Saturday 15 August 2020

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या लिक्वीड ऑक्सिजन प्लॅन्टचा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ

 



 

जालना दि.15- (जिमाका)- जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या लिक्वीड ऑक्सिजन प्लॅन्टचा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज दि 15 ऑगस्ट रोजी फित कापून  शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी जालना संदीपान सानप,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संजय जगताप, डॉ. खंडागळे,संजय अग्रवाल यांची उपस्थिती होती.

महिकोचे प्रमुख श्री. बारवाले यांनी सी. एस. आर. फंडात दिलेल्या 50 लक्ष रुपयांच्या माध्यमातून 20 हजार लिटर क्षमता असलेल्या लिक्विड ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ करण्यात आला आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्‍सिजनचा योग्य दाबाने व सुरळीतपाने पुरवठा या प्लांटमुळे होणार असून येणाऱ्या काळात राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयात अशाच प्रकारच्या प्लांटची उभारणी करण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.  

No comments:

Post a Comment