Saturday 23 March 2024

दुय्यम निबंधक कार्यालय आजपासून सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरु


 

जालना, दि. 23 (जिमाका) :- दरवर्षी 1 एप्रिलला बाजार मुल्य दरतक्ते प्रसिध्द होत असल्याने मार्च महिन्यात सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोदंणीसाठी पक्षकारांची गर्दी असते. तसेच अर्थिक वर्ष 2023-2024 या वर्षाचा इष्टांक पुर्ण करण्याच्या दृष्ट्रीने महाराष्ट्र मुद्रांक शुल्कं (अभय योजना) या संबधीचे कामकाज करण्यासाठी व दस्त नोदंणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकांराची गर्दी वाढत आहे, त्यामुळे पक्षकांराच्या सोयीसाठी जालना जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दि. 23 मार्च व 24 मार्च तसेच दि.29 मार्च ते 31 मार्च या शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्यात येणार आहेत, असे सह जिल्हा निबंधक वर्गं.1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  कळविले आहे.

-*-*-*-*-

Friday 22 March 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ निवडणूक कालावधीमध्ये जात/धर्म/भाषावार शिबिरांच्या आयोजनावर निर्बंध

 


 

जालना, दि. 22 (जिमाका) - मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे जात / भाषा / धार्मिक शिबीरांचे / मेळाव्यांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

 

जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात कुठेही पारंपारीक सण, उत्सव, रुढीनुसार चालत आलेले धार्मीक कार्यक्रम वगळून लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आयोजीत केलेल्या व ज्यामधुन मतदान, मतदार याच्यांवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रभाव पडेल असा कोणताही कार्यक्रम तसेच राजकीय पक्षाचा प्रचार प्रसिध्दी होईल अशा स्वरुपाचे कोणतेही जात/ भाषा / धार्मिक शिबीरांचे/मेळाव्यांचे आयोजनावर निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत,  असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

***

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा · पहिल्या 100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद · भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप

 






जालना, दि.22 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

            आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

            हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

 

वैशिष्ट्य

            सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

 

वापर कसा करायचा

           एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

 

अचूक कृती व देखरेख

            या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

 

लाईव्ह फोटो, व्हिडिओ

            या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

 

तातडीने होते कारवाई

            या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

 

डाटा सुरक्षा

            या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

 

-*-*-*-*-

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध

 


 

जालना, दि. 22 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व ईतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिक छापतांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी यांनी निर्बंध घातले आहे. यामध्ये इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे,  आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे, आदि नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दि. 6 जुन 2024 पर्यंत) निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्‍ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

 

-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करण्याच्या कार्यपध्‍दतीचे आदेश जारी

 


 

जालना, दि. 22 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम दिनांक 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना  जिल्‍हयात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटर गाड्या/वाहने यांचा समावेश नसावा.तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्‍यक्‍ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्‍यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.  याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नूसार एकतर्फी आदेश जिल्‍हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्‍ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

निवडणूकीचे कालावधीत जालना जिल्ह‌यात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाडया/वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा, तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वादय वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध करण्यात आला  असल्याचे आदेश दि. 16 मार्च 2024 रोजीचे 6 वाजेपासुन ते दि. 6 जून 2024 चे रात्रीचे 12 वाजेपर्यंत संपूर्ण जालना जिल्ह्यात अंमलात राहतील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

Thursday 21 March 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्‍यावर निर्बंध

 

जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 मार्च 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

                                                       -*-*-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये, शैक्षणिक संस्‍था, सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास निर्बंध

 


जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर घालण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेशाद्वारे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 प्रचारासाठी वापरण्‍यात येणाऱ्या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावण्यासाठी नियमांचे पालन करावे

 


 

जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, यासाठी बंधने घालण्यात आली आहेत. त्यासाठी  जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144अन्वये खालील प्रमाणे निर्बंध घातले आहेत.

फिरत्या वाहनांवर पक्षप्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंडो स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून  2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहनचालकाच्या आसना मागे वाहनाच्या डाव्या व उजव्याबाजुने लावण्यात यावा, ईतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांनी  निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) अंमलात राहतील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्‍त्‍यावर रहदारीस अडथळा निर्माण न होवू देण्‍यासाठी निर्बंध जारी

 

जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकीसंबंधी पोस्टर्स, बॅर्नस, पॉम्‍प्‍लेट्स, कटआऊट्स, होर्डीग्ज, कमानी लावणे या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवु शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे आदेशाव्दारे निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी जालना यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1)(डीबी) अन्वये निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 खाजगी व्‍यक्‍तीच्‍या जागेवर / सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्‍तीपत्रके लावण्‍यास निर्बंध

 

                                  

जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना  जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे, इत्यादी करीता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधीत मालकाच्‍या परवानगी शिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाचे परवानगी शिवाय वापर करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निवडणूकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीचा संबंधीत जागा मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधीत परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 मोटार गाडया/वाहनांचा ताफ्याचा वापर करण्‍यास निर्बंध

 


 

जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या / वाहने यांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने नसावीत, असे निर्देश दिले आहेत, त्याअर्थी जालना जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटार गाड्या/वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-*-

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध लागू

 

 

जालना, दि.21 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. सदर निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालु ठेवण्याची शक्यता असल्यामुळे सदर बाबींवर निर्बंध घालणे आवश्यक आहेत. तरी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) मधील प्राप्त अधिकारानूसार निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर खालीलप्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही.  सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10  वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात  ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनी क्षेपकाच्या  आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल.  सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरासंबंधीत घेतलेल्या  परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे  बंधनकारक राहील. ध्‍वनीवर्धकांचा मग ते एका जागी लावलेले असोत किंवा चालत्‍या वाहनावर बसविलेले असोत, त्‍यांचा सकाळी 6 वाजेपूर्वी किंवा रात्री 10 वाजेनंतर  आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय करण्‍यात येऊ नये. संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय सार्वजनिक सभा आणि मिरवणुकांमध्‍येही ध्‍वनीवर्धकाचा वापर करण्‍यात येऊ नये. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि.6 जुन 2024)अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 शासकीय कार्यालय, विश्रामगृह परिसरात मिरवणुका काढण्‍यास, घोषणा तसेच सभा घेण्यावर निर्बंध लागू

 

 

जालना, दि.21 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय व संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या, उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डींग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इत्यादी बाबी नियंत्रीत करणे आवश्यक झाले आहे. तरी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन या आदेशाद्वारे  वरील ठिकाणी वरिलप्रमाणे कृती करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दि.6 जुन 2024) निर्बंध घालण्यात येत आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 सार्वजनिक मालमत्‍ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यांतर्गत कार्यवाहीचे आदेश जारी

 


 

जालना, दि.21 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी कार्यक्रम दि.16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनाकांपासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. काही व्यक्ती, संस्था यांच्याकडुन मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होडींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधीत व्यक्ती, संस्था यांच्याकडून होडींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत निवडणूक आयोगाने मालमता विरुपीत करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित केल्यानुसार महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीमध्ये होडींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भितीवर जाहीरात प्रदर्शित करतांना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते दुर (नष्ट) करुन ईमारती, मालमत्ता पूर्ववत करुन घेणे, जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यक आहे. तरी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144  अन्वये निवडणूकीच्या कालावधीमध्ये शासकीय-निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपी करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दि.6 जुन 2024) निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

                                          -*-*-*-*-

Wednesday 20 March 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास आदेशान्वये बंदी

 

 

जालना, दि.20 (जिमाका) :- भारत निवडणुक आयोग यांच्या सुचनेनूसार जालना जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी-कर्मचारी तसेच सराफा यांच्या व्यतिरिक्त तसेच मा. उच्च न्यायालयातील जुन्या रिट पिटीशन 2009/2014 च्या आदेशास अधीन राहुन इतर सर्व परवानाधारक व्यक्तींनी परवाना दिलेले शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून निवडणुक घोषित झाल्यापासून निवडणूक निकाल घोषित होईपर्यत परवाना दिलेले शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास निर्बंध लागू करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश जारी करण्यात आले आहेत. शस्त्र परवानाधारकांनी आपले शस्ञ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावेत. तसेच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक आठवडयाच्या आत संबधितांचे शस्ञ परत करण्यात यावेत. सदर आदेश जालना जिल्ह्यासाठी आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासुन दि. 6 जून 2024 पर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

         -*-*-*-*-

 


लोकसभा निवडणूक पारदर्शक व निर्भय वातारणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज -- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज -- जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल - आचारसंहितेची कडक अंमलबजावणी - अवैध दारु, ड्रग्ज, रोख रक्कमा, शस्त्रास्त्रांवर बारकाईने लक्ष - अफवा पसरविणाऱ्यांवर पोलीसांची करडी नजर - सोशल मिडियावरुन चुकीच्या बातम्या, अफवा पसरु नयेत - सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास सायबर पोलीस करणार कारवाई






            जालना, दि.20 (जिमाका) - जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातारणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे,  अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि भयमुक्त वातावरणात निवडणुक पार पाडण्याकरीता पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी  उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 नूसार जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. लोकसभा निवडणूकीसाठी 23 स्थिर पथके स्थापन करण्यात आली असून कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे एकुण तीन सत्रात काम सुरु झालेले आहे. वाहनातून वाहून नेण्यात येणारी अवैध मद्य, पैसा याच्या तपासणीसाठी 23 चेकींग पाँईटची उभारणीही करण्यात आलेली आहे. फिरते पथकेही कार्यरत आहेत. व्हिडीओ सर्व्हलन्सच्या 21 टीम काम करत असून अकांऊंटींगच्या 3 टीम आहेत. खर्च निरीक्षकांसाठी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.  

शासकीय मालकीची कार्यालये, शासकीय वास्तु व त्यांच्या भिंतीवरील जाहिराती, भित्तीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊट, होर्डिंग्ज, झेंडे इत्यादी निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाल्यापासून 24 तासांच्या आत काढून घेणे किंवा झाकून घेणे बंधनकारक होते.  तर सार्वजनिक जागेवरील सर्व राजकीय जाहिराती, भित्तीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, होर्डिग्ज, कटआऊट इत्यादी निवडणूक़ जाहिर झाल्यापासून 48 तासांच्या आत काढून घेणे आवश्यक होते. सार्वजनिक जागा किंवा मिळकतीमध्ये बसस्थानक, बसथांबा, रेल्वे पुल, शासकीय बस व वाहन, विद्युत व टेलिफोन खांब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व इमारती यांचा समावेश होईल. तसेच खाजगी मिळकती किंवा जागेवरील सर्व अनाधिकृत राजकीय स्वरुपाच्या जाहिराती, भित्तीपत्रके, होर्डिंग्ज इत्यादी निवडणूक जाहीर झाल्यापासून 72 तासांच्या आत काढून घेणे बंधनकारक असल्याने ही कार्यवाही प्रशासनाकडून तत्परतेने वेळेत करण्यात आलेली आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.  

जिल्ह्यात बंदुक अनुज्ञप्ती 654 कार्यरत असून आजपर्यंत 313 शस्त्रे जमा करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील अतिदक्षतेच्या मतदान केंद्रांची यादी तयार केली असून निवडणूक निरीक्षक आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन अंतीम केलेल्या अतिदक्षतेच्या मतदान केंद्रांची यादी जाहीर केली जाणार आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध दारुविक्री व हातभट्टींवर कारवाई करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस विभाग कार्यक्षम असून त्यांच्याकडून विविध कारवाया करण्यात येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून  अफवा पसरविणाऱ्या पोस्टवर सायबर पोलिसांची करडी नजर असून अफवा पसरविणाऱ्या पोस्ट शेअर करु नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशी माहितीही यावेळी दिली. 

लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी) स्थापन करण्यात आलेली  आहे. यामध्ये प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक / सोशल मिडीयास देण्यात येणाऱ्या जाहिरांतीचे पूर्व प्रमाणिकरण करणे.  एखादी बातमी पेड न्यूज आहे का हे तपासून उचित कारवाई करणे, आदी कामे ही समिती करणार आहे. मुद्रीत माध्य मातील  (प्रिंट मिडीया) जाहिराती  मतदानाच्या  दिवशी  किंवा  मतदानाच्या एक  दिवस अगोदर प्रकाशित  करावयाची  असल्यास या जिल्हातस्तेरीय  समितीचे  प्रमाणपत्र  घेणे बंधनकारक  आहे. अशी माहितीही डॉ. पांचाळ यांनी दिली.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलिस विभाग दक्षता घेत आहे. राज्य शासनाकडून आणखी सीआरपीएफसह अतिरिक्त फोर्स मागविण्यात आलेला आहे. अवैध दारु, ड्रग्ज, रोख रक्कमा, अवैध शस्त्रात्रे यावर पोलिसांचे जास्त लक्ष असणार आहे. पोलीस विभागाने मागील तीन दिवसांत अवैध शस्त्रात्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर 36 केसेस  दाखल केल्या आहेत. एसएसटी व एफएसटी पथके सक्रीय झालेले आहेत.  जिल्ह्यात मोक्का अंतर्गत एक तर एमपीडीए अंतर्गत 4 अशा विविध कारवाई करण्यात आल्या आहे. तसेच देशी कट्टयावर कारवाईसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि कायदा व सुव्यवस्थेच्याबाबतीत कुठलीही अडचण न भासता सर्व परिस्थिती  अबाधित ठेवण्यात येईल. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

-----

Tuesday 19 March 2024

लोकसभा निवडणूक – 2024 तक्रारींवर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

 


 

जालना, दि. 19 (जिमाका) :- लोकसभा निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात 24 X 7 नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण हे या कक्षाचे नोडल अधिकारी आहेत. आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्च, मतदार यादी इत्यादींबाबत कक्षाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवून तक्रारींचे निराकरण केले जाते.  नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरु राहण्यासाठी 14 अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविली आहे.

***

 

Monday 18 March 2024

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत बैठक संपन्न

 







जालना, दि. 17 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत आज जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, यांच्यासह विविध राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगून मुद्रीत माध्‍यमातील  (प्रिंट मिडीया) जाहिराती  मतदानाच्‍या दिवशी  किंवा  मतदानाच्‍या एक  दिवस अगोदर प्रकाशित  करावयाची  असल्‍यास जिल्‍हास्‍तरीय  समितीचे  प्रमाणपत्र  घेणे बंधनकारक  आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरांतीचे पूर्व प्रमाणिकरण करणे बंधनकारक असल्याचेही  त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधत त्यांच्या शंकेचे निरसनही केले.

-*-*-*-*-