Sunday 31 January 2021

पल्स पोलिओ लसीकरणाचा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ





      जालना दि. 31 (जिमाका) :-  घनासावंगी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे पल्स पोलिओ लसीकरणाचा  शुभारंभ  पोलिओ डोस पाजुन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.

   यावेळी  अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, आरोग्य उपसंचालक मुंबई  श्रीमती  गोलाईत, भागवत रक्तारे, बन्सीधर शेळके, श्रीमती वंदना पवार, राजा देशमुख, जगन्नाथ कायंदे , श्रीमती नंदाताई पवार, तात्यासाहेब चिमणे, तहसिलदार नरेंद्र देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संतोष कडले,  आदींची उपस्थिती होती.

      देशभरात 'राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण' मोहिम सुरू आहे. तेव्हा आपणही  शुन्य ते पाच वर्षे वयोगटा पर्यंतच्या बालकांना जवळच्या केंद्रात जाऊन पोलिओ डोस अवश्य द्या आणि पोलिओमुक्त भारताच्या मोहिमेत सहभागी व्हा. असे आवाहन श्री. टोपे यांनी केले.

    जालना जिल्ह्यात एकुण 1 हजार 747 बुथ असुन  2 लाख 48 हजार 13 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार असुन त्यासाठी 4 हजार 707 एवढे मनुष्यबळ असुन  पर्यवेक्षणाकरीता 347 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आाली असुन पुढील चार दिवस हा कार्यक्रम सुरु राहणार आहे. 

      कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांनी  नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सन्मानपत्र देऊन डॉक्टारांचा गौरव करण्यात आला. तसेच 10 जणांना ग्लुकोमिटरचे वाटप  पालकमंत्र्यांच्या हस्ते  देण्यात आले.

-*-*-*-*-*-*-          

No comments:

Post a Comment