Monday 4 March 2024

सैनिक कल्याण विभाग सरळसेवेतील गट-क पदांच्या ऑनलाईन अर्ज मागविण्याच्या कालावधीत मुदतवाढ

 

      जालना दि. 4 (जिमाका) :- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट क ची पदे भरण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्याकरीता दिनांक 2 फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासुन दिनांक 3 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत हा कालावधी देण्यात आला होता. तरी लोकहितार्थ अर्ज मागविण्याचा कालावधी दिनांक 24 मार्च 2024 संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. सर्व माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment