Friday 22 March 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ निवडणूक कालावधीमध्ये जात/धर्म/भाषावार शिबिरांच्या आयोजनावर निर्बंध

 


 

जालना, दि. 22 (जिमाका) - मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे जात / भाषा / धार्मिक शिबीरांचे / मेळाव्यांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

 

जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात कुठेही पारंपारीक सण, उत्सव, रुढीनुसार चालत आलेले धार्मीक कार्यक्रम वगळून लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आयोजीत केलेल्या व ज्यामधुन मतदान, मतदार याच्यांवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रभाव पडेल असा कोणताही कार्यक्रम तसेच राजकीय पक्षाचा प्रचार प्रसिध्दी होईल अशा स्वरुपाचे कोणतेही जात/ भाषा / धार्मिक शिबीरांचे/मेळाव्यांचे आयोजनावर निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत,  असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

***

No comments:

Post a Comment