Sunday 31 January 2021

पल्स पोलिओ लसीकरणाचा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ





      जालना दि. 31 (जिमाका) :-  घनासावंगी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे पल्स पोलिओ लसीकरणाचा  शुभारंभ  पोलिओ डोस पाजुन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.

   यावेळी  अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, आरोग्य उपसंचालक मुंबई  श्रीमती  गोलाईत, भागवत रक्तारे, बन्सीधर शेळके, श्रीमती वंदना पवार, राजा देशमुख, जगन्नाथ कायंदे , श्रीमती नंदाताई पवार, तात्यासाहेब चिमणे, तहसिलदार नरेंद्र देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संतोष कडले,  आदींची उपस्थिती होती.

      देशभरात 'राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण' मोहिम सुरू आहे. तेव्हा आपणही  शुन्य ते पाच वर्षे वयोगटा पर्यंतच्या बालकांना जवळच्या केंद्रात जाऊन पोलिओ डोस अवश्य द्या आणि पोलिओमुक्त भारताच्या मोहिमेत सहभागी व्हा. असे आवाहन श्री. टोपे यांनी केले.

    जालना जिल्ह्यात एकुण 1 हजार 747 बुथ असुन  2 लाख 48 हजार 13 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार असुन त्यासाठी 4 हजार 707 एवढे मनुष्यबळ असुन  पर्यवेक्षणाकरीता 347 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आाली असुन पुढील चार दिवस हा कार्यक्रम सुरु राहणार आहे. 

      कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांनी  नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सन्मानपत्र देऊन डॉक्टारांचा गौरव करण्यात आला. तसेच 10 जणांना ग्लुकोमिटरचे वाटप  पालकमंत्र्यांच्या हस्ते  देण्यात आले.

-*-*-*-*-*-*-          

जिल्ह्यात 29 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 2 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि. 31 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 2 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे  तर  जालना तालुक्यातील  जालना शहर 13, मंठा तालुक्यातील मंठा शहर -1, परतूर तालुक्यातील सतोना 01, अंबा01, घनसावंगी तालुक्यतील पेनवाडी शेलगाव 01,अंबड तालुक्यातील अंबड शहर -1,  शहागड-1,पाथरवाला 01,बदनापुर तालुक्यातील बदनापुर पाथर देलगाव 01, जाफ्राबाद तालुक्यातील टेभुर्णी 01, बोरखेडी 01, आरदखेडा 01 भोकरदन तालुक्यातील मानपुर 01, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -3, बीड 01 आरटीपीसीआरद्वारे  29  व्यक्तीचा  तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक  असे एकुण 29 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19877 असुन  सध्या रुग्णालयात-93 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6966 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.476 वढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-117520 एवढी आहे.  प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -29 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13749 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-103320 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने - 124, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6667

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 12,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-6532 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -10,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-93,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-02, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-13159,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-223 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-199475 मृतांची संख्या-367  आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन एक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली

             आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-               

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

29

13749

डिस्चार्ज

2

13159

मृत्यु

1

367

1         शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

285

2        खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

82

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

449

83675

पॉझिटिव्ह

29

11444

पॉझिटिव्हीटी रेट

6.5

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

27

33983

पॉझिटिव्ह

0

2305

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

6.78

एकुण टेस्ट

476

117658

पॉझिटिव्ह

29

13749

पॉझिटिव्ह रेट

6.09

11.69

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

81978

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

19784

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

25

 होम क्वारंटाईन      

25

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

199475

हाय रिस्क  

70877

लो रिस्क   

128598

 रिकव्हरी रेट

 

95.71

मृत्युदर

 

2.67

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4865

 

अधिग्रहित बेड

90

 

उपलब्ध बेड

4775

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

80

 

उपलब्ध बेड

540

डीसीएचसी बेड क्षमता

 

723

 

अधिग्रहित बेड

10

 

उपलब्ध बेड

713

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

23

 

उपलब्ध बेड

192

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

43

 

उपलब्ध बेड

622

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

7

 

उपलब्ध बेड

107

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

3522

 

 

-*-*-*-*-*-*-