Monday 4 January 2021

कोव्हीड 19 लसीकरणासाठी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल समितीची बैठक संपन्न

 



                                          

      जालना, दि. 4 (जिमाका) -  कोव्हीड 19 वरील लस लवकरच उपलब्ध होणार असुन  पहिल्या टप्प्यामध्ये ही लस आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणार आहे.  जिल्ह्यात टप्प्या-टप्प्याने ही लस प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी लसीकरणाचे तालुकानिहाय बैठक जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या अध्यक्षेतखाली घेण्यात आली.

  यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष कडले, डॉ. सोनटक्के, आदींची उपस्थिती होती.

       जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, कोव्हीड 19 वरील लस लवकरच उपलब्ध होणार असुन ड्रायरनसाठी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये जालना जिल्ह्यात दि. 2 जानेवारी रोजी पालकमंत्री तथा राज्याचे आरोगयमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत ड्रायरन घेण्यात आला. या ड्रायरनमुळे लसीकरणाच्यावेळी येणा-या अडचणींवर कशा प्रकारी मात करावी याबाबत शहानिशा झाली. लसीकरणाच्यावेळी प्रत्यक्षरीत्या कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

    लसीकरणासाठी प्रत्येक टीममध्ये सहा जणांचा समावेश असणार असुन   यामध्ये एक शिक्षक, एका आशा कार्यकर्ती, एक पोलीस कर्मचारी, दोन परिचारीका आणि एक अंगणवाडी सेविका यांचा समावेश राहणार असुन यासाठी तीन कक्षांची आवश्यकत पडणार आहे.पहिल्या कक्षात लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली जाईल तर दुसऱ्या कक्षात त्या व्यक्तीला लस टोचण्यात येईल. तिसऱ्या कक्षामध्ये लस दिलेल्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असुन त्या कक्षामध्ये लस दिलेल्या व्यक्तीसाठी टी. व्ही.ची व्यवस्थासुध्दा करण्यात येणार आहे.                           

       कोव्हीड 19 वरील लसीची थंड जागेमध्ये साठवणुक करणे गरजेचे असल्याने पुरेशा प्रमाणामध्ये कोल्ड स्टोरोजेस माहिती उपलब्ध करुन ठेवावी.  कोव्हीड लसीवरील देखरेख व तयारीसाठी शासनामार्फत कोविन नावाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असुन या सॉफ्टवेअरच्या वापराबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले. 

        हे लसीकरण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्येकाने एकसंघ तसेच समन्वयाने काम करण्याची गरज असुन कोरोनाच्या काळात प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने उत्कृष्टरित्या काम केले असुन लसीकरणाच्या कामातसुद्धा सर्वजण नियोजनबद्ध व उत्कृष्टरित्या काम करुन लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करतील, असा विश्वासही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी व्यक्त केला.      

        या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉक्टर्स, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

*-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment