व गणेशोत्सवासाठी साहित्य विकणा-या विक्रेत्यांची दि. 19 व 20 ऑगस्ट रोजी अँटीजेन तपासणी

 

 

 जालना दि. 18  (जिमाका) :- जालना शहरामध्ये कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता सध्या संशयीत रुग्ण निदान लवकरात लवकर व्हावे  या करीता रॅपीड अँटीजेन तपासणी करणे अगत्याचे झाले आहे याचाच एक भाग म्हणुन शहरात असलेले गणेशमुर्ती बनविणारे, विकणारे तसेच गणेशोत्सवासाठी साहित्य विक्री करणारे सर्व संबंधीत व्यापारी यांचा नागरीकांशी जास्त संपर्क येत असल्याने त्यांची कोरोना अँटीजेन  तपासणी रॅपीड किटद्वारे करण्यात येणार आहे.  

     तरी सर्व गणेशमुर्ती बनविणारे, विकणारे तसेच गणेशोत्सवासाठीचे साहित्य विक्री करणारे सर्व संबंधीत व्यापा-यांनी   दि.19 व 20 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा परिषद मल्टीपर्पज शाळा, नगर परिषदेच्या बाजुला जालना येथे व फुलंब्रीकर नाट्यगृह जालना येथे सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत  तपासणी  करुन घ्यावी.

   या दोन दिवसात किमान 1000 ते 1500 गणेशमुर्ती बनविणारे, विकणारे तसेच गणेशोत्सवासाठीचे साहित्य विक्री करणारे सर्व संबंधीत व्यापरी यांची रॅपीड अँटीजेन चाचणी करण्याचे  नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परीषद जालना व मुख्याधिकारी नगर  परिषद जालना यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे. असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जालना यांनी कळविले आहे. 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment