Wednesday 12 August 2020

वित्तीय वर्ष 2021-22 लेबर बजेट नियोजन व वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा संपन्न

 



 

     जालना दि.12 (जिमाका)-  वित्तीय वर्ष 2021-22 चे लेबर बजेट,नियोजन व वार्षिक कृती आराखडा तयार करणे तसेच वित्तीय वर्ष 2020-21 चे पुरक आराखडा तयार करण्या बाबत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व यंत्रणाप्रमुख यांची आढावा बैठक व कार्यशाळा रवींद्र बिनवडे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.  या कार्यशाळेकरीता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जालना श्रीमती निमा अरोरा, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अप्पर आयुक्त , शिवानंद टाकसाळे, उपजिल्हाधिकारी रोहयो रविंद्र परळीकर,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना बाळासाहेब शिंदे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण जालना, कार्यक्रम अधिकारी तथा तहसिलदार (सर्व) जि.जालना, सह कार्यक्रम अधिकारी तथा गट विकास अधिकारी (सर्व), वरिष्ठ भुवैज्ञानिक जालना, वनपरिक्षेत्र अधिकारी,लागवड अधिकारी, सामाजिक वनीकरण, जिल्हा रेशीम अधिकारी, तालुका कृषि अधिकारी आदी उपस्थित होते.

        यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री.बिनवडे म्हणाले या कार्याशाळेत लेबर बजेट 2021-22 चे नियोजन व वार्षिक कृती आराखडा तयार करणे तसेच वित्तीय वर्ष 2020-21 चे पुरक आराखडा तयार करणे बाबत शासन परिपत्रक 05 ऑगस्ट 2020 मधील नमुद सर्व सुचने प्रमाणे व वेळापत्रकाप्रमाणे कामे पुर्ण करण्याबाबत सांगितले.

    वित्तीय वर्ष 2021-22 चे नियोजन करतांना सार्वजनिक व वैयक्तिक कामांच्या समावेश करावा. वैयक्तिक कामांच्या केंद्र शासनाच्या निश्चित केलेल्या सामाजिक व आर्थिक जनगणना सर्वेक्षण (SECC) यादीतील क्रमानुसार अंतर्गत प्राधान्यक्रम (Inter–se-Priority) निश्चित करण्यात यावे. जिल्हा वार्षिक कृती आराखड्याचे नियोजन अकुशल : कुशल 60 : 40 प्रमाणात राहील याची दक्षता घ्यावी. वार्षिक कृती आराखड्यातील प्रस्तावित कामांपैकी 60 टक्के कामे ही कृषी व कृषी संलग्न उत्पादकता वाढविण्याबाबत असावीत.  Mission Water Conservation मध्ये समाविष्ट तालुक्यामध्ये Natural Resource Management च्या कामावरील खर्च 65 टक्के राहील या बाबींची खात्री करावीत.आराखड्यात प्रस्तावीत करण्यात आलेली कामे मग्रारोहयो अंतर्गत अनुज्ञेय कामांच्या यादीतील असावीत. ग्रामपंचायतनिहाय आराखडा तयार करतांना   ग्रामपंचायतीमध्ये अपुर्ण कामे व ती पुर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यदिन व सेल्फ वरील कामे याबाबतचा विचार करुन नियोजन करण्याबाबतच्या सुचनाही जिल्हाधिाका-यांनी यावेळी दिल्या.  यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर यांनीही उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन केले.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment