Friday 22 March 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करण्याच्या कार्यपध्‍दतीचे आदेश जारी

 


 

जालना, दि. 22 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम दिनांक 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना  जिल्‍हयात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटर गाड्या/वाहने यांचा समावेश नसावा.तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्‍यक्‍ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्‍यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.  याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नूसार एकतर्फी आदेश जिल्‍हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्‍ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

निवडणूकीचे कालावधीत जालना जिल्ह‌यात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाडया/वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा, तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वादय वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध करण्यात आला  असल्याचे आदेश दि. 16 मार्च 2024 रोजीचे 6 वाजेपासुन ते दि. 6 जून 2024 चे रात्रीचे 12 वाजेपर्यंत संपूर्ण जालना जिल्ह्यात अंमलात राहतील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment