Sunday 17 March 2024

लोकसभा निवडणूक -2024 मतदान 13 मे रोजी तर 4 जून रोजी मतमोजणी निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज -- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

 




जालना , दि.17(जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. जालना जिल्ह्यात दि. 13 मे 2024 रोजी मतदान तर मतमोजणी  दि. 4 जून 2024 रोजी होणार आहे.  निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी निवडणूकी विषयक सविस्तर माहिती दिली.

निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार जिल्ह्यात चवथ्या टप्प्यात निवडणूक होत आहे.

निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे- 

                अधिसूचना जारी करणे- दि.18 एप्रिल 2024,

                नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक  दि.25 एप्रिल,

                नामनिर्देशन पत्रांची छाननी दि.26 एप्रिल, 

                उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिनांक दि.29 एप्रिल,

                मतदानाचा दिनांक दि.13 मे,

                मतमोजणीचा दिनांक दि.4 जून,

                निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक दि.6 जून. 

मतदार संघ व मतदान केंद्रांची रचनाः-

जालन लोकसभा मतदार संघात जालना, बदनापूर (अ.जा.), भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, पैठण विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.

18-जालना लोकसभा मतदारसंघ –विधानसभा निहाय मतदार संख्‍या

 

अ.क्र.

 

विधानसभा मतदार संघाचे नाव

पुरुष

मतदार

स्‍त्री

मतदार

तृतीय

पंथी

मतदार

एकुण मतदार

सेना दलातील मतदार

एकुण मतदार संख्‍या

01

101- जालना विधानसभा मतदारसंघ

170605

150456

35

321096

118

321214

02

102-बदनापुर, (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ

166986

152097

4

319087

184

319271

03

103- भोकरदन, विधानसभा मतदारसंघ

161183

147157

0

308340

1016

309356

04

104- सिल्‍लोड, विधानसभा मतदारसंघ

176256

157814

03

334073

568

334641

05

106- फुलंब्री, विधानसभा मतदारसंघ

180876

162446

05

343327

353

343680

06

110- पैठण,विधानसभा मतदारसंघ

162345

146349

04

308698

130

308828

एकुण मतदार

10,18,251

9,16,319

51

19,34,621

2,369

19,36,990

 

 

 

 

 

·         दिनांक 01जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्‍द झालेल्‍या जालना जिल्‍हयातील विधानसभा मतदार संघातील अंतिम मतदार यादीतील मतदार संख्‍या.

 

अ.क्र.

 

विधानसभा मतदार संघाचे नाव

पुरुष

मतदार

स्‍त्री

मतदार

तृतीय

पंथी

मतदार

एकुण मतदार

सेना दलातील मतदार

एकुण मतदार संख्‍या

01

99 परतुर विधानसभा मतदारसंघ

161202

146746

0

307948

131

308079

02

100 घनसावंगी विधानसभा मतदारसंघ

163604

149568

1

313173

136

313309

03

101- जालना विधानसभा मतदारसंघ

170605

150456

35

321096

118

321214

04

102- बदनापुर, विधानसभा मतदारसंघ(अ.जा.)

166986

152097

4

319087

184

319171

05

103- भोकरदन, विधानसभा मतदारसंघ

161183

147157

0

308340

1016

309356

एकुण मतदार

823580

746024

40

1569644

1585

1571129

 

 

18-जालना लोकसभा मतदारसंघ –विधानसभा निहाय 18 ते 19 वयोगटातील मतदार संख्‍या

 

अ.क्र.

 

विधानसभा मतदार संघाचे नाव

पुरुषमतदार

स्‍त्रीमतदार

तृतीयपंथी

 मतदार

एकुण मतदार

01

101- जालना विधानसभा मतदारसंघ

2164

1408

00

3572

02

102-बदनापुर, (अ.जा.)विधानसभामतदारसंघ

2584

1347

02

3933

03

103- भोकरदन, विधानसभा मतदारसंघ

2398

1308

00

3706

04

104- सिल्‍लोड, विधानसभा मतदारसंघ

3114

1628

00

4742

05

106- फुलंब्री, विधानसभा मतदारसंघ

2447

1313

00

3760

06

110- पैठण,विधानसभा मतदारसंघ

2894

1514

00

4408

एकुण मतदार

15601

8518

02

24121

 

जालना जिल्‍ह्यातील विधानसभा मतदार संघातील 18 ते 19 वयोगटातील मतदार यांचीसंख्‍या

अ.क्र.

विधानसभा मतदार संघाचे नाव

पुरुष मतदार

स्‍त्री मतदार

तृतीयपंथी मतदार

एकुण मतदार

01

99-परतुर

2329

1203

00

3532

02

100-घनसावंगी

2364

1181

00

3545

03

101- जालना

2164

1408

00

3572

03

102- बदनापुर, (अ.जा.)

2584

1347

02

3933

05

103- भोकरदन

2398

1308

00

3706

एकुण

11839

6447

02

18288

 

 

दिनांक 01जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्‍द झालेल्‍या 18-जालना लोकसभा मतदार संघातील दिव्‍यांग(PwD) आणि वय वर्ष85  वयोगटातील मतदारांची संख्‍या खालीलप्रमाणे आहे.

 

अ.क्र.

 

विधानसभा मतदार संघाचे नाव

दिव्यांगमतदार

85+ वयोगटावरीलमतदार

पुरुष

मतदार

स्‍त्री

 मतदार

तृतीयपंथी

 मतदार

एकुण मतदार

पुरुष

मतदार

स्‍त्री

 मतदार

तृतीयपंथी

 मतदार

एकुण मतदार

01

101- जालना विधानसभा मतदारसंघ

1705

1364

00

3069

  2387

3250

00

5637

02

102-बदनापुर, (अ.जा.)विधानसभामतदारसंघ

1266

821

00

2087

1918

3398

00

5316

03

103- भोकरदन, विधानसभा मतदारसंघ

1324

913

0

2237

2231

3983

00

6214

04

104- सिल्‍लोड, विधानसभा मतदारसंघ

2240

1414

00

3654

1998

3418

00

5416

05

106- फुलंब्री, विधानसभा मतदारसंघ

1450

944

00

2394

2117

3416

00

5533

06

110- पैठण,विधानसभा मतदारसंघ

1839

1128

00

2967

1918

3214

00

5132

एकुण मतदार

9824

6584

00

16408

12569

20679

00

33238

 

 

 

 

दिनांक 01जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्‍द झालेलीजालना जिल्‍ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय दिव्‍यांग आणि वय वर्ष 85 पेक्षा जास्‍त वयोगटातील मतदारांची संख्‍या खालीलप्रमाणे आहे.

 

अ.क्र.

 

विधानसभा मतदार संघाचे नाव

दिव्यांगमतदार

85+ वयोगटावरीलमतदार

पुरुष

मतदार

स्‍त्री

 मतदार

तृतीयपंथी

 मतदार

एकुण मतदार

पुरुष

मतदार

स्‍त्री

 मतदार

तृतीयपंथी

 मतदार

एकुण मतदार

01

99- परतुर विधानसभा मतदारसंघ

1677

855

00

2532

2183

3675

00

5858

02

100 - घनसावंगी विधानसभा मतदारसंघ

1429

870

00

2299

2098

3590

00

5688

03

101- जालना विधानसभा मतदारसंघ

1705

1364

00

3069

  2387

3250

00

5637

04

102-बदनापुर, (अ.जा.)विधानसभामतदारसंघ

1266

821

00

2087

1918

3398

00

5316

05

103- भोकरदन, विधानसभा मतदारसंघ

1324

913

00

2237

2231

3983

00

6214

एकुण मतदार

7401

4823

00

12224

10817

17896

00

28713

 

 

1)       मतदान केंद्रे

मा.भारत निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार 18 जालना लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्‍यात आले आहे तसेच 1500 पेक्षा जास्‍त मतदार संख्‍या असलेल्‍या मतदान केंद्रासाठी सहायकारी मतदान केंद्रे तयारकरण्‍यात आलेली आहेत.त्‍यानुसार 18 जालना लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्रे  खालीलप्रमाणे आहेत.

 

18 -जालना लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्रे/सहायकारी मतदान केंद्रे

 

अ.क्र.

विधानसभा मतदार संघाचे नाव

मतदान केंद्राची संख्‍या

सहायकारी मतदान केंद्रांची संख्‍या

एकुण मतदान केंद्रे

01

101- जालना विधानसभा मतदारसंघ

317

12

329

02

102-बदनापुर,(अ.जा.)विधानसभामतदारसंघ

355

03

358

03

103- भोकरदन, विधानसभा मतदारसंघ

328

01

329

04

104- सिल्‍लोड, विधानसभा मतदारसंघ

324

32

356

05

106- फुलंब्री, विधानसभा मतदारसंघ

342

13

355

06

110- पैठण,विधानसभा मतदारसंघ

326

08

334

 

एकुण

1992

69

2061

 

जालना जिल्‍ह्यातील 05 विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्रांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

विधानसभा मतदार संघाचे नाव

मतदान केंद्राची संख्‍या

सहायकारी मतदान केंद्रांची संख्‍या

एकुण मतदान केंद्रे

01

99-परतुर विधानसभा मतदारसंघ

347

02

349

02

100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघ

352

01

353

03

101- जालनाविधानसभा मतदारसंघ

317

12

329

04

102- बदनापुर, (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ

355

03

358

05

103- भोकरदन विधानसभा मतदारसंघ

328

01

329

 

एकुण

1699

19

1718

               

सदर मतदान केंद्रांवर मा.भारत निवडणूक आयोग यांच्‍या सुचनेनुसार Ramp ,पिण्‍याचे पाणी, शौचालय,वाहनतळ, इत्‍यांदीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यात आले आहे. तसेच मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद जालना हे याबाबतचे नोडल अधिकारी आहेत. 03 पेक्षा जास्‍त मतदान केंद्रावर प्रवेश,निर्गम,वाहतुक,पार्कींग संदर्भात पोलीस अधिक्षक,जालना यांना सुचना देण्‍यात आल्‍या आहेत.

3)Voters Information Slip(VIS)

                मतदारांना त्‍यांच्‍या मतदान केंद्राची व मतदार यादीतील त्‍यांच्‍या अनुक्रमांकाची तसेच मतदानाचा दिनांक व वेळ  बाबत माहिती होण्‍याकरीता मा.भारत निवडणूक आयोगाच्‍या सुचनेनुसार QR कोड असणारी Voter Information Slip यावेळी BLO  मार्फत मतदारांना मतदानाच्‍या किमान 05 दिवसापुर्वी  मिळेल अशा पध्‍दतीने वितरीत केल्‍या जाणार आहेत.

                सदरील Voter Information Slip वर मतदारांचा फोटो असणार नाही व अशी मतदार चिठ्ठी  स्‍वतंत्ररीत्‍या मतदानासाठी पुरावा म्‍हणुन ग्राह्य धरली जाणार नाही.

1)     मतदार मार्गदर्शिका (Voter Guide)

                सर्वसाधारण मतदारांकरीता मतदार मार्गदर्शिका (Voter Guide) बाबतच्‍या  माहिती पुस्तिकेचे वितरण उपरोक्‍त मतदार(चिठ्ठी)Voter Information Slipसोबत मतदारांना केले जाणार आहे. सदर मतदार मार्गदर्शिकेमध्‍ये मतदानाचा दिनांक आणि वेळ,BLO बाबतची माहिती मा.भारत निवडणूक आयोगाची संकेतस्‍थळे,हेल्‍पलाईन नंबर,मतदान केंद्रावर काय करावे व काय करु नये या बाबत माहिती असणार आहे.

 

5)मतदारांची ओळख पटविण्या करीता लागणारे पुरावेः-

मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्याकरीता मतदारांना त्यांचे ओळख पत्र (EPIC) किंवा खालील पैकी एक पुरावा सादर करणे आवश्‍यक आहे.1)आधार कार्ड2)मनरेगा कार्ड3)फोटो असलेले बँक/पोस्‍ट पासबुक4)श्रम मंत्रालयाद्वारे  वितरीत केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड5)वाहन परवाना6)पॅन कार्ड7)NPR द्वारे वितरित केलेले स्मार्ट कार्ड8)पासपोर्ट

9)फोटो असलेले पेंशन विषयक कागदपत्रे 11)शासकीय वनिमशासकीय कार्यालयाच्‍या कर्मचा-यांचे ओळखपत्र 11)खासदार/आमदार यांना वितरीत केलेले सरकारी ओळखपत्र 12)सामाजिक न्याय विभाग तर्फे वितरित केलेले दिव्यांगाचे स्मार्ट कार्ड(UDID).

 

6)मतदान केंद्रावरील व्यवस्था:-

i) AMF(Assured Minimum Facility)-

18-जालना लोकसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी मा. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार Ramp, पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ,पार्किंग, व्हील चेअर, इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे, व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जालना हे या बाबतचे नोडल अधिकारी आहेत.

 

ii) दिव्यांग(PwD) मतदारांकरीता सुविधा-

मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार 18-जालना लोकसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रे ही तळ मजल्यावर ठेवण्यात आली आहेत, दिव्‍यांग मतदारांची गरज लक्षात घेऊन मतदान केंद्रावर योग्‍य त्‍या सुविधा तयार केल्या आहेत.मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर त्यांच्या मदतीकरीता स्वयंसेवक नेमले जाणार आहेत, व या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवणे ,वाहणाची व्‍यवस्‍था व व्हील चेअरची व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.मा.भारत निवडणूक आयोगाच्या सक्षमअॅपवर याबाबतची नोंदणी मतदारांना करता येईल.

iii) Display of voters facilitation Posters-

मतदान केंद्रावर मतदारांच्या माहिती करीता खालीलप्रमाणे 04 पोस्टर लावण्यात येणार आहेत.

1) मतदान केंद्राचे विवरण

2)उमेदवारांची यादी

3) काय करावे, काय करू नये याबाबत सुचना.

4) मतदारांसाठी ओळखीचे पुरावे आणि मतदान कसे करावे या बाबत सुचना

iv)Voters Assistance Booth(VAB)

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना मार्गदर्शना करीताVoters Assistance Booth(VAB)उभारले जाणार आहेत. अशा VAB मध्ये उमेदवारांना निवडणूक विषयक सूचना, मार्गदर्शन आणि उमेदवारांची नावे, Alphabetical मतदार यादी उपलब्ध असणार आहे.

v) वय वर्षे 85 पेक्षा जास्‍तवय असणारे आणि दिव्‍यांग मतदारांकरीता मतदानाची व्यवस्थाः-

मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नियम 27(A)अंतर्गत ज्‍या मतदारांचे वय वर्षे 85 पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्‍येष्‍ठ नागरीक व 40% पेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या दिव्‍यांग मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. या करीता अशा संवर्गातील मतदारांना फॉर्म12D घरोघरी पोहचविण्यात येणार आहे. वय वर्ष 85 पेक्षा जास्‍त  वय असणा-या ज्‍येष्‍ठ नागरीकांना तसेच 40% पेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या(मतदार यादी मध्ये मार्किंग असणारे)असे मतदार जे मतदान केंद्रावरयेऊ शकत नाहीत अशा मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर सुविधा ही वैकल्पिक स्वरूपाची असून केवळ मतदान केंद्रावर न येऊ शकणाऱ्या अशा पात्र मतदारांना ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.या करिता अशा संवर्गातील मतदारांना मतदान करण्यासाठी फॉर्म12D घरोघरी पोहचविण्यात येणार आहे. तसेच अत्‍यावश्‍यक सेवेतील कर्मचा-यांना जिल्‍हास्‍तरावरील Facilitation Centre वर मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.

7)विशेष मतदान केंद्रे-

18 जालना लोकसभा मतदार संघांतर्गत आदर्श मतदान केंद्र, महिला संचलित मतदान केंद्र, दिव्‍यांग अधिकारी(PwD)द्वारे संचलित मतदान केंद्र, युवा संचलित मतदान केंद्र  यामतदान केंद्रांची माहिती खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.

विधानसभा मतदार संघाचे नाव

आदर्श मतदान केंद्र

महिला संचलित मतदान केंद्र

दिव्‍यांग अधिकारी संचलित मतदान केंद्र

युवासंचलित मतदान केंद्र

01

101- जालना विधानसभा मतदारसंघ

01

01

01

01

02

102-बदनापुर,(अ.जा.)विधानसभा मतदारसंघ

01

01

01

01

03

103- भोकरदन, विधानसभा मतदारसंघ

01

02

01

01

04

104- सिल्‍लोड, विधानसभा मतदारसंघ

01

01

01

01

05

106- फुलंब्री, विधानसभा मतदारसंघ

01

01

01

03

06

110- पैठण,विधानसभा मतदारसंघ

01

02

01

01

एकुण

06

08

06

08

 

तसेच जालना जिल्ह्यातील आदर्श मतदान केंद्र, महिला संचलित मतदान केंद्र, दिव्‍यांग अधिकारी(PwD)द्वारे संचलित मतदान केंद्र, युवा संचलित मतदान केंद्रे  अशामतदान केंद्रांची माहिती खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.

 

विधानसभा मतदार संघाचे नाव

आदर्श मतदान केंद्र

महिला संचलित मतदान केंद्र

दिव्‍यांग अधिकारी संचलित मतदान केंद्र

युवासंचलित मतदान केंद्र

01

99-परतुर विधानसभा मतदारसंघ

01

02

01

01

02

100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघ

01

02

01

01

03

101- जालनाविधानसभा मतदारसंघ

01

01

01

01

04

102- बदनापुर, (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ

01

01

01

01

05

103- भोकरदन विधानसभा मतदारसंघ

01

02

01

01

एकुण

05

08

05

05

 

08)नामनिर्देशन प्रक्रियाः -

उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय  तथा जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या कार्यालयामध्ये समक्ष दाखल करता येईल. तसेच मा.भारत निवडणूक आयोगाच्‍या सुविधा (SUVIDHA) पोर्टलच्या माध्यमातून  ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नामनिर्देशन दाखल करता येईल.

i) उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र विहीत नमुना " 2A " भरायचा आहे.

ii) उमेदवारास शपथ / दृढकथन करावे लागेल.

iii) शपथपत्र नमुना - 26. (प्रथम वर्ग दंडाधिकारी / नोटरी यांचेसमक्ष स्वाक्षरी करून सादर करावे.

iv) मतपत्रिकेवरील फोटोबाबतचे घोषणापत्र.

v) मतपत्रिकेवर नाव कसे असावे याबाबतचे उमेदवाराचे लेखी पत्र.

vi) नामनिर्देशनपत्रासोबत जमा करावयाची अनामत रक्कम रू. 25,000/-, अनु. जाती अथवा अनु. जमाती वर्गातील

उमेदवारासाठी रू. 12,500 /- इतकी अनामत रक्कम मा.भारत निवडणूक आयोगाद्वारे निश्चित करण्यात आलेली

आहे.

vii) एक उमेदवार जास्तीत जास्त 4 नामनिर्देशनपत्र सादर करू शकेल. तसेच एक उमेदवार दोनपेक्षा जास्त

मतदारसंघात अर्ज करू शकणार नाही.

viii) उमेदवारास राजकीय पक्षाचा असल्यास एक सूचक तर अपक्ष असल्यास एकूण 10 सूचक आवश्यक.

viii) राजकीय पक्षांचे उमेदवार यांनी पक्षाने प्राधिकृत केल्याबाबत विहीत सूचना पत्र (AA & BB)

(नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी 3.00 वाजेपुर्वी निवडणूक निर्णय अधिकारीयांचेकडे

जमा करणे आवश्यक)

ix )नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे विहीत शपथपत्र नमुना 26 मधील सर्व रकाने भरणे आवश्यक. एखादी

बाब लागू नसेल तर " निरंक " / " लागू नाही" असा तपशील नोंदविणे आवश्यक आहे.

उमेदवाराची पात्रता –

i)                     भारतीय नागरिकअसावा.

ii)                   वय 25 वर्षापेक्षा जास्त असावे.

iii)                  उमेदवाराचे नाव भारतातील कुठल्याही मतदारसंघात नोंदविलेले असावे तर सुचकाचे नावे ही जालना लोकसभा मतदारसंघातील यादीत नोंदवलेली असावी.

09)उमेदवारांचे शपथ पत्र (Candidates Affidavits)

मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उमेदवारांचे शपथपत्र (Form26) मधील सर्व रकाने पूर्ण भरणे आवश्यक आहे कोणताही रकाना कोरा सोडू नये तसेच अशा शपथपत्रामध्ये उमेदवाराला त्यांचे पॅन कार्ड क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.तसेच उमेदवार स्वतः आणि पत्नी/ पती किंवा इतर अवलंबित यांचे गत पाच वर्षांच्‍या आयकर विवरण पत्रामधील पूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे.तसेच वरील सर्वांचे चल-अचल संपत्ती इत्यादी बाबतचे विवरण दाखल करणे आवश्‍यक आहे.

10)फौजदारी प्रकरणे दाखल असणा-या उमेदवारांना सूचनाः-

फौजदारी प्रकरणे दाखल असणाऱ्या उमेदवारां करीता वृत्तपत्र आणि टेलिव्हिजन चॅनेलवर प्रचाराच्या कालावधीमध्ये 03 वेळा प्रसिद्धी देणे आवश्यक आहे, तसेच अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांच्या राजकीय पक्षाने देखील एका वर्तमान पत्रामध्ये तसेच सोशल मीडियावर 48 तासांच्या आत अशी माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.

11) संपर्क आराखडा आणि रूट प्लॅनः-

जालना जिल्ह्यातील मतदारसंघ निहाय सर्व मतदान केंद्रामध्ये संपर्क करण्याची व्यवस्था केली आहे,यात मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी  व अधिकारी यांना आवश्‍यक असलेला संपर्क आराखडा व रुट प्‍लॅन विधानसभा  मतदारसंघ निहाय तयार केलेला आहे. या आराखड्यात प्रत्‍येक मतदान केंद्रावरील तलाठी,ग्रामसेवक,मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी,पोलीस पाटील ,आरोग्‍य सेविका,यासह मतदान केंद्राशी निगडित अन्‍य कर्मचा-यांचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत.

तसेच 18 जालना लोकसभा मतदार संघातर्गत 104-सिल्‍लोड विधानसभा मतदार संघात 01 मतदान केंद्र ,106फुलंब्री विधानसभा मतदार संघात -06  अशी एकुण 18 जालना लोकसभा मतदार संघात  एकुण 07 मतदान केंद्र आहेत जे की,Shadow Areaमध्ये आहेत. अशा मतदान केंद्रावर संपर्क करण्‍याकरीता विशेष व्यवस्था जसे की वायरलेसफोन,सॅटलेलाईट फोन,वायरलेस रनर्स,  इत्‍यादींची व्‍यवस्‍था करण्यात आली आहे.

12)आदर्श आचार संहिताः-

मा.भारत निवडणूक आयोगाच्या या अधिसूचनेपासून संपूर्ण जालना जिल्ह्यामध्‍ये आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या करिता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना हे या कक्षाचे नोडल अधिकारी आहेत. राजकीय पक्ष, उमेदवार यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, त्यांनी आदर्श आचार संहितेचे पालन करावे. तसेच सर्व शासकीय निम- शासकीय विभागांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, त्यांनी आचार संहिता घोषित झाल्या पासून पहिले 24 तास, 48 तास व 72 तासांमध्ये करावयाच्‍या विविध आचार संहिता विषयक कार्यवाही तातडीने कराव्‍यात. आदर्श आचारसंहिता घोषित झाल्या पासून जालना जिल्ह्यामध्‍येमतदारसंघ निहायखर्च नियंत्रण पथक व आचारसंहिता पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत त्यांचे विवरण खालील प्रमाणे

18 जालना लोकसभा मतदार संघातील आचारसंहिता/खर्च नियंत्रण पथके खालीलप्रमाणे आहेत

अ.क्र.

विधानसभा मतदार संघाचे नाव

Flying Squad Team (FST)

Static surveilliance Team(SST)

Video Surveilliance Team(VST)

VVT

01

101- जालना विधानसभा मतदारसंघ

06

15

06

02

02

102- बदनापुर, विधानसभा मतदारसंघ(अ.जा.)

03

05

04

01

03

103- भोकरदन, विधानसभा मतदारसंघ

03

05

04

01

04

104- सिल्‍लोड विधानसभा मतदारसंघ

04

09

09

03

05

106- फुलंब्री,विधानसभा मतदारसंघ

04

09

04

00

06

110 – पैठण,विधानसभा  मतदारसंघ

06

05

02

02

 

एकुण मतदान केंद्रे

26

48

29

09

 

जालना जिल्ह्यातील आचारसंहिता/खर्च नियंत्रणपथके खालीलप्रमाणे आहेत

अ.क्र.

विधानसभा मतदार संघाचे नाव

Flying Squad Team (FST)

Static surveilliance Team(SST)

Video Surveilliance Team(VST)

VVT

01

99- परतुर विधानसभा मतदारसंघ

03

05

04

01

02

100- घनसावंगी विधानसभा मतदारसंघ

03

03

03

01

03

101- जालना विधानसभा मतदारसंघ

06

15

06

02

04

102- बदनापुर, विधानसभा मतदारसंघ(अ.जा.)

03

05

04

01

05

103- भोकरदन, विधानसभा मतदारसंघ

03

05

04

01

एकुण मतदान केंद्र

18

33

21

06

 

13)वेबकास्टिंगः-

मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकूण मतदार संघाच्‍या 50%इतक्‍या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे, सदर वेबकास्टिंग ची Monitoring मा.भारत निवडणूक आयोग /मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि निवडणूक निर्णय अधिकारी / सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात करण्यात येणार आहे.नामनिर्देशन प्रक्रिया,नामनिर्देशन पत्रांची छाननी, चिन्ह वाटप, FLC,EVM चीवाहतूक,प्रचार सभा, Postal Ballot प्रक्रिया, मत मोजणी प्रक्रिया, तसेच SST पथकांच्या ठिकाणी CCTV कॅमेरेबसविण्यात येणार आहेत.

 

14)निवडणूक खर्चाचे संनियंत्रणः-

i) महाराष्ट्रात लोकसभेची उमेदवारी लढविणाऱ्या उमेदवारास मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 95 (पंच्याण्णव) लाख एव्हढी खर्चाची मर्यादा निश्चित केलेली आहे.

ii)निवडणूक कार्यक्रम घोषित होताच भारत निवडणूक आयोग तर्फे खर्च विषयक बाबींसाठी निरीक्षक, सहायक निरीक्षक,Flying Squad, SST, VST, VVT, Accounting Team, MCMC, DEMCयांची पथके कार्यान्वित केली आहेत.निवडणूक खर्चाचे संनियंत्रणाचे व्यवस्थापन करणे कामी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि. प.जालना यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्‍ह्यातील सर्व अंमलबजावणी यंत्रणा जसे की पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग,GST विभाग, रेल्वे पोलीस दल, पोस्ट विभाग, वन विभाग, इत्यादींच्या माध्यमातुन निवडणूक खर्चवर संनियंत्रण ठेवले जाणार आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागास दारूचे उत्पादन, साठवणूक ,विक्री, तसेच अवैध दारू संदर्भात जास्‍तीत जास्‍त कार्यवाही करण्याच्‍या सूचना देण्यात आल्‍या आहेत.GPS ट्रॅकिंग आणि C-vigil अॅपच्‍या माध्यमातून यावर संनियंत्रण ठेवले जाणार आहे.या करिता जनतेसाठी C-vigil अॅप आणि 24 तास कार्यान्वित असणारी 1950  क्रमांकाची  संपर्क सेवा तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एक लक्ष रुपयापेक्षा जास्त रोकड(संशयास्पद) बँकेतून काढणे आणि जमा करणे या बाबतीत बँक आणि आयकर विभागास सूचना देण्यात आल्या आहेत.

 

ii) रोकड रक्कम जप्तीआणि सोडविणे बाबत SOP-

मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जालना यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस, SST, FSTपथकांद्वारे आचारसंहिता काळात जप्त केलेली रोकडरक्कम आणि ही रोकड रक्कम जप्त केली असेल आणि FIR  दाखल केली नसेल तर अशा रकमेच्या विल्हेवाटी संदर्भात सदर समिती तात्काळ पुढील कार्यवाही करेल.

निवडणूक लढवणा-या उमेदवारांना त्यांचा दैनंदिन खर्च नोंदविणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी वेळोवेळी सदर खर्च निवडणूक निर्णय अधिकारी यांना  सादर करणे बंधनकारक आहे.तसेच निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर30 दिवसाचे आत संपुर्ण निवडणूक खर्चाचे विवरण पत्र दाखल  करणे बंधनकारक आहे.अन्यथा संबंधित उमेदवार भारत निवडणूक आयोग कडून अपात्र ठरविला जाऊ शकतो.

 

15)  Media Certification and Monitoring Committee(MCMC):-

                जिल्हाधिकारी जालना यांच्या अध्यक्षतेखाली MCMCची रचना करण्यात आली आहे. निवडणूक प्रचाराकरीता इलेक्ट्रॉनिकमीडिया/TVचॅनेल/VoiceMSG/BulkSMS/SocialMedia/Internet/ Websites / सिनेमा हॉल/रेडिओ/खाजगी FM/Audio Visual Display in Public Places/Advertisement in e-Newspaperयावर देण्यात येणा-या जाहिरातींचे पूर्व प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक आहे.सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना याद्वारे आव्हान करण्यात येते की, अशा पद्धतीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत.

 

 

 

16)आय टी मोबाईल अॅप्लिकेशन-

i)C-vigil

सर्व सामान्य नागरिकांना C-vigilअॅपद्वारे निवडणूक संदर्भात आक्षेपार्ह फोटो किंवा विडिओ या  अॅपवर पाठवून त्याची तक्रार नोंदविण्यात येईल.अशा तक्रारींवर Flying Squad च्या माध्यमातून त्वरित कार्यवाही करून 100मिनीटांच्‍या आत अशी तक्रार निकाली काढण्यात येईल. सदर अॅप हे Googel Play Store  Apple Play Store वर उपलब्‍ध आहे.

ii) SUVIDHA-

SUVIDHA या अॅपद्वारे उमेदवारांना नामनिर्देशन पत्र आणि विविध परवानग्या  मिळविण्‍याकरीता  ऑनलाइन अर्ज करता येईल.

iii)Candidate Affidavit Portal:-

निवडणुक लढवणा-या उमेदवारांची संपुर्ण माहिती असलेली यादी, उमेदवारांच्‍या नामनिर्देशन पत्राची माहिती,उमेदवारांची शप‍थपत्रे इत्‍यादी बाबतची माहिती सर्वसामान्‍य नागरीकांना या पोर्टलवर पाहता येईल.(https//affidavit.eci.gov.in/)

iv)ETPBMS:-

सैन्य दलातील मतदारांकरीताETPBMSया सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतपत्रिका पाठविण्यात येणार आहे. अशा मतपत्रिका मतदान झाल्या नंतर सैन्य दलातील मतदान पोस्टाद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी यांना पाठविल्‍या जातील.

v) KYC App(Know Your Candidate):-

मा.भारत निवडणूक आयोगाद्वारेKYC अॅप तयार करण्‍यात आले असुन यामध्ये  नागरीकांना उमेदवारांचे गुन्हेगारी विषयक  अहवाल या अॅपच्‍या माध्‍यमातुन  पाहता येतील.

vi)Voter Turn Out App :-

                Voter Turn Out App अॅप हे मतदार आणि मिडीया हाऊससाठी विविध निवडणूकांसाठी मतदानाचा मागोवा घेण्‍यासाठी  उपयुक्‍त  अॅप आहे.एखाद्या विशिष्‍ट क्षेत्रातील मतदानांचा अंदाज घेण्‍यासाठी हा एक सोपा मार्ग आहे. या अॅप च्‍या माध्‍यमातून मतदानाची वेळोवेळी आकडेवारी प्रसिध्‍द करण्‍यात येईल.

vii)EVM (EMS):-

                याद्वारे पारदर्शक पध्‍दतीने सर्व EVM चे यादृच्छिकीकरण(Randomization) आणि उपयोजन(Deployment)साठवणूक  इत्‍यादी प्रक्रिया केली जाते.

सोशल मिडिया, पेड न्यूज व फेक न्यूजवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर असणार आहे. फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी सोशल मिडियावर व्यक्त होतांना काळजी घ्यावी, तसेच चुकीचे मेसेज पोस्ट करु नये किंवा फॉरवर्ड करु नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

****

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment