Wednesday 13 March 2024

जालना रेल्वे स्थानकावरील “कोच देखभाल” सुविधेचे उद्घाटन मराठवाड्याला सर्वोत्तम रेल्वे विकास सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबध्द -- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

 








 

जालना, दि. 13 (जिमाका) :- कोणत्याही शहराचा विकास करत असताना त्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याशिवाय विकास करता येत नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे, रेल्वेशी निगडीत कामे करत जालना शहरासह जिल्ह्याच्या वैभवात अधिकचा हातभार लावला आहे. पुढील काळातही नेहमीच विकासावर भर राहणार आहे. तरी मराठवाडा विभागाला सर्वोत्तम रेल्वे विकास सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. 

जालना रेल्वेस्थानक परिसरात कोच देखभाल सुविधेचे उद्घाटन आज श्री. दानवे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, माजी आमदार अरविंद चव्हाण, रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक निती सरकार, बद्री पठाडे, भास्करआबा दानवे, घनश्याम गोयल आदिंची प्रमुख उपस्थिती होती.  

श्री. दानवे म्हणाले की, जालना रेल्वे स्थानकावरुन इतर महानगरात जाणाऱ्या प्रवाशांची नेहमी गर्दी असते. त्यामुळे येथून नवीन रेल्वे सुरु होणे गरजेचे होते. नवीन रेल्वे सुरु करण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पीटलाईन (कोच देखभाल सुविधा) आवश्यक असते. त्या अनुषंगाने जालना व छत्रपती संभाजीनगर येथे नवीन पीटलाईन तयार करण्यात आली आहे.

 मुंबई येथे जाण्यासाठी जनशताब्दी रेल्वे जालना येथून सोडण्याकरीता जालना रेल्वेस्थानकावर गाडीत पाणी भरणे व चार्जिंग करण्याची सुविधा यापुर्वीच उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, असे सांगून श्री. दानवे म्हणाले की,  तिरुपती, उत्तर प्रदेश व बिहार येथे जाण्यासाठी छप्रा, जनशताब्दी, वंदे भारत रेल्वे जालना येथून सुरू करण्यात आलेल्या आहेत. जालना रेल्वेस्थानक पुर्नबांधणीसाठी 200 कोटी रुपयांचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच रेल्वेला लागणाऱ्या विविध पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच  वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रेल्वे पीटलाईनवर लावण्यात आली. 

प्रास्ताविक श्रीमती निती सरकार यांनी केले. माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. झाले.  कार्यक्रमास नागरिक, प्रवासी यांच्यासह रेल्वे विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

           जालना येथे कोच देखभाल सुविधेचा विकास

जालना स्थानकावर कोच देखभाल सुविधा विकास कामांसह या महत्त्वाच्या स्थानकावरील सुधारित कोचिंग ऑपरेशन्स सुलभ करणे ही भारतीय रेल्वेच्या सततच्या प्रयत्नांमधील आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी ठरेल. जालना रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे सिकंदराबाद-मनमाड रेल्वे मार्गावर स्थित आहे आणि ते हैदराबाद, मनमाड, मुंबई, पुणे आणि पुढे जाणाऱ्या गाड्या हाताळते. रेल्वे प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी, भारतीय रेल्वे कोच देखभाल सुविधा विकसित करत आहे. नवीन पिटलाइनमुळे प्रवासी गाड्या, किसान गाड्या आणि NMG गाड्या (कार वाहून नेणारे डबे) यांच्या देखभालीची सोय होईल, याशिवाय किरकोळ दुरुस्ती, जर असेल तर ती जालना स्थानकावरच करता येईल. जालना स्थानकावरील या नवीन सुविधेमुळे आमच्या रोलिंग स्टॉकची सुरक्षा तर बळकट होईलच शिवाय येथून अधिक संख्येने प्रवासी आणि शेतकरी गाड्या सुरू करण्याची संधी मिळेल.

देखभाल सुविधांचे महत्त्वाचे मुद्दे :-

            कोचची चोवीस तास तपासणी, साफसफाई, चार्जिंग आणि पाणी देण्याची सुविधा झाली आहे.  संपूर्ण ट्रेन उभ्या राहण्यासाठी एक स्टेबलिंग लाईन आणि एक अतिरिक्त कोच लाईन –   CSR-300m (जी दुसरी स्टेबलिंग लाईन म्हणून 720m पर्यंत वाढवली जाऊ शकते). 28 कोच हाताळण्यासाठी कॅमटेक डिझाइन असलेली पिट लाइन (685 मीटर) आहे.  डब्यांच्या बाह्य स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानासह स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट आहे.  IOH शेडसह आजारी डब्यांच्या दुरुस्तीसाठी दोन 300 मीटर लांब लाईन (बाजूला 2 खड्डे      असलेले 35 मीटर x 19.5 मीटर) आहे.  एसी कर्मचाऱ्यासाठी कॅरेज आणि वॅगन आणि ट्रेन लाइटिंग/सेवा भवन आहे.  नांदेडच्या टोकाकडे 720 मीटर लांब शंटिंग नेक आहे. कार्यालयीन इमारती आणि क्वार्टरचे स्थलांतर केले.  चांगल्या सिग्नलिंग सुविधेसाठी विद्यमान इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बदल केला.  पिट लाइन, सर्व्हिस बिल्डिंग इ.साठी इलेक्ट्रिक लाइटिंग करण्यात आलेली आहे.

प्रवाशांसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करून प्रवासी गाड्या ठेवण्याची क्षमता वाढवली.     किसान ट्रेन्स आणि NMG ट्रेन्स (कार वाहून नेणारे डबे) वाढवण्याच्या क्षमतेत वाढ झाल्याने माल ग्राहकांना फायदा होतो.  ऑटोमॅटिक कोच क्लीनिंग मशीन्स सादर करून कोच साफसफाईचे सर्वोच्च मानक,  मराठवाडा विभागातील रेल्वे पायाभूत सुविधांचे बळकटीकरण,  रोलिंग स्टॉक आणि ट्रेन ऑपरेशन्सची वर्धित सुरक्षा याचा लाभ होणार आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment