Monday 17 August 2020

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी बैलपोळा सार्वजनिकरित्या साजरा करु नये --जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे

 


       जालना दि. 17 (जि.मा.का.) :- जालना जिल्ह्यात कोराना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे आणि वाढत्या रुग्ण संख्येवर नियत्रंण ठेवण्यासाठी जिल्ह्यात नागरी आणि ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा जिल्ह्यात दि. 17 व 18 ऑगस्ट 2020 रोजी साजरा होणारा बैल पोळा हा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करु नये, असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत.

        राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-19 ) प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 अन्वये लागू कुरन खंड 1,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणू नियत्रंण आणण्यासाठी व प्रार्दुभाव रोखण्यासाठी ज्या उपायोजना आवश्यक आहे त्या करण्यासाठी संक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

        प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा  एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंध कायदा 1997 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 कलम लागू असून  दि. 31 ऑगस्ट 2020 रोजी  पर्यंत लॉकडाऊन कालावधी वाढवला असल्याने 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12.00 वाजे पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिता कलम 144  लागू करण्यात आले असून  या कालावधीमध्ये   मोठया प्रमाणात सार्वजनिकस्थळी शेतक-यांनी बैलाची जाहिर मिरवणूक    बैलांना मिरवणूकीसाठी एकत्रितरित्या मंदिरात व इंतर ठिकाणी नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बैल पोळा हा सण शेतक-यांनी त्यांच्या घराच्या परिसरात किंवा शेतामध्ये साजरा करावा.

         या आदेशचे उल्लघन करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 1860 नुसार ते शिक्षेस पात्र असलेला अपराध समजला जाईल.असे जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले आहे.      

                                                                 *******

No comments:

Post a Comment