Monday 4 March 2024

कॅच द रेन अंतर्गत घोषवाक्यद्वारे जनजागृती

 


 

      जालना, दि. 4 (जिमाका) :- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार च्या अंतर्गत चालत असलेले नेहरू युवा केंद्र जालना च्या वतीने जलशक्ती मंत्रालय अंतर्गत कॅच द रेन 3.0 चे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. नेहरु युवा केंद्र, जालना व संत भगवान बाबा युवा मंडळ च्या वतीने मंठा तालुक्यात विविध ठिकाणी पाण्याचे महत्व घोषवाक्याद्वारे रेखाटले गेले. यामध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कॅच द रेन 3.0 या पाऊस पाणी संकलन या संकल्पनेची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी घोषवाक्याच्या माध्यमातुन मंठा तालुक्यामध्ये जनजागृती करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित गावकऱ्यांमध्ये सोबत जल शपथ देण्यात आली. पाण्याचे महत्व, पाऊस पाणी संकलन, पाणी हेच जीवन, पाऊस आलाच नाही तर? आणि पाणी व सृष्टी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित संत भगवान बाबा युवा मंडळचे अध्यक्ष वैभव कांगणे, वडगाव सरपंच अच्युतराव डोईफोडे, बबन डोईफोडे, ज्ञानेश्वर आंधळे, दत्ता डोईफोडे, सचिन डोईफोडे, संजय डोईफोडे, जनार्दन खंदारे, टाकळखोपा सरपंच प्रभाकर बोरुडे, शिवा राठोड, एकनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर ढोले, राजेश जाधव, कान्होबा लांडगे इत्यादी उपस्थित होते.

 

 

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment